Subscribe Us

विस्थापित व शिक्षक बदली (10+) पात्र होणाऱे शिक्षक निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती

विस्थापित व शिक्षक बदली (10+) पात्र होणाऱे शिक्षक निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती 


संदर्भ- जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दि. 7 एप्रिल 2021 व 21 ऑक्टोंबर 2022 सुधारित वेळापत्रक.


व्याख्या : ज्या शिक्षकांना बदलीस पात्र (10+5 )शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये (टप्पा क्र. 5 मध्ये) 30 शाळांच्या पसंती क्रमाने मागितलेल्या शाळा मिळणार नाहीत / उपलब्ध होणार नाहीत असे शिल्लक राहणारे शिक्षक म्हणजे विस्थापित शिक्षक होय.

(टप्पा क्रमांक-6) विस्थापित शिक्षकांचा टप्पा -

1) टप्पा क्रमांक 5 पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल व टप्पा क्रमांक 5 मधील विस्थापित शिक्षकांना पुन्हा पसंतीक्रम भरण्यासाठी साठी 3 दिवसांचा कालावधी देण्यात येईल.

2) सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक 5 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील.

3) टप्पा क्रमांक 5 नुसार सर्वांची सेवाजेष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात येईल.

4) वरिल शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल किंवा या टप्प्यातील विस्थापित शिक्षकांना पुन्हा एकदा शाळा भरण्याची संधी टप्पा क्रमांक 7 मध्ये उपलब्ध करण्यात येईल. वेळापत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख नाही.
(शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार बदल्यांमध्ये टप्पा क्रमांक 7 होणेही अपेक्षित आहे.)

(टप्पा क्रमांक-7) बदली पात्र शिक्षक (10+) बदली प्रक्रिया -

1) टप्पा क्रमांक 6 पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल.
2) वरील यादीमध्ये अवघड क्षेत्रामधील टप्पा क्रमांक 6 झाल्यानंतर उर्वरित रिक्त जागा असतील.
3) वरील प्रमाणे रिक्त होणाऱ्या जागा भरण्याकरिता बदली पात्र शिक्षकांची जिल्ह्यातील एकूण सेवा कालावधीवर सेवाजेष्ठता यादी जाहीर करण्यात येईल (वरिल यादीतील शिक्षक हे सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्ष व 10 वर्ष पेक्षा जास्त सेवा झालेले शिक्षक, असतील अशा शिक्षकांना शाळा कालावधीची अट लागू राहणार नाही )
4) टप्पा क्रमांक 6 झाल्यानंतर शिक्षकांना पसंतीक्रम देण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी देण्यात येईल.
5) सर्व शिक्षकांना किमान 30 रिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील.
6) वरील यादीतून वास्तव सेवाजेष्ठतेने शिक्षकांना अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागांवर पदस्थापित करण्यात येईल.
7) या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.
8) अशाप्रकारे संवर्गनिहाय बदली प्रक्रिया झाल्यानंतर आदेश प्रकाशित होतील.

विस्थापित शिक्षकांच्या बदल्या शंका समाधान -

1) विस्थापित शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन की ऑनलाईन होतील?
➡️ जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2022 ही संपूर्णतः ऑनलाईन आहे विस्थापित शिक्षकांच्या बदल्याही ऑनलाइनच होतील.

2) जिल्हातंर्गत बदली आदेश केव्हा दिले जातील?
➡️ बदली आदेश केव्हा द्यायचे याबद्दल अद्याप कोणताही शासन स्तरावर निर्णय झालेला नाही.

3) टप्पा क्रमांक 7 मध्ये कोणत्या शिक्षकांवर अन्याय होतो?
➡️ टप्पा क्रमांक 7 मधील शिक्षक हे सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्ष व शाळेवर सेवेची अट नसणारे शिक्षक असतील हे सर्व शिक्षक जिल्ह्यातील वास्तव सेवा जेष्ठतेने जेष्ठ असतांना सुद्धा अति दुर्गमच्या शाळा मिळण्याची जास्त शक्यता आहे तसेच या शिक्षकांना पुन्हा पसंतीक्रम देण्याची संधी नाही.

4) बदली पात्र शिक्षक (सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष व शाळेवरील सेवेची अट नाही) यांची बदली प्रक्रिया कशी राबवली जाईल?
➡️ टप्पा क्रमांक 6 झाल्यानंतर टप्पा क्रमांक 6 मधील उर्वरित विस्थापित शिक्षक टप्पा क्रमांक 7 मध्ये घेऊ शकता किंवा त्या शिक्षकांना पसंतीक्रमानुसार शाळा उपलब्ध नसल्यास रिक्त पदांवर टप्पा क्रमांक 6 मध्ये पदस्थापित करू शकतात त्यानंतर जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील अद्यापही रिक्त असलेल्या जागा एवढ्याच बदली पात्र शिक्षकांच्या वास्तव सेवा जेष्ठतेने बदल्या करण्यात येतील.

अर्थातच टप्पा क्रमांक 6 झाल्यानंतर अवघड क्षेत्रामधील अद्यापही 100 पदे रिक्त आहेत असे समजल्यास यादीतील वरील 100 पदे बदली पात्र शिक्षक ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्र मध्ये 10 वर्ष व शाळेची कालावधीची अट नाही अशा वरील यादीतील 100 वास्तव सेवाजेष्ठ शिक्षकांच्या बदलीने अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरले जातील.

5) जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया वेळापत्रकानुसार वेळेत पूर्ण होईल काय?
➡️ जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया वेळापत्रकानुसार वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे परंतु वरील बदली प्रक्रिया मधील सॉफ्टवेअर हे नव्याने अपडेट केलेले असून त्यावर अद्याप एकही जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया पार पडलेली नाही त्यामुळे प्रत्येक संवर्गनिहाय बदली प्रक्रियेमध्ये अडचणी येऊ शकतात ह्या अडचणी आल्यास प्रत्येक संवर्गावर एक ते दोन दिवस वेळेत वाढ होऊ शकते.

एकंदरीत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया निष्पक्षपणे व न्यायपूर्वक राबवली जाईल यामध्ये शंका नाही.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया-2022

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती - CLICK HERE

Post a Comment

0 Comments