Subscribe Us

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती


विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 बदली निकष -
(खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून ओळखले जातील.)


१. पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)
२. दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.
३. हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक
४. जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस सुरु असलेले शिक्षक
५. यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.
६. कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक
७. मेंदूचा आजार झालेले शिक्षक
८. थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक / जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA), Classical type (Mutase defiency व इतर आजार) (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)
९. माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा
१०. विधवा शिक्षक
११. कुमारीका शिक्षक
१२. परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक
१३. वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक झालेले शिक्षक
१४. स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)


खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :👇👇

१५. हृदय शस्त्रक्रिया झालेले.
१६. जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले.
१७. यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक
१८. कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले शिक्षक
१९. मेंदूचा आजार झालेले.
२०. थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले.

विशेष संवर्ग भाग-1 बदली प्रक्रिया व कार्यपद्धती -
४.२ (टप्पा क्र. २)

४.२.१. टप्पा क्र.१ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग-१ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) तिन दिवसांचा अवधी देण्यात येईल. गावांचा पसंती क्रम भरताना कमीत कमी 1 व जास्तीत जास्त 30 गावांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.

४.२.२. विशेष संवर्ग माग- १ शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरुनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल, मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. ३ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.

४.२.३. विशेष संवगांतर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.

४.२.४. एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन जेष्ठ कर्मचार्‍यास प्रथमतः बदली अनुज्ञेय राहील.

४.२.५. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचार्‍यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील.

४.२.६. या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना, शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये (तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने) बदली देता आली नाही तर त्याची बदली होणार नाही.

४.२.७. विशेष संवर्ग भाग -१ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.

४.२.८. विशेषसंवर्ग भाग -१ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग अधिकारी यांची समिती निर्णय घेईल.

विशेष संवर्ग भाग-1 संदर्भात शंका समाधान -

1) शाळांच्या प्राधान्यक्रमात किती शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे?
➡️ विशेष संवर्ग भाग 1 ने फॉर्म भरताना फॉर्म मध्ये कमीत कमी 1 व जास्तीत जास्त 30 शाळंचा प्राधान्यक्रम भरणे गरजेचे आहे.

2) बदली फॉर्म मधील प्राध्यान्यक्रमातील शाळांना न मिळाल्यास विस्थापित होईल काय?
➡️ विशेष संवर्ग भाग 1 बदली प्रक्रियेमध्ये आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपल्याला पूर्वीच्याच शाळेवर कायम ठेवण्यात येत.

3) विशेष वर्ग भाग 1 बदली प्रक्रियेमध्ये नकार किंवा होकार देऊ शकतो काय?

➡️ विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांच्या बदल्या ह्या फक्त विनंतीवरून होऊ शकतात विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षक बदली पात्र यादीमध्ये येत असतील तर त्यांना बदली हवी असल्यास बदली मागू शकतात अन्यथा बदलीला नकार म्हणून बदली पूर्वीच विकल्प भरून देऊ शकतात.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया-2022


Post a Comment

0 Comments