Subscribe Us

Covid-19 : बूस्टर डोसची नोंदणी कशी करावी? पात्रतेचे निकष काय?

Covid-19 : बूस्टर डोसची नोंदणी कशी करावी? पात्रतेचे निकष काय?


Covid-19 : तिसरा डोस (बूस्टर डोस) :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार 10 जानेवारी 2022 पासून आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरी नागरिकांना बूस्टर डोस (Corona Vaccine Booster Dose) देण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमाचे सध्याचे प्राधान्य म्हणजे सगळ्या पात्र लोकांना दोन डोससह संपूर्ण लसीकरण करणे असून कोविड-१९ लसीच्या बूस्टर डोससाठी काही मार्गदर्शक तत्त्वे केंद्राने स्पष्ट  सांगितली आहेत ती खालीलप्रमाणे -

तिसरा डोस कुणाला दिला जाणार आहे?

1) बूस्टर डोस देताना याआधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
2) पात्र नागरिकांमध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सहव्याधी असलेल्यांचा व्यक्तींचा समावेश आहे.
3) लसीचे दोन डोस घेतलेल्या पात्र व्यक्ती कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात.
4) तिसरा डोस घेतल्यानंतर त्याची माहिती लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही दिसणार आहे.


बूस्टर डोस नोंदणी कशी करावी?

1) बूस्टर डोससाठी Cowin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही.
2) हा बूस्टर डोस घेण्यासाठी Cowin वर स्लॉट बुक करणे गरजेचे नाही.
3) मात्र बूस्टर डोस कुठे मिळेल याची माहिती कोविन अॅपवरच मिळू शकणार आहे.
4) लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती आपल्याला आधीच कळावी म्हणून आपण Cowinच्या वेबसाईटवर, कोविन अॅपवर किंवा खाली दिलेल्या  लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता.


6) सर्वप्रथम वरील वेबसाईटवर click करावे.
7) लासिकारण करतेवेळी देलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ठ करावा.
8) त्यानंतर आपल्याला एक OTP येईल तो दिलेल्या BOX मध्ये टाकावा.
9) नंतर दिलेल्या सुचानाचे सांगितल्याप्रमाणे पालन करावे.
10) आपली यशस्वीरीत्या नोंदणी झालेली असेल...धन्यवाद..!!

तिसरा डोस कुणाला घेता येणार आहे?

1) ६० वर्षावरील सहव्याधींनी ग्रस्त व्यक्तींनाच हा डोस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २२ व्याधींची यादी जाहीर केली आहे.
2) बूस्टर डोस घेण्यासाठी डॉक्टरांकडून इतर कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही.मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने हा बूस्टर डोस घेण्यात यावा.
3) आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या ६० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना ही लस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत देण्यात येणार आहे.
4) खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी लसीकरण केंद्रांवर या लासिकारिता पैसे मोजावे लागणार आहेत.
5) ज्यांचे दोन डोस घेऊन नऊ महिने म्हणजेच ३९ आठवडे झाले आहेत, त्यांनाच हा तिसरा बूस्टर डोस घेता येणार आहे.
6) संबंधित व्यक्तीचा नऊ महिने कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, त्यांना कोविनकडून तिसरा डोस घेण्याबाबतचा मेसेजही येणार आहे.

Post a Comment

0 Comments