Subscribe Us

विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती

विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती


विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ बदली निकष -
    जिल्हा अंतर्गत बदली नवीन धोरणामध्ये मध्ये विशेष संवर्ग भाग २ हा तयार करण्यात आला आहे . जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून 30 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.


1.9 संवर्ग २ चे निकष व प्राधान्यक्रम -

1.9.1 पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर
1.9.2 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर
1.9.3 पती-पत्नी दोघेही एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर
1.9.4 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्यशासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका / नगरपालिका
1.9.5 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी
1.9.6 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक/ कर्मचारी असेल तर

विशेष संवर्ग-२ बदली प्रक्रिया व कार्यपद्धती -
४.३ (टप्पा क्र. ३)


4.3.1 टप्पा क्रमांक दोन प्रमाणे ( संवर्ग १ च्या बदल्या ) कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम भरण्यासाठी तिन दिवसांचा अवधी देण्यात येईल, तद्नंतर विशेष संवर्ग भाग-2 यांच्या बदल्या करण्यात याव्यात.

4.3.2 जे शिक्षक विशेष संवर्ग भाग दोन मध्ये मोडतात. त्यांना विवरण पत्र क्रमांक चार मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.

4.3.3 जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल.

4.3.4 उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्य पद्धती लागू होतील. या तरतुदीप्रमाणे संबंधितांची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक युनिट म्हणून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा 30 किमी परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यायचे आहे. यापैकी एकाची पण दहा वर्षे सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल.

4.3.5 तीस किलोमीटर रस्त्यांची अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदर चे 30 किमी रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील.

4.3.6 विशेष संवर्ग दोन च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.

विशेष संवर्ग-2 नुसार बदली घेणाऱ्या शिक्षकांनी -
१) सक्षम अधिकाऱ्याचे अंतराचे प्रमाणपत्र 
२) बदली मागणाऱ्या शिक्षकाच्या जोडीदाराचे गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यरत प्रमाणपत्र 
३) विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

विशेष संवर्ग भाग-2 संदर्भात शंका समाधान -

१) विशेष वर्ग भाग दोन ला कालावधीची अट आहे काय?
➡️ विशेष संवर्ग भाग दोन ला कालावधीची अट नाही पती-पत्नी दोघांच्या नियुक्तीच्या ठिकाणांमधील अंतर 30 किलोमीटरच्या वर ज्या दिवशी होते त्याच दिवशी सदर कर्मचारी संवर्ग भाग दोन चा लाभ घेण्यास पात्र ठरतात

२) विशेष संवर्ग भाग दोन बदली प्रक्रियेमध्ये शाळा न मिळाल्यास शिक्षक विस्थापित होतात काय?
➡️ विशेष संवर्ग भाग दोन मध्ये आपण दिलेल्या पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास सदर शिक्षक विस्थापित होत नाहीत त्यांची मूळ शाळाच कायम राहते

३) दोघांपैकी सेवा जेष्ठ शिक्षकाने फॉर्म भरणे आवश्यक आहे काय?
➡️ नाही-- जिल्हा अंतर्गत बदली शासन आदेश सात एप्रिल २०२१ नुसार दोघांपैकी कोणीही आपल्या सोयीनुसार फॉर्म भरू शकतो त्यामध्ये सेवाजेष्ठतेची अट नाही

४) पती-पत्नी दोघेही 30 किलो मीटरच्या आत असल्यास विशेष संवर्ग भाग दोन चा लाभ घेऊ शकतात काय?
➡️ नाही -- पती-पत्नी दोघेही 30 किलोमीटरच्या आत असल्यास आणि दोघीही बदली प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद चे कर्मचारी असल्यास दोघांपैकी एक जर बदली पात्र असल्यास दोघेही बदलीस पात्र होतात त्यांना एक युनिट म्हणून बदली पात्र संवर्गातून शक्यतो एका शाळेवर किंवा तीस किलोमीटर परिसरात पदस्थापना दिल्या जाते

(संदर्भ : जिल्हा अंतर्गत बदली शासननिर्णय दि ७ एप्रिल २०२१)

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया-2022

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती | संपूर्ण माहिती - CLICK HERE


Post a Comment

0 Comments