NPS कर्मचारी - Income Tax आयकर वजावट आणि Saving कशी करावी?
📱 NPS कर्मचारी - Income Tax वजावट कशी करावी?
1) कलम 80CDD(1) :-
NPS स्व हिस्सा (कर्मचारी अंशदान) अंतर्गत कलम 80C मधे 1.5 लाख रु. वजावट :-
(NPS चे कर्मचारी अंशदान (स्व हिस्सा) हा कलम 80C च्या अंतर्गत 1.5 लाख रु सेविंग मधे दाखवता येईल.)
2) कलम 80CCD(1B) :-
NPS स्व हिस्सा (कर्मचारी अंशदान) वजावट :-
(याअंतर्गत NPS ची 50,000रु पर्यंत extra saving करता येते.)
जर एखाद्या शिक्षकाची/कर्मचाऱ्याची LIC, PPF, RD/ होम लोन मुद्दल इत्यादि रक्कम मिळून 1.5 लाख रु लिमिट जवळपास पूर्ण होत असेल तर अश्या शिक्षक/कर्मचाऱ्यांनी NPSमधील स्व(कर्मचारी) हिस्सा रक्कम ही 1.5लाख रु होई पर्यंत 80C मधे दाखवावी व उर्वरित रक्कम 80CCD(1B) मधे (NPS एक्स्ट्रा 50,000 रु पर्यंत) मधे दाखवावी.
उदा. जर माझी LIC, PPF, RD इत्यादि सेविंग हिच जऱ (1.4लाख रु) 1,40,000रु होत असेल, तर अश्यावेळी 80C मधे 1.5 लाख रु होण्यासाठी मी माझ्या NPS स्व हिस्सा मधुन 10हजार रु 80C मधे दाखवेल व उर्वरीत NPS स्व हिस्सा रक्कम (50,000रु लिमिट पर्यंत) हा कलम 80CCD(1B) अंतर्गत टाकेल.
3) कलम 80CCD(2) :-
NPS शासन हिस्सा वजावट अंतर्गत वजावट :-
प्रश्न - आपल्याला मिळणारा शासन हिस्सा उत्पन्नात मिळवावा का.?
उत्तर - होय.
प्रश्न - शासन हिस्सा 80C सेविंग मधे ही दाखवता येईल का.?
उत्तर - नाही.
प्रश्न - शासन हिस्सा कशातुन किंवा कोणत्या कलमातून वजावट करावा.?
उत्तर - आपल्याला मिळणारा NPS मधील शासन हिस्सा कलम 80CCD(2) मधून वजावट करण्यात येतो.
प्रश्न - संपूर्ण शासन हिस्सा वजावट करता येतो का.?
उत्तर - नाही.
(सध्या राज्य कर्मचारी यांना फक्त 10% पर्यंतच वजावट करण्या संदर्भात नियम आहे.)
प्रश्न - 14% पैकी 10% शासन हिस्सा वजावट करणे म्हणजे नेमक कसे.?
(माझे वेतन 50000रु आहे, मला दरमाह 14% प्रमाणे 7000रु शासन हिस्सा मिळतो.मग 80CCD(1B) मधे यांतील किती शासन हिस्सा वजावट टाकावा.?)
उत्तर -
उदा - समजा तुमचे वेतन (बेसिक+DA) = 50,000 रु असेल तर तुम्हाला दरमाह 14% प्रमाणे
50000×14% = 7000रु शासन हिस्सा मिळतो.
(त्यानंतर तुमचे एकूण मासिक वेतन 570000₹ असे होते.)
यानुसार तुमचा NPS चा एकूण वार्षिक शासन हिस्सा 7000 रु×12 महीने = 84000 रु होते.
या वार्षिक 84000₹ शासन अंशदान पैकी
दरमाह 5हजार रु प्रमाणे एकूण 12महीने ×5000रु = 60,000रु शासन अंशदानाची रक्कम
हा शासन हिस्सा म्हणून 80CCD(2) मधून वजावट होईल.
तर 84000 रु शासन हिस्सा पैकी उर्वरित 24000 रु आपल्या एकूण उत्पन्नात तसेच शेवट पर्यंत कायम राहतील व त्यावर इनकम टैक्स द्यावा लागेल..!!
(टिप- सर्व 14% NPS शासन अंशदान रक्कम एकूण उत्पन्नातुन वजावट व्हावी यासाठी ही आपले प्रयत्न सुरु आहे, आपण इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडे दाखल केलेल्या तक्रार वर सध्या कामकाज सुरु आहे, पण अद्याप याबाबत लेखी बदल निर्णय नसल्याने वरील नूसारच वजावट करावी लागेल.)
📱 NPS कर्मचारी - Income Tax Saving कशी करावी?
🔹 80CCD(1) :-
या section मधील 80CCD(1) मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून झालेली NPS ची कपात (Employee contribution) दाखवता येते.
लिमिट : 1,50,000/-
🔹 80CCD(1B) :-
या section नुसार कर्मचाऱ्याच्या वेतनातून (Employee contribution) झालेली NPS ची कपात ( 80C मध्ये दाखवलेल्या कपाती व्यतिरिक्त) दाखवता येते.
लिमिट : 50,000/-
🔹 80CCD(2)
या section मध्ये NPS मध्ये (शासनद्वारा) Employer द्वारा दिलेला हिस्सा (आपल्या बाबतीत Government Contribution) दाखवता येतो.
लिमिट : राज्य व ईतर कर्मचारी यांच्या साठी पगाराच्या 10%.
1 Comments
यायाबत शासकीय GR असेल तर तोही उपलब्ध करून घ्यावा, प्लिज!
ReplyDelete