Subscribe Us

PSLM प्रशिक्षण नोंदणी व प्रशिक्षण मोबाईल वरून कसे पूर्ण करावे?

PSLM प्रशिक्षण नोंदणी व प्रशिक्षण मोबाईल वरून कसे पूर्ण करावे?


“शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन” या विषयावर फ्री ऑनलाईन कोर्स..!!
(मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व भावी मुख्याध्यापक यांच्यासाठी)

★ FREE ONLINE COURSE :-
(नोंदणी करण्याकरिता जाणून घ्या सोप्या टिप्स..!!)

◆ सर्वप्रथम www.pslm.niepa.ac.in या वेबसाईट ला क्लिक करा.

◆ वेबसाईट ओपन झाल्यावर स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात रजिस्टर नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

◆ आता new अकाउंट चा फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये आपली युजर आय डी (उदा. kishor@85) व पासवर्ड सेट करा. (उदा. kishor@85) व विचारलेली आपली संपूर्ण माहिती भरा. जसे- इ मेल आय डी, नाव, पत्ता, लिंग, शाळेचे नाव, यु डाईस नंबर, माध्यम इत्यादी.

(काही माहिती भरायची राहिल्यास सबमिट केल्यानंतर भरावयाच्या माहितीच्या tab वर राहिलेली माहिती भरण्याबाबत सुचना दिली जाते ती माहिती भरून पूर्ण करा.)

◆ सर्व माहिती सविस्तर भरून झाली की शेवटी सबमिट या टॅब वर क्लिक करा.

◆ आता आपण वर दिलेल्या इ-मेल आय डी वर एक लिंक पाठवली जाईल.

◆ ती लिंक ओपन करा व आपले रजिस्ट्रेशन कन्फर्म करा.

(एवढ्या स्टेप बरोबर follow केल्यास या कोर्सकरिता आपली नोंदणी / रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.)

★ नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्ष कोर्सला सुरवात कशी करावी?

● सर्वप्रथम www.pslm.niepa.ac.in या वेबसाईट ला भेट द्या.

● आता स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात रजिस्टर च्या बाजूलाच लॉगइन Login हा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा. एकदा लॉग इन केल्यानंतर पुन्हा लगीन करण्याची गरज पडणार नाही सरळ अभ्यासक्रम ओपन होईल

● आता ओपन झालेल्या डॅशबोर्डवर आपण रजिस्ट्रेशन करताना जी युजर आय डी व पासवर्ड वापरला होता, तोच आय डी व पासवर्ड या ठिकाणी टाईप करा.

● शेवटी खाली दिलेल्या लॉगइन या टॅबवर क्लिक करा.

● आता आपण मुख्य डॅश बोर्डवर प्रवेश करू.

● आता वेबसाईट च्या वरच्या बाजूला भाषेचा पर्याय दिलेला असेल, त्यामधून आपल्याला ज्या भाषेतून कोर्स पूर्ण करावयाचा असेल ती भाषा निवडा.

● आता आपल्यासमोर आपण निवडलेल्या भाषेत संपूर्ण माहिती दिसेल.

● या कोर्समध्ये पायाभूत अभ्यासक्रम या सदराखाली एकूण आठ कोर्स दिलेले असतील.

● दिलेल्या आठ कोर्सपैकी क्रमवार एकेक कोर्स ओपन करा.

● प्रत्येक कोर्सवर क्लिक केल्यास सुरुवातीला प्रस्तावना दिसेल, ती काळजीपूर्वक वाचा. व शेवटी दिलेल्या स्टडी मटेरियल या टॅबवर क्लिक करा.

● स्टडी मटेरियल वर क्लीक केल्यावर त्या कोर्सशी संबंधित उपघटक दिसतील, त्यांचे क्रमवार वाचन करा.

● सर्व उपघटकांचे वाचन झाल्यावर स्टडी मटेरियल च्या खाली MCQ असा टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.

● MCQ मध्ये आपण आतापर्यंत वाचलेल्या घटकांवर आधारित काही वैकल्पिक प्रश्न असतील ते सोडवून घ्या.

● अशाप्रकारे प्रत्येक कोर्समधील उपघटकांचे सविस्तर वाचन करून हा कोर्स तीन आठवड्यात म्हणजेच 21 दिवसांत पूर्ण करून घ्यावा.

★ कोर्स पूर्ण झाल्यानंतर, निपा, नवी दिल्ली मार्फत प्रमाणपत्र कोठून व कसे Download करावे ?

◆ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वरीलप्रमाणे तीन आठवड्यांचा कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे.

◆ कोर्स पूर्ण झाल्यावर दोन दिवसांनी याच वेबसाईटवर वरच्या बाजूला दिलेल्या Certificate या टॅबवर क्लिक करा.

◆ आता आपले प्रमाणपत्र ओपन होईल. त्याखाली डाउनलोड सर्टिफिकेट Download certificate असा टॅब दिसेल त्यावर क्लिक केल्यास आपले प्रमाणपत्र डाउनलोड होईल.

अशाप्रकारे सर्व व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राचार्य व जेष्ठ शिक्षक या कोर्ससाठी नोंदणी करून कोर्स पूर्ण करू शकतात.

🙏🙏धन्यवाद..!!

Post a Comment

0 Comments