Subscribe Us

बदली पात्र शिक्षक संवर्ग भाग-४ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती

बदली पात्र शिक्षक संवर्ग भाग-४ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती


बदलीस पात्र शिक्षक व्याख्या  (संवर्ग-4 ) -
जिल्हांतर्गत बदलीच्या नवीन धोरणामध्ये बदलीस पात्र (संवर्ग-4) शिक्षकांच्या नवीन व्याख्या केल्या आहे. त्या खालील प्रमाणे -

व्याख्या (क्र.1) - बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा 10 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची  सेवा 5 वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक तथापि, अवघड क्षेत्रातील बदलीने होणाऱ्या रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने अशी अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास तेसच..

व्याख्या (क्र.2) -  सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील 5 वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अशा शिक्षकांची सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य सेवा जेष्ठते प्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रांमध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल.

बदलीस पात्र शिक्षकांची (संवर्ग-4) बदली प्रक्रिया व कार्यपद्धती -
4.5 (टप्पा क्र 5)

4.5.1 टप्पा क्रमांक 1, 2, 3, व 4 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीपात्र शिक्षक यांची एक जेष्ठता यादी जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 3 दिवसांचा अवधी देण्यात येईल. 

4.5.2 सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.

4.5.3 या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील, परंतु या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत. त्या शाळेत ठेवायचा रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते. 

4.5.4 या शिक्षकांनी  प्राधान्यक्रम दिल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल. 

4.5.5 सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 4 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा  पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.

बदली पात्र शिक्षक संवर्ग-4 शंका समाधान -

1) बदली पात्र शिक्षक हे सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा पसंतीक्रमांत भरू शकतात का?
➡️ होय, टप्पा क्रमांक 4 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  जर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये रिक्त जागा राहत असतील तर बदली पात्र शिक्षक ह्या वास्तव सेवा जेष्ठतेने जागा मागू शकतात.

2) बदली पात्र शिक्षक हे कोणत्या जागा मागू शकता?
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येणाऱ्या रिक्त पदांच्या यादीमधील शाळा मागू शकतात परंतु बदली पात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना आपली सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन शाळांचा प्राधान्यक्रम भरावा जेणेकरून विस्थापित होणार नाही.

3) बदली पात्र शिक्षकांना बदलीने शाळा सेवा जेष्ठतेने मिळतील की पसंतीक्रमा नुसार मिळतील?
➡️ बदली पात्र शिक्षकांना आपण दिलेला पसंतीक्रम आपल्या सेवाजेष्ठतेनुसार जर आपल्या पसंतीक्रमतील शाळा उपलब्ध असतील तर शाळा आपल्याला त्या मिळतील. उदा. बदली ही सेवाजेष्ठते नुसार मिळेल. सर्वप्रथम अ नि दिलेल्या सर्व पर्यायांसाठी rounds फिरतील नंतर ब साठी rounds फिरतील. अ च्या वेळी जागा उपलब्ध असेल तर अ ला बदली मिळणार पण जर अ च्या वेळी जागा उपलब्ध नसेल पण ब च्या वेळी असेल तर ब ला बदली मिळेल. (Vinsys कंपनीने दिलेलं उत्तर)


4) 12 ऑक्टोंबर 2022 चे शासन परिपत्रकानुसार बदली अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी?
➡️ बदली पात्र शिक्षकांना अर्ज भरतेवेळी -
अ) (मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास, बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) किंवा 
आ) (मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) या पर्यायापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असून अशा शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक "प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहतील" अशी तरतूद आहे.

जर एखाद्या शिक्षकांने सदर विवरण पत्र - 1 मध्ये नमूद केलेला वरील अ) येथील पर्याय निवडल्यास, अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेल्या बदलीवेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जागी, अशा शिक्षकांची बदली होईल. सदर बदली पूर्णतः प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या  प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही. मात्र, जर एखाद्या शिक्षकाने सदर विवरण पत्र 1 मध्ये नमूद केलेला वरील आ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळू शकेल.

अर्थातच आपण पर्याय क्रमांक 'अ' निवडल्यास यदाकदाचित आपली जागा कोणी मागितली नाही तर आपली बदली होणार नाही परंतु मागितल्यास आपण दिलेल्या पसंती क्रमाने शाळा मिळतील हे सांगता येणार नाही  परंतु 'आ' निवडल्यास आपल्या पसंती क्रमाने बदली मिळेल हे निश्चित
त्यामुळे बदली पात्र शिक्षकांनी आ हा पर्याय निवडणे सोयीचे होईल

5) बदली प्रक्रियेमध्ये विस्थापित कोणते शिक्षक व का होतात?
➡️ सदर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग 1. संवर्ग 2 व संवर्ग 3 मधील शिक्षक विस्थापित होणार नाहीत परंतु बदली पात्र शिक्षक विस्थापित होऊ शकतात बदली पात्र शिक्षकांनी आपल्या सेवाजेष्ठतेचा विचार न करता ऑनलाइन प्राधान्यक्रम भरल्यास विस्थापित होऊ शकतात त्याकरिता बदली पात्र शिक्षकांनी यादीचा अभ्यास , चांगल्या शाळांचा अट्टाहास व आपली सेवा जेष्ठता या तिन्ही घटकांचा अर्ज भरतांना योग्य समन्वय साधल्यास विस्थापित होणार नाही.

6) बदली पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रिये मधून पती-पत्नी 30 किलोमीटरच्या वर असल्यास बदली प्रक्रिया कशी राबवली जाईल?
➡️ जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये पती-पत्नी मधील अंतर 30 किलोमीटरचे वर असल्यास त्यांची बदली प्रक्रिया बदली पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमधून राबवली जाईल यामध्ये दोन्ही जिल्हा परिषद शिक्षक असल्यास दोघांनाही एक युनिट समजून यादीमध्ये समावेश केला जाईल बदली देत असताना दोघांनाही बदली प्रक्रियेमध्ये एक युनिट समजून शक्यतो एका शाळेवर अन्यथा दोघांनाही 30 किलोमीटरच्या परिसरात गाव देण्याचा प्रयत्न होईल

7) बदली पात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये कोणत्या शिक्षकांवर अन्याय होऊ शकतो?
➡️ बदली पात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये 10 वर्ष पुर्ण व वयाची 53 वर्ष पूर्ण होण्यास एक दिवस कमी असणाऱ्या शिक्षकांचा समावेश होतो परंतु ही बदली प्रक्रिया सेवा जेष्ठतेने होत असल्यामुळे या बदली प्रक्रियेमध्ये सेवेने कनिष्ठ असणाऱ्या अर्थातच ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये निवड 10 किंवा दहा वर्षाच्या जवळपास सेवा झालेली आहेत अशा शिक्षकांवर अन्याय होऊ शकतो त्यांचेच विस्थापित होण्याचे प्रमाण जास्त राहू शकते व त्यांनाच अति दुर्गम चे गाव मिळू शकतात कारण त्यांच्या आधी सेवाजेष्ठ शिक्षक हे चांगल्या शाळा निवडू शकतात.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया-2022

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती - CLICK HERE


Post a Comment

0 Comments