Subscribe Us

बदली अधिकार प्राप्त शिक्षक संवर्ग भाग-३ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती

बदली अधिकार प्राप्त शिक्षक संवर्ग भाग-३ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती


बदली अधिकार प्राप्त शिक्षक (संवर्ग-3) बदली निकष -

◼️ जिल्हांतर्गत बदली ७ एप्रिल २०२१ चे नवीन धोरणानुसार बदली अधिकार प्राप्त शिक्षकाची खालील प्रमाणे व्याख्या केली आहे .
-> बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.


(संवर्ग-3) बदली प्रक्रिया व कार्यपद्धती -

4.4.1 टप्पा क्रमांक ३ प्रमाणे संवर्ग २ च्या बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल, व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 3 दिवसांचा अवधी देण्यात येईल, नंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.

4.4.2 यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची तीन वर्षांची बदली करावयाची निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झालेली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र २ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

4.4.3 सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या या त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात येतील.

4.4.4 सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली अनुज्ञेय राहील.

4.4.5 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या या बदलीपात्र शिक्षकांचा जागेवर त्यांच्या विनंती प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.

4.4.6 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.

अवघड क्षेत्राचे निकष (परिशिष्ट-1)

१. नक्षलग्रस्त पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव

२. वार्षिक सरासरी पर्जन्यमान दोन हजार मिलिमीटर पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव (महसूल विभागाकडील माहितीनुसार ) 

३. हिंस्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश (संबंधित उपवनसंरक्षक यांच्याअहवालानुसार)

४. वाहतुकीचा सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव / रस्त्याने न जोडलेल्या शाळा (बस, रेल्वे, इत्यादी सार्वजनिक वाहतूक)

५. संवाद छायेचा प्रदेश (संबंधित महाप्रबंधक बीएसएनएल यांच्या अहवालानुसार )

६. डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार)

७. राष्ट्रीय राज्य महामार्गापासून १० किमी पेक्षा जास्त दूर

दि. ७ एप्रिल २०२१ च्या जिल्हांतर्गत बदलीच्या शासन निर्णयामध्ये अवघड क्षेत्राच्या व्याख्या १.१ मध्ये असं स्पष्ठ सांगितलं आहे कि वरील परिशिष्ठ १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.

वरील प्रमाणे जिल्हा स्तरावर अवघड क्षेत्र ठरवण्यासाठी खालील प्रमाणे समिती गटित करण्यात येत आहे. सदर समितीने अवघड क्षेत्राचे दर तीन वर्षांनी (मार्च महिन्यात) पुनर्विलोकन करण्यात यावे.

समिती -

१. मुख्य कार्यकारी अधिकारी - अध्यक्ष 
२. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) - सदस्य
३. कार्यकारी अभियंता जि प बांधकाम विभाग - सदस्य
४. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग- - सदस्य
५. विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ - सदस्य,
६. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) - सदस्य

बदली अधिकार पात्र शिक्षक (संवर्ग-3) बदली प्रक्रिया शंका समाधान -

१) बदली अधिकार पात्र शिक्षक बदली पात्र ठरू शकतात काय?
उत्तर-  मागील शासन आदेशानुसार बदली अधिकार पात्र शिक्षक हे बदली पात्र शिक्षक ठरू शकतात अशी व्याख्या होती परंतु 7 एप्रिल 2021 च्या शासन आदेशामध्ये बदली अधिकार पात्र शिक्षक करिता बदली पात्र शिक्षकांच्या संदर्भात कोणतीही व्याख्या दिलेली नाही त्यामुळे बदली अधिकार पात्र शिक्षक बदली पात्र ठरू शकत नाहीत.

२) बदली अधिकार पात्र शिक्षकांना (संवर्ग ३) पुन्हा अवघड क्षेत्रातील शाळा निवडता येतील काय?
उत्तर-  होय , बदली अधिकार पात्र शिक्षकांना जर पुन्हा अवघड क्षेत्रात सेवा द्यायची असल्यास त्यांना बदली अधिकार पात्र शिक्षकांनी भरलेल्या पसंती क्रमातील संभाव्य जागांवर, निव्वळ रिक्त जागांवर बदली मागता येईल.

३) बदली अधिकार पात्र शिक्षक संवर्ग तीनला कोणत्या जागा पसंती क्रमामध्ये निवडता येतील?
उत्तर-  जिल्ह्यातील संवर्ग १ व संवर्ग २ ची बदली प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर राहिलेल्या रिक्त जागा, संवर्ग १ व संवर्ग २ ने झालेल्या रिक्त जागा, बदली पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा व बदली अधिकार पात्र शिक्षकांनी आपल्या पसंती क्रम भरला असेल तर त्यांच्या संभाव्य रिक्त जागांवर पसंती क्रम देता येईल.

४) बदली अधिकार पात्र शिक्षक नकार देऊ शकतात काय?
उत्तर-  बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये स्पष्ट सांगितले आहे की जर बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पसंती क्रम दिला नाही आणि हे शिक्षक बदली पात्र शिक्षक नसतील तर त्यांची बदली होणार नाही.

म्हणजेच ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रामध्ये ३ वर्षापासून ते १० वर्षेपर्यंत सेवा झालेली असेल त्यांनी ऑनलाइन पसंती क्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही.

परंतु आदिवासी क्षेत्रामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षकांसंदर्भात येथे एक संभ्रमाचा मुद्दा आहे बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये कोठेही बदली पात्र शिक्षक असा उल्लेख केलेला नाही म्हणजेच बदली अधिकार पात्र शिक्षक हे बदली पात्र शिक्षक ठरू शकत नाही शेवटी निर्णय शासनाच्या अधीन

५).बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली पात्र शिक्षक कमी असताना सर्वांच्या बदल्या होतील का?
उत्तर-  ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार यावर्षी बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या सर्वांच्या बदल्या होतील कारण बदली पात्र शिक्षक कमी जरी असले तरी न्यायालयाच्या आदेशानुसार नक्षलग्रस्त व आदिवासी क्षेत्रातील रिक्त जागा राहत असल्यास सर्वसाधारण क्षेत्रातील १० वर्षेचे वर सेवा करणाऱ्या शिक्षकांना बदलीस धरावयाची शाळेची पाच वर्षाची अट लागू राहणार नाही याचाच अर्थ की सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दहा वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांमधून वास्तव सेवा जेष्ठतेनुसार आदिवासी क्षेत्रात रिक्त जागांवर बदली करण्यात येईल व त्यांच्या जागेवर अधिकार प्राप्त शिक्षकांना देण्यात  येईल.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया-2022

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती - CLICK HERE



Post a Comment

0 Comments