Subscribe Us

आर्थिक वर्ष सन 2024-25 करिता आयकर परिगणना | उत्पन्न आणि आयकर कपातीचे दर | Income tax Old & New Scheme

आर्थिक वर्ष सन 2024-25 करिता आयकर परिगणना | उत्पन्न आणि आयकर कपातीचे दर | Income tax Old & New Scheme


आर्थिक वर्ष सन 2024-2025 करिता आयकर परिगणना :-
1) यामध्ये माहे मार्च 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत मिळणारी एकूण वित्तलब्धी.
2) माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत प्राप्त झालेले साप्ताहीक सुट्टी भत्ता, वैद्यकीय देयकाच्या प्रतीपूर्तीची रक्कम, रजा रोखीकरणाची रक्कम, थकबाकीची रक्कम.
3) ठराविक मुदतीसाठी गुंतविलेल्या रकमेवर मिळालेले व्याज, इतर मागनि मिळालेले सर्व उत्पन्न.


आर्थिक वर्ष सन 2024-2025 करिता आयकर परिगणना करण्यासाठीचे उत्पन्न आणि आयकर कपातीचे दर खालीलप्रमाणे -

सन 2024-25 साठी नमूद खालील आयकर वजावटीचा फायदा फक्त Old Tax Scheme साठी ग्राह्य धरण्यात येईल, या गुंतवणूकीचा फायदा New Tax Scheme साठी मिळणार नाही. :-

1) गृह कर्ज :- (Housing Loan कलग 24 B) गृहकर्जावरील व्याजाची कमाल रक्कम मर्यादा रु. 2,00,000/- आहे.

2) आयकर कलम 80 सी (80C) :- खालील गुंतविण्यात आलेल्या रक्कमेची जास्तीत जास्त मर्यादा रु. 1,50,000/- आहे उदा. a) G.P.F. b) lal. c) P.P.F. d) N.S.C. e) UTL. PL. g) सुकन्या समृद्धी योजना, h) GIS. 1) म्युच्यूल फंड, 1) Housing Loan Principal (गृहकर्ज मुद्दल) k) शाळा/ कॉलेज ट्यूशन फी, 1) Fixed Deposit बँकेमधील मुदत बंद ठेव (5 वर्षावरील), m) इक्विटी शेयर मार्केट मधील गुंतवणूक, n) पोस्ट ऑफीसमधील 5 वर्षाची मुदत बंद ठेव योजनेतील रक्कम वरील गुंतवणुकीच्या एकत्रित गुंतवणूक जास्तीत जास्त रु 1,50,000/- ग्राह्य धरण्यात येईल.

3) आयकर कलम 80 सी सी डी (1बी) (80CCD1(B)) :- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) गुंतवणूक केलेल्या (रू.1,50,000/- च्या व्यतिरिक्त) रकमेस रू.50,000/- ची अतिरिक्त वजावटीचा लाभ घेता येईल आहे. सदर वजावट Tier-1 मध्ये जमा होणाऱ्या रकमेस लागू आहे.

4) आयकर कलम 80 डी (80D) :- वैद्यकीय विम्याच्या (Mediclaim Insurance Premium) हप्त्याची रक्कम कमाल मर्यादा रूपये 25,000/- इतकी आहे. (Rs. 5,000/- for Preventive Health Check Up within the limit of Rs. 25,000/-).

60 वर्षां वरील आई-वडीलांचा वैद्यकीय विमा घेतल्यास रु. 50,000/- अतिरिक्त सूट मिळेल. दोन्ही मिळून 25.000 + 50.000 = 75.000 ची सूट मिळेल.

60 वर्षा खालील आई-वडीलांचा वैद्यकीय विमा घेतल्यास रु. 25,000/- अतिरिक्त सूट मिळेल. दोन्ही मिळून 25,000-25,000-50,000 ची सूट मिळेल.

5) आयकर कलम 80 डी डी (80DD) :- करदात्यावर अवलंबून असलेल्या अंध मुकबधीर व्यक्तीवर केलेला वैद्यकीय खर्च, अपंगासाठी विमा कंपनीच्या जीवन योजनेत गुंतविलेली रक्कम, तसेच L.I.C. UTI IRDA ची मान्यता प्राप्त असणाऱ्या विमा कंपनी मधील गुंतवणूक ग्राह्य धरण्यात येईल. उदा. अपंगत्व 40% वरील खर्चासाठी रु.75.000/- आणि 80% वरील खर्चासाठी रु.1.25.000/- वजावट आहे.

6) आयकर कलम 80 पु (8000) :- करदाता स्वतः अपंग असेल तर त्यासाठी येणारा वैद्यकीय खर्च. उदा. अपंगत्व 40% वरील खर्चासाठी रु.75.000/- आणि 80% वरील खर्चासाठी रु.1.25,000/- वजावट आहे.

7) आयकर कलम 80 इ (80E) :- करदात्याच्या स्वतःच्या उच्चशिक्षणावरील कर्जाचे व्याज तसेच अवलंबून असणाऱ्या मुला/मुलींच्या उच्चक्षिणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज सुट असून त्यास कोणतीही मर्यादा नाही. सदर कर्जावरील व्याजाची सुट कर्ज घेतल्यापासून जास्तीत जास्त 8 वर्षांसाठी घेता येईल.

8) आयकर कलम 80 जी (80G) :- नमुद आयकर कलमानुसार देणगी दिली असल्यास सदर देणगी, तसेच पावतीवर आयकर कायदा कलम 80 जी अन्वये सुट आहे असे नमुद असल्यास आयकरामध्ये सुट मिळेल. (रू.2,000/- वरील रक्कम धनादेशाद्वारे (चेक), धनाकर्ष (DD) R.T.G.S अदा करणे आवश्यक अन्यथा आयकर सूट देय होणार नाही.

(100% Donation - P.M.Relief Fund. National Fund)
(50% Donation - Any Charitable/Religious Institutions. PM Drought Relief Fund)

9) घरभाडे भत्ता :- देय आयकर असणाऱ्या करदात्यांना खालीलप्रमाणे उत्पन्नात वजावट मिळेल..

a) प्रत्यक्षात मिळालेले घरभाडे भत्ता
b) प्रत्यक्षात अदा केलेली घरभाडे भत्ता वजा वतेनाच्या 10% रक्कम (वेतन व महागाई भत्ता मिळून)
c) मिळालेल्या वेतनाची 40%, किंवा 50% रक्कम (वेतन व महागाई भत्ता मिळून) यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम आयकरामध्ये वजावट होईल.

[Section. 10 (13A) & Rule 2A House Rent Allowance (HRA)]घरभाडे करारपत्र रु. 100/- च्या मुद्राकांवर (Stamp Paper) आवश्यक आहे.

10) आयकर कलम 80 TTA :- या कलमाखाली बचत खात्यावरील व्याजापोटी मिळणाऱ्या उत्पन्नास वजावट मिळू शकेल. या वजावटीची कमाल मर्यादा रू.10,000/- इतकी आहे.

11) आयकर कलम 80EEB :- इलेक्ट्रीक वाहन खरेदी करताना कोणत्याही वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जावरील रू.1,50,000/- पर्यंतच्या व्याजाची वजावटीचा लाभ सदर कलमाखाली करदात्यास घेता येईल.

12) प्रवास भत्ता 10(5) :- भारतातील कोणत्याही ठिकाणी रजेवर जाण्याच्या संदर्भात, त्याच्या मालकाकडून स्वतःसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी प्रवास भत्ता सोडा मिळेल केवळ अशा प्रवासाच्या उद्देशासाठी प्रत्यक्षात खर्च झालेल्या रकमेस वजावट मिळेल.

सन 2024-25 साठी नमूद खालील आयकर वजावटीचा फायदा Old Tax Scheme आणि New Tax Scheme या दोन्ही गुंतवणूकीचा फायदा मिळणार. :-

1] Exemption on Gratuity 10(10):- सेवा उपदान/मृत्यू उपदानाच्या रकमेवर आयकराची पूर्णपणे सूट आहे.

2] Exemption on Leave Encashment 10(10AA):- सेवेत असताना मिळणाऱ्या धनार्जित रजेच्या (Leave Encashment) रकमेस आयकरामध्ये सूट नाही. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या रजा सममूल्याच्या रकमेस (Cash Equivalent) आयकर वजातीमधून पूर्ण सूट आहे.

3] Contribution to Agniveer Corpus Fund 80CCH:- नियोक्तामार्फत अग्निवीर सेवा निधीमध्ये जमा करण्यात येणारी रक्कम आयकर वजातीकरिता विचारात घेण्यात येणार आहे.

4] Employer contribution to NPS 80CCD(2):- नियोक्तामार्फत राष्ट्रीय निवृत्तीवेतन निधीमध्ये जमा करण्यात येणारी रक्कम आयकर वजातीकरिता विचारात घेण्यात येणार आहे.

5) Transport Allowance to specially abled person:- दिव्यांग कर्मचाऱ्यांना वेतनात मिळणारा प्रवास भत्त्ता प्रतीमाह रू.3200/- इतक्या मयदिपर्यंत करमाफ आहे

[ सन 2024-25 साठी स्वास्थ्य व शैक्षणिक सेसची आकारणी आयकरच्या रकमेवर 4% इतकी आहे.]

वित्तीय वर्ष 2023-24 पासून नवीन कर प्रणालीनुसार आयकर परिगणना करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यास जुन्या कर प्रणालीनुसार आयकर वजावटीचा लाभ घ्यावयाचा असेल त्यानुसार जुन्या आयकर प्रणालीचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. अन्यथा नवीन कर प्रणालीनुसार आयकर विवरणपत्रे सादर करण्यात येणार आहेत.

नवीन वजावटीचा परिचय :- 
    या नियमांतर्गत, एचआरए आणि एलटीएसह 70 हून अधिक सूट आणि वजावट आहेत ज्यामुळे करपात्र उत्पन्न आणि कमी कर भरणे कमी होऊ शकते. सर्वात लोकप्रिय आणि उदार वजावट Sec 80C आहे, जी 1.5 लाखांपर्यंत करपात्र उत्पन्न कमी करण्यास अनुमती देते. करदात्यांना जुन्या आणि नवीन कर प्रणालीमध्ये एक पर्याय आहे.

    मा. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आपल्या २०२३ मधील अर्थसंकल्पात जुन्या स्किममध्ये आयकराच्या करमाफ उत्पन्न मर्यादेत व आयकर दरात काहीही बदल केला नसून आर्थिक वर्ष २०२३-२४ करीता करदात्यासाठी आयकराची मर्यादा व दर खालील प्रमाणे आहेत. तसेच नवीन स्किममध्ये यावर्षी आयकरामध्ये बऱ्यापैकी सूट दिली आहे.


आर्थिक वर्ष 2024-25 करिता नवीन आयकर प्रणाली - Click Here
NPS कर्मचारी - कलम (80 CCD) अंतर्गत वजावट कशी करावी? - Click Here

Post a Comment

0 Comments