Subscribe Us

जिल्हांतर्गत बदली- 2022 | Phase : 3 (New Letest Update) संपूर्ण माहिती

जिल्हांतर्गत बदली- 2022 | Phase : 3 (New Letest Update) संपूर्ण माहिती


बदली पात्र प्रक्रिया व विस्थापित शिक्षक -

➡️ बदली प्रक्रियेतील राऊंडमध्ये बदली पात्र शिक्षकांमधून जे शिक्षक विस्थापित झाले अर्थातच त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या नाहीत असे शिक्षक विस्थापित झालेले असतील अशा शिक्षकांना पसंती क्रम भरावा लागेल.


 ➡️ तसेच ज्या शिक्षकांनी एक युनिट मधून लाभ घेतलेला आहे परंतु त्यांचे जोडीदार शिक्षक बदली पात्र नव्हते  अशा शिक्षकांचा समावेश या बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही कारण ते बदली पात्र नव्हते त्यांना फक्त एक युनिटमध्ये जागा मिळू शकणार होत्या परंतु त्यांना जर शाळा मिळाल्या नसतील तर ते शिक्षक आहेत  त्या शाळेवर राहतील.

➡️ तसेच दोन बदली पात्र शिक्षकांनी एक युनिट म्हणून अर्ज केलेला असेल तर त्या दोघांच्याही बदल्या झालेल्या असतील तर अशा शिक्षकांना पसंती क्रम भरावा लागणार नाही.

➡️ किंवा त्या एक युनिट मधील ज्या शिक्षकाने अर्ज केलेला असेल त्या शिक्षकाची बदली झालेली असेल व त्यांचा बदली पात्र जोडीदार विस्थापित झालेला असेल तर अशा जोडीदाराला या टप्प्यामध्ये पसंती क्रम भरावा लागेल 

➡️ किंवा एक युनिट मधील दोन्हीही पती-पत्नी शिक्षक विस्थापित झालेले असतील तर अशा शिक्षकांना पुन्हा विस्थापित टप्प्यामध्ये पसंती क्रम द्यावा लागेल.

➡️ या प्रक्रियेमध्ये बदली पात्र शिक्षकांमधून विस्थापित झालेल्या शिक्षकांचा समावेश होईल इतर विस्थापित शिक्षकांचा समावेश होणार नाही.

संवर्ग 3 पसंतीक्रम कसा भरावा ?
(बदली अधिकार पात्र शिक्षक महत्त्वाचे मुद्दे)

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना दि. 10 ते 14 जानेवारी दरम्यान बदली फॉर्म भरता येतील. दिलेल्या मुदतीत कितीही वेळा फॉर्म सबमिट करुन पुन्हा Withdraw करु शकता.

➡️ मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.

➡️ 16 ते 19 जाने. दरम्यान प्रक्रिया राबवून 19 जानेवारी ला बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या जाहीर होतील.

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या बदलीसाठी धरावयाच्या सेवाजेष्ठतेने करण्यात येतील  *GR परिच्छेद 4.4.3 नुसार

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदली प्रक्रियेमध्ये आपला बदली करिता पसंतीक्रम भरला नाही  तर त्यांची बदली होणार नाही.

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली अर्ज केलेला असेल परंतु त्या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना पुन्हा बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये बदली करिता अर्ज भरण्याची संधी मिळू शकते 
(संदर्भ 7 जून 2022 वेंसिसने विचारलेल्या प्रश्नाला शासनाने दिलेले उत्तर )

➡️ सद्य परिस्थितीत बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्याच जागा दाखवल्या जातील.

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये किंवा शासन आदेशामध्ये बदली अधिकार पात्र शिक्षक बदली पात्र होतो असे कोठेही म्हटले नसल्यामुळे बदली अधिकार मात्र शिक्षक बदली पात्र होत नाही त्यामुळेच अशा शिक्षकांना त्यांनी पाच वर्षे सेवा शाळेवर व त्या क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण केले असतानाही त्यांना शाळा न मिळाल्यास असे शिक्षक विस्थापित होणार नाहीत.

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पोर्टलवर बदली करिता पसंतीक्रम दिला आणि त्यांच्या सेवाजेष्ठतेने व त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार शाळा मिळाली तरच बदली होईल त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळांना न मिळाल्यास त्यांची बदली होणार नाही ते आहे त्या शाळेवर राहतील.

➡️ बदली अधिकार पात्र टप्प्यामध्ये बदली अधिकार पात्र शिक्षक हे  एक युनिटचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

➡️ सन 2019 च्या अवघड क्षेत्रातील यादीतील शाळा 2021/2022 मध्ये सुगम झाली आणि 2022 बदलीमध्ये त्या शिक्षकाची बदली नाही झाली तर पुढील बदली प्रक्रियेमध्ये त्या शिक्षकास नवीन यादी ज्या दिवशी घोषित झाली तेथून 10 वर्ष बदली होणार नाही.

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम  देतांना पोर्टलवर 30 शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास 30 शाळांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहे तेवढा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा शक्यतोवर आपला फार सबमिट होणार नाही.

➡️ एखाद्या अवघड क्षेत्रातील शाळेमधील एक पद समानीकरणांतर्गत ठेवलेले असेल व बदली मागून सुद्धा शिक्षकाची बदली झालेली नसेल तर अशा परिस्थितीत तेथे कोणत्याही शिक्षकास इतरत्र पदस्थापित केले जाणार नाही.

➡️ बदली समिती अध्यक्षांच्या मते पुढील बदली प्रक्रिया 2023 - 24 दिनांक 1 मार्च 2023 ते 31 मे 2023 दरम्यान आठ ते नऊ बदली आदेशात बदल करून राबविण्यात येईल.

बदली अधिकार पात्र शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम कसा भरावा?
पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंक वर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता

➡️ वरील लिंक वर क्लिक  करावे क्लिक  केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP  टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे.

➡️ डाव्या मेनूतील Intra district वर क्लिक करावे.

➡️ त्यातील application form वर क्लिक करावे.

➡️ Entitle application form वर फॉर्म भरणाऱ्या शिक्षकाची खालील माहिती *स्क्रीनवर दिसेल त्यावर 
शिक्षकाचे नाव 
आडनाव 
शाळेचा यु डायस नंबर 
शिक्षकाचा शालार्थ आयडी 
ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही.

➡️ वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही.

➡️ त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल
पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर

➡️ खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल.

➡️ याचाच अर्थ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या शाळांपैकी 30 प्राधान्यक्रम अथवा 30 पेक्षा कमी प्राधान्यक्रम उपलब्ध असल्यास उपलब्ध असलेले प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे.

➡️ प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मेनू मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down  मधून शाळा निवडावी.
 
➡️ शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील 
किती मंजूर पदे
किती कार्यरत पदे
शाळेतील रिक्त पदे  
समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे 
बदली पात्र शिक्षकांची पदे
ह्या सर्व शाळा निहाय संख्या दिसतील

➡️ Add tab  वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ऍड केली जाईल.

➡️ आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add  केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे.

➡️ Add केलेली प्रत्येक शाळा save या  tab वर  क्लिक करून  save करावी.

 ➡️ आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून  do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल.

➡️ अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडतांना add preferences  वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save  करावी.

➡️ अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही.

➡️ यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

➡️ संपूर्ण application form भरून सबमिट केल्यानंतर व मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर आपला application form आपल्या रजिस्टर ईमेलवर पीडीएफ स्वरूपात आपणास लगेच प्राप्त होईल.

➡️ तसेच आपणास आपल्या प्राधान्यक्रमामध्ये काही बदल करायचं असल्यास आपण आपला फॉर्म मुदतीपूर्वी withdraw करू शकता व पुन्हा भरू शकता.
 
➡️ वरील माहितीतील प्रत्येक मुद्द्यांशी आपण सहमत असालच असे नाही त्याकरिता  प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.

संवर्ग 2 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम कसा भरावा?
(विशेष संवर्ग भाग-2 महत्त्वाचे मुद्दे)

➡️  विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया आटोपलेली असून त्यांची बदली कोणत्या शाळेत झाली ती माहिती पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे विशेष संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांकरिता  जिल्ह्यातील रिक्त पदांची यादी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्रकाशित करण्यात येईल.

➡️ दिनांक 30 डिसेंबर 2022 ते 4 जानेवारी 2023 दरम्यान विशेष संवर्ग  भाग 2 (पती-पत्नी एकत्रीकरण) च्या शिक्षकांना पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध होईल वरील तारखांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

➡️ विशेष संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांनी  पोर्टल वर जाऊन दोघांपैकी ज्या शिक्षकाला बदली हवी आहे  त्या शिक्षकांनी बदलीसाठी होकार पोर्टल वर जाऊन  यापुर्वीच अपडेट केलेला आहे त्याच शिक्षकाला पुन्हा application form भरावयाचा आहे.

➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षकांना पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत शासन निर्णयातील मुद्दा क्र.1.9.1 ते 1.9.6 प्रमाणे व्याख्येतील प्राधान्यक्रमांनुसार  शिक्षकांच्या बदल्या होतील. याठिकाणी आपली जिल्हा सेवाज्येष्ठता विचारात घेतली जाणार नाही.

➡️ विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना जिल्ह्यांतील निव्वळ रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त जागा प्राधान्यक्रमांमध्ये भरता येतील अर्थातच ह्याच शाळा आपणास पोर्टलवर दिसतील.

➡️ विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग 2 चा लाभ घेतल्यानंतर पुढील बदली प्रक्रियेमध्ये दोघांपैकी एक जरी शिक्षक बदली पात्र होत असेल तर दोघांनाही एक युनिट मानून संवर्ग चार मधून बदली देण्यात येऊ शकते(GR  मुद्दा क्र.4.3.4)

➡️ विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांच्या जोडीदाराने संवर्ग एक मध्ये अर्ज भरला व त्यांची स़वर्ग एक मधून बदली झालीअसल्यास त्यांना पुन्हा विशेष संवर्ग भाग दोन मध्ये फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे विशेष संवर्ग भाग दोन मधील जोडीदार शिक्षक विस्थापित होऊ शकतो.

➡️ विशेष संवर्ग 2 मधील शिक्षकांना  जोडीदाराच्या पंचायत समिती मधील कोणतीही शाळा निवडता येईल येथे 30 किलोमीटर चे अंतर गृहीत धरले जाणार नाही परंतु पंचायत समिती कार्यक्षेत्राबाहेर कार्यालयापासून किंवा शाळेपासून फक्त तीस किलोमीटर परिसरातीलच  30 शाळा निवडता येतील.

➡️ 30 कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात जवळच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात येईल.

➡️ संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरतांना कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त 30 शाळा भरणे अनिवार्य आहेत
 
➡️ जर आपण बदली पात्र नसाल आणि आपणास बदली ची आवश्यकता असेल तर संवर्ग 2 च्या यादीतील आपला प्राधान्यक्रम व उपलब्ध असलेल्या शाळा यांचा समन्वय साधून  जास्तीत जास्त किंवा 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरावा  व आपणास आहे ती शाळा सोयीची असेल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील कारण आपण बदली पात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीचीच शाळा कायम राहील.

परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये अवघड क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे  अशावेळी विशेष संवर्ग भाग दोन मघून आपली बदली न झाल्यास अशावेळी आपल्या जोडीदाराची सेवा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त झाली असेल व शाळेवर 3 वर्षापेक्षा जास्त आणि  पाच वर्षापेक्षा कमी झाली असेल तर अशावेळी आपल्या जोडीदार शिक्षकांचा समावेश अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरतांना तयार करायचे यादीमध्ये सेवाज्येष्ठतेनूसार होऊ शकतो  या संदर्भात कोणतीही शिक्षण विभागाकडून  स्पष्टता नसल्यामुळे  बदली संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा.

➡️ आपण बदली पात्र शिक्षकांच्या यादीमध्ये येत असाल तर निश्चितच जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळतील अन्यथा आपण विस्थापित होऊन पुन्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये आपणास फॉर्म भरावा लागेल.

➡️ ज्या शिक्षकांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त आहे अशा शिक्षकांचा समावेश विशेष संवर्ग भाग दोन मध्ये होतो अशा शिक्षकांपैकी जर एक शिक्षक संवर्ग एक मध्ये येत असेल व त्या शिक्षकांनी संवर्ग एक मधून अर्ज करून बदली मिळाली असेल तर अशा शिक्षकांचा जोडीदार संवर्ग दोन मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेऊ शकतात कारण संवर्ग एकच्या शिक्षकांनी घेतलेल्या बदलीमध्ये सदृश्यता नसल्यामुळे व अद्याप आदेश प्रकाशित न झाल्यामुळे बदलीचा लाभ घेऊ शकतात.

➡️ परंतु अशा स्थितीमध्ये संवर्ग एक शिक्षकाची बदली रद्द होऊन जोडीदाराला लाभ देण्यात येईल.

➡️ तसेच दोघेही पती-पत्नी बदली प्रक्रियेमध्ये येत असतील व त्यापैकी एका शिक्षकांनी संवर्ग एकचा लाभ घेतलेला असेल व दुसरा जोडीदार हा बदलीस पात्र असेल तर त्यांना एक युनिटचा लाभ दिला जाणार नाही.

➡️ ज्या दोन शिक्षकांच्या शाळेमधील अंतर हे 30 किलोमीटरच्या बाहेर असेल व त्यापैकी एकाने आपल्या जोडीदाराजवळ जाण्यासाठी पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत अर्ज केला असेल व  कदाचित त्या शिक्षकाला  पती-पत्नी अंतर्गत  बदली मिळाली नसेल अशा परिस्थितीत आपला जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदाराची बदली पात्र बदली  टप्प्यामध्ये बदली होईल.

विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम कसा भरावा?
पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंक वर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता

➡️ वरील लिंक वर क्लिक  करावे क्लिक  केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP  टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे.

➡️ डाव्या मेनूतील Intra district वर क्लिक करावे.

➡️ त्यातील application form वर क्लिक करावे.

➡️ त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर application type  व action असे दोन ऑप्शन दिसतील.

➡️ Cadre 2 च्या समोर view application चा tab दिसेल application tab वर क्लिक केले की

➡️ Cadre 2 application form वर फॉर्म भरणाऱ्या शिक्षकाची खालील माहिती *स्क्रीनवर दिसेल त्यावर 
शिक्षकाचे नाव 
आडनाव 
शाळेचा यु डायस नंबर 
शिक्षकाचा शालार्थ आयडी 
ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही.

➡️ त्याखाली आपणास आपल्या जोडीदाराच्या व आपल्या शाळेतील अथवा कार्यालयातील अंतर दिसेल ते अंतर निश्चितच 30 किलोमीटरच्या वर असेल.

➡️ त्याखाली आपणास आपला व्याख्येतील प्राधान्यक्रमानुसार प्रकार दिसेल.

➡️ त्यानंतर आपणास आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा आपल्या जोडीदाराचा मोबाईल क्रमांक दिसेल.

➡️ आपल्या जोडीदाराचे नाव दिसेल.

➡️ त्यानंतर आपला जोडीदार ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेचा युडायस क्रमांक दिसेल.

➡️ त्यानंतर आपल्या जोडीदार ज्या शाळेत कार्यरत असेल त्या शाळेचे नाव दिसेल.

➡️ वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही.

➡️ त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल
पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर

➡️ खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास कमीत कमी एक व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल.

➡️ याचाच अर्थ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम आपण निवडू शकता.

➡️ प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मेनू मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down  मधून शाळा निवडावी.
 
➡️ शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील 
किती मंजूर पदे
*किती कार्यरत पदे *
शाळेतील रिक्त पदे  
समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे 
बदली पात्र शिक्षकांची पदे
ह्या सर्व शाळा निहाय संख्या दिसतील

➡️ Add tab  वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ऍड केली जाईल.

➡️ आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add  केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे.

➡️ या ठिकाणी संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या जागा संभाव्य रिक्त जागा म्हणून दाखवल्या जातील व त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व रिक्त जागा दाखवल्या जातील याचाच अर्थ आपणास वरील प्रकारच्या पोर्टलवर दाखविल्या जाणाऱ्या शाळाच   प्राधान्यक्रमांमध्ये भरणे आवश्यक आहे.

➡️ Add केलेली प्रत्येक शाळा save या  tab वर  क्लिक करून  save करावी.

 ➡️ आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून  do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल.

➡️ अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडतांना add preferences  वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save  करावी.

➡️ अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही.

➡️ यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

➡️ संपूर्ण application form भरून सबमिट केल्यानंतर व मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर आपला application form आपल्या रजिस्टर ईमेलवर पीडीएफ स्वरूपात आपणास लगेच प्राप्त होईल.
 
➡️ वरील माहितीतील प्रत्येक मुद्द्यांशी आपण सहमत असालच असे नाही त्याकरिता  प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.

संवर्ग-1 च्या शिक्षकांनी आपली बदली कोठे झाली ते कसे पहावे ?

➡️ राज्यातील विशेष संवर्ग भाग-1 च्या 8500 शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

➡️ विशेष संवर्ग भाग-1 च्या शिक्षकांनी आपली बदली कोणत्या शाळेवर झाली किंवा झाली नाही हे पाहण्याकरिता बदली पोर्टल सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम बदली पोर्लटला लॉगिन करा लॉगिन केल्यानंतर डाव्या मेनूतील transfer order या टॅब वर क्लिक केले की स्क्रीनवर आपली बदली झाली असल्यास ती कोणत्या शाळेत झाली हे दिसेल किंवा आपली बदली झाली नसेल तर त्या प्रकारचा संदेश आपल्याला दिसेल.

➡️ विशेष संवर्ग भाग-1 च्या शिक्षकांना बदली झालेल्या शाळांचे आदेश त्यांना संपूर्ण बदली प्रक्रिया संपल्यानंतर आपल्या इमेलवर पीडीएफ स्वरूपात प्राप्त होतील

संवर्ग 1 मधून बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध होणार -

➡️ बदली प्रक्रिया 2022 मध्ये विशेष  संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी दिनांक 21 डिसेंबर  ते 24 डिसेंबर 2022 दरम्यान आपला पसंतीक्रम पोर्टलवर नोंदविला आहे.

➡️ सद्यस्थितीमध्ये पोर्टलवर विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया दिनांक 25 डिसेंबर 2022 ते 28 डिसेंबर 2022 दरम्यान सुरू असेल

➡️ राज्यस्तरवरून Vensys ला आदैश प्राप्त होताच विशेष संवर्ग भाग 1 मधून बदली झालेल्या शिक्षकांची यादी दिनांक 29 डिसेंबर 2022 ला प्रसिद्ध होऊ शकते.

➡️ तसेच दिनांक 29 डिसेंबर 2022 ला जिल्ह्यातील रिक्त पदांची यादी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्रकाशित करण्यात येईल.

➡️ दिनांक 30 डिसेंबर 2022 ते 4 जानेवारी 2023 दरम्यान विशेष संवर्ग  भाग 2 (पती-पत्नी एकत्रीकरण) च्या शिक्षकांना पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध होईल.

➡️ मागील प्रमाणेच वेळापत्रकात काही बदल न झाल्यास वरील प्रक्रिया तारखा निहाय राबविण्यात येईल.      

पोर्टलवर Form Withdrawal सुविधा उपलब्ध -

➡️ दिनांक 21 डिसेंबर ला ज्या विशेष संवर्ग-1 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम सबमिट केलेत त्यांना एक ईमेल प्राप्त झाला असेल. त्या ईमेल मध्ये आपण पोर्टलवर नोंदवलेला प्राधान्यक्रम उलट सुलट असल्याचे दिसून येत आहे म्हणजेच प्राप्त झालेल्या ई-मेल मधील pdf मध्ये प्रिंटिंग समस्या दिसून येत आहे पोर्टलवरील त्यांचा फॉर्म योग्य आहे परंतु pdf मधील प्रिंटिंग समस्येमुळे आपले समाधान होत नाही व आपणास प्राप्त होणारी pdf ही योग्य असणे आवश्यक आहे.

➡️ शिक्षक, पोर्टलमध्ये लॉग इन करून याची शहानिशा करू शकतात आणि तुमचा प्राधान्यक्रम योग्य आहे की नाही ते पुन्हा तपासू शकतात. 

➡️ तरीसुद्धा आपले समाधान होत नसेल किंवा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये काही चुका झाल्या असल्यास  आपण आपला फार्म त्याखाली विथड्रॉल (Withdrawal)या tab वर क्लिक करून आपला फॉर्म मागे घेऊ शकता व पुन्हा प्राधान्यक्रम भरून फॉर्म सबमिट करू शकता तशी सुविधा पोर्टलवर देण्यात आलेली आहे.

खालील लिंकवर आपला मोबाईल क्रमांक व मोबाईलवर आलेला OTP व कॅपच्या टाकून लॉगिन करू शकता.

बदली पोर्टल नवीन अपडेट -

➡️ जिल्हातंर्गत बदली पोर्टलवर सध्या दिनांक 21 डिसेंबर 2022 ते 24 डिसेंबर 2022 दरम्यान विशेष संवर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांच्या बदली अर्ज संदर्भात शाळांचा प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

➡️ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी ज्या शिक्षकांना बदली नको होती अशा शिक्षकांनी पोर्टलवर नकार नोंदवलेला आहे नकार नोंदवलेल्या शिक्षकांना पोर्टलवर कोणतेही प्रकारची नोंद करण्याची गरज नाही.

➡️ परंतु ज्या विशेष संवर्ग भाग एकच्या बदली पात्र नसलेल्या शिक्षकांनी बदलीसाठी होकार दर्शविलेला आहे अशा शिक्षकांना पोर्टलवर एकही सोयीची शाळा नसेल तरीसुद्धा कमीत कमी एक शाळेचा प्राधान्यक्रम भरून आपला फॉर्म सबमिट करावा.

➡️ कारण  अगोदरच संवर्ग एक मधून अर्ज भरण्यासाठी होकार किंवा नकार दर्शवण्यासाठी संधी मिळाली होती त्या संधीतून आपण होकार दर्शवल्यामुळे आपल्याला आता आपल्या शाळेवरून दुसऱ्या शाळेवर जाण्यासाठी दुसऱ्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे.

➡️ त्यामुळे आहे त्या शाळेवरून आपणास बदली नको असेल तर आपणास न मिळणाऱ्या शाळेचा एक प्राधान्यक्रम भरून फॉर्म सबमिट करावाअसे केल्याने आपणाकडे फॉर्म भरण्याचा प्रूफ राहील.

➡️ परंतु आपण फॉर्म सबमिट न केल्यास इतर कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून किंवा जर आपणास  सर्वसाधारण क्षेत्रातील एकूण सेवा दहा वर्ष व एका शाळेवर तीन वर्ष सेवा झालेली असेल तर आपण सर्वात शेवटच्या राऊंडमध्ये अवघड क्षेत्रातील शाळा रिक्त राहिल्यास तेथे आपले नाव यादी देण्याची किंवा आपली बदली होण्याची शक्यता आहे.

➡️ तसेच आपण अर्ज भरून बदलीसाठी संधी घेतल्यामुळे व पोर्टलमध्ये आपली नोंद संवर्ग एक मधील शिक्षक अशी झाल्यामुळे शेवटच्या राऊंडमध्ये अवघड क्षेत्रातील शाळा मिळण्याचे टळेल. 

विशेष संवर्ग भाग 1 मधील बदली पात्र शिक्षकांकरिता -

➡️ विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक जर बदली पात्र असतील तर त्यांची बदली ही निश्चित होईल.

➡️ बदली पात्र शिक्षकांची बदली होत असल्यामुळे त्यांनाही याच राऊंड मध्ये बदलीने शाळा मिळणे अत्यावश्यक आहे.

➡️ कारण या राऊंडमध्ये आपणास शाळा न मिळाल्यास आपण विस्थापित राऊंडमध्ये जावे लागेल व गैरसोईच्या शाळा घ्याव्या लागतील.

➡️ संवर्ग एक मधील बदली पात्र शिक्षकांना याच राऊंडमध्ये शाळा मिळण्याकरिता आपणास संवर्ग एक च्या यादीचा (Cadre 1 list) व बदली मात्र यादीचा (Eligible List) योग्य तो अभ्यास करणे गरजेचे आहे.

➡️ संवर्ग एकच्या शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या शाळा ह्या त्यांच्या व्याख्येतील प्राधान्य क्रमानुसार मिळणार असल्या मुळे संवर्ग एक च्या यादीतील  (Cadre 1 list) आपला प्राधान्यक्रम व बदली पात्र यादीतील (Eligible List) उपलब्ध जागा यांचा समन्वय साधून आपण प्पसंतीक्रम भरावा जेणेकरून आपणास याच राऊंडमध्ये शाळा मिळेल.

वरील माहिती आपल्या माहितीसाठी आहे. वरील प्रत्येक मुद्द्याशी आपण सहमत असालच असे नाही त्यामुळे आपण फॉर्म भरताना शासन निर्णयाचा व तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

संवर्ग-1  मधील शिक्षकांनी फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी -

दिनांक - 21/12/2022 ते 24/12/2022
(वरील चार दिवसांच्या कालावधीमध्ये संवर्ग-1 शिक्षक प्राधान्यक्रम भरू शकतात.)

➡️ विशेष संवर्ग भाग एकचे शिक्षक खालील लिंकला क्लिक करून आपला मोबाईल नंबर व मोबाईल नंबर वर येणारा ओटीपी व कॅपच्या टाकून पोर्टल लॉगिन करू शकता.

➡️ विशेष संवर्ग-1 मधील शिक्षकाला बदली करायची असेल तर त्यांना किमान 1 शाळेचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल आणि जास्तीत जास्त 30 शाळांचा प्राधान्यक्रम देऊ शकतात. 

➡️ जर संवर्ग 1 ज्या शिक्षकांनी  कोणताही प्राधान्यक्रम दिला नाही तर त्यांना फॉर्म सबमिट करता येणार नाही.

➡️ संवर्ग-1 साठी पसंतीक्रम अनिवार्य नाही जर त्यांनी पसंतीक्रम भरला नाही तर त्यांची संवर्ग-1 मध्ये बदली होणार नाही, तरीसुद्धा बदलीसाठी होकार दिल्यानंतरही बदली नको असेल तर आपल्या प्राधान्यक्रमामध्ये आपल्याला न मिळणारे एक गाव प्राधान्यक्रम टाकून सबमिट केल्यास निश्चितच आपली बदली होणार नाही.

➡️ विशेष संवर्ग भाग मधील येणारे शिक्षक जर बदली पात्र शिक्षक यादीमध्ये असतील तर त्यांची बदली निश्चित होईल म्हणजेच ते आहेत त्या शाळेवर राहणार नाही, त्यामुळे विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांचे नाव जर बदली पात्र यादीमध्ये येत असेल तर त्यांची बदली निश्चित होईल त्यामुळे त्यांनी पसंती क्रम भरताना जास्तीत जास्त शाळांचा पसंती क्रम भरावा जेणेकरून यास बदली प्रक्रियेमध्ये आपणास शाळा मिळेल अन्यथा आपण विस्थापित होऊ शकता.

➡️ विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक जर बदली पात्र शिक्षक असतील आणि त्यांना संवर्ग एक च्या बदली प्रक्रियेमध्ये शाळा मिळत नसते तर त्यांना शाळेवर पाच वर्ष व त्या क्षेत्रामध्ये दहा वर्ष झाल्यामुळे ते बदली पात्र आहेत त्यामुळे ते बदली पात्रच्या बदली प्रक्रियेमध्ये बदली अर्ज भरू शकतात.

➡️ शिक्षक आपला प्राधान्यक्रम जतन (Save) करू शकतात परंतु सबमिट करण्यास विसरू नका अन्यथा तुमचा फॉर्म बदली प्रणालीद्वारे विचारात घेतला जाणार नाही. 

➡️ एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर फॉर्ममध्ये कोणताही बदल शक्य होणार नाही. 

➡️ संवर्ग-1 चे शिक्षक फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा मागू शकतात त्यामुळे बदली पात्र यादीचा अभ्यास करून प्राधान्यक्रम भरवा.

➡️ संवर्ग-1 शिक्षक बदलीसाठी सध्या ज्या शाळेत आहे ती शाळा पसंतिक्रमात निवडू शकत नाहीत. 

➡️ विशेष संवर्ग भाग एक शिक्षकांनी यापूर्वीच पोर्टलवर बदली प्रक्रियेमधून सूट मिळवलेली असेल अर्थातच त्यांना बदली नको असेल असे नोंदवलेले आहे अशा शिक्षकांना या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची पोर्टलवर नोंद करण्याची गरज नाही.

➡️ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना दिनांक 21 डिसेंबर 2022 ते 24 डिसेंबर 2022 अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे वेळ गेल्यानंतर कोणतेही परिस्थितीत शिक्षक आपला प्राधान्यक्रम बदलू किंवा सबमिट करू शकणार नाही.

➡️ संवर्ग-1 फॉर्म सबमिट करण्यापूर्वी शिक्षकांनी त्यांच्या पसंती क्रमाची पडताळणी करावी आणि त्यांनी भरलेला प्राधान्यक्रम योग्य असल्याची खात्री करावी. 

➡️ शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी 4 दिवसांचा अवधी असेल आणि त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी अडचण टाळण्यासाठी तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत उशीर करू नये,  आम्ही सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे प्राधान्यक्रम वेळेत भरावेत. 

➡️ पोर्टल वर वापरला जाणारा ओटीपी ईमेलवर आणि तसेच शिक्षकांच्या मोबाइलवर पाठवले जातात, जर तुमचा ओटीपी तुमच्या इनबॉक्समध्ये दिसत नसेल तर तुमचा जंक ईमेल तपासायला विसरू नका. 

➡️ तुमची  बदली तुमच्या हातात आहे योग्य वेळ द्या आणि संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या आणि त्यानंतरच तुमची प्राधान्यक्रम सबमिट करा घाईघाईने पुढे जाऊ नका आणि नंतर चुकांसाठी पश्चात्ताप करू नका. विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी पसंती क्रम भरताना विशेष संवर्ग भाग एकच्या यादीमधील आपला असलेला क्रमांक व बदलीपात्र यादीमध्ये उपलब्ध असलेल्या शाळा यांचा समन्वय साधून प्राधान्यक्रम भरावा जेणेकरून आपणास बदलीने शाळा मिळेल.

बदली व पदोन्नती बाबत मंत्रालय स्तरावरील अपडेट -

    जिल्हांतर्गत बदली संदर्भात ग्राम विकास मंत्रालय मंत्री महोदयांसोबत चर्चा चालू असली तरीही अद्याप वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया ही सुरळीत चालू आहे. ग्रामविकासमंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने ग्रामविकास मंत्रालय मुंबई येथे मा. अच्युत इप्पर साहेब (कक्ष अधिकारी) यांची भेट घेवून बदलीसह विविध प्रश्नांवर सुमारे ३.५ तास सकारात्मक चर्चा करण्यात आली.

१) संवर्ग १ ते संवर्ग ३ बदली प्रक्रियेत बदली मागताना अशा कर्मचाऱ्यांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागाच मागता येणार आहे, यात सर्वात मोठा अन्याय संवर्ग ३ वर होणार आहे, कारण संवर्ग १ व २ यांनी बदली प्रक्रियेत मागितल्यानंतर बदलीपात्र जागांपैकी उरलेल्या जागाच  मागता येणार आहेत. त्यांना तालुक्यात रिक्त जागा शिल्लक असताना बदली पात्र शिक्षक नसल्यास शेवटच्या विस्थापित राऊंडला किंवा तालुका बाहेर जाण्याची वेळ येणार आहे याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबत ग्राम विकास विभागाने बदली प्रक्रिया अधिक सुस्पष्ट करावी मात्र आता बदली प्रक्रिया सुरू झाल्याने बदली प्रक्रिया थांबवणे व फेरबल करणे सर्वस्वी निर्णय मा.ग्रामविकास मंत्री महोदय घेतील. पण याविषयी काय करता येईल याबाबत मंत्रालय स्तरावर योग्य ती चर्चा करून निश्चित कार्यवाही करणार आहेत.

२) शिक्षण संवर्गातील बदल्या करताना सदरील शासन निर्णय अनेक प्रकारचे बदल करणे भविष्यासाठी उचित ठरतील,त्यात जिल्ह्याची १० वर्षे सेवेची अट वगळून, फक्त विद्यमान शाळेतील किमान ५ वर्षे सेवा व इतर संवर्गासाठी ३ वर्षे सेवेची अट धरणे योग्य ठरेल अशी विनंती केली असता,त्याबाबत पुढील वर्षीच्या बदली धोरणात निश्चितच वरील प्रमाणे अंतर्भाव केला जाणार आहे.

३) १ डिसेंबरच्या २०२२ केंद्रप्रमुख भरती बाबतच्या शासन निर्णयानुसार ५० टक्के पदे ही पदोन्नतीने तर ५० टक्के पदे ही विभागीय परीक्षा पद्धतीने भरली जाणार आहेत. सदरील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक ५.१ नुसार प्रशिक्षित पदवीधर बाबतची व्याख्या अधिक सुस्पष्ट करणे आवश्यक आहे. असे मत मांडताना सन २०१७ च्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षित पदवीधर ही व्याख्या स्पष्ट करताना शिक्षण सेवकाचा तीन वर्षाचा कालावधी वगळता बीए/बीएससी/बीकॉम यासह डीएड किंवा बीएड अशी व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षित पदवीधर समजण्यात यावे असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे, तीच व्याख्या योग्य असून त्याप्रमाणे आपल्या स्तरावरून सर्व जिल्हा परिषदांना स्पष्टपणे निर्देश देण्यात यावेत. अशी विनंती केली असता त्याबाबत देखील लवकरात लवकर शुद्धिपत्रक काढणार आहोत. म्हणजे सर्वांनाच विभागीय परिक्षा देता येईल.

४) आंतरजिल्हा बदलीने बदली झालेल्या शिक्षकांची आपसी सेवा जेष्ठता ग्राह्य धरणेबाबत सदरील सेवाज्येष्ठता ही बदली प्रक्रिया व पदोन्नती प्रक्रिया दोन्हीसाठी सरसकट ग्राह्य धरण्यात यावी अशी विनंती केली असता, याबाबत साहेबांच्या मतानुसार मा. उच्च न्यायालयाचे वरील सेवाज्येष्ठता ग्राह्य धरणेबाबतच्या विविध याचिकेत निर्णय देतांना भिन्न प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे एका निकालात सरसकट सेवाज्येष्ठता ग्रह्य धरावी असे म्हटलेले आहे, तर दुसऱ्या निकालात बदली व पदोन्नतीसाठी अशा दोन प्रकारच्या सेवाजेष्ठता यादी तयार करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, एका निर्णयात शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने, ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार सद्यस्थितीत जिल्हा परिषदांची बदली पोर्टल मध्ये जी स्थिती आहे ती स्थिती जैसे थे ठेवण्याबाबत सुचित केलेले आहे, म्हणजेच काही जिल्हा परिषदेमध्ये जर बदली पोर्टल मध्ये आपसी सेवा जेष्ठता धरली असेल तर ती कायम ठेवावी तर काही जिल्हा परिषदेमध्ये आपसी सेवाजेष्ठता धरली नसेल तर तशीच ठेवावी, भविष्यात या निर्णयासाठी कोर्टाच्या अंतिम आदेशानुसार पुढील योग्य ती कारवाई ग्रामविकास विभाग करणार आहे त्याबाबत देखील आपला पाठपुरावा सुरू राहणार आहे. 

५) पदोन्नती प्रक्रियेसाठी मात्र आपल्या मूळ सेवा पुस्तकात दोन्ही आपसी बदली करणाऱ्या कर्मचाऱ्यंपैकी कमी जुनीअर कर्मचा-यांची नियुक्ती दिनांक ग्राह्य धरावी ही प्रक्रिया सद्यस्थितीत करता येईल.

➡️ वरील ग्रामविकास मंत्री यांच्या कक्ष अधिकाऱ्यां बरोबर झालेल्या बैठकीमध्ये  जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात जे काही मुद्दे आलेले आहेत त्या संदर्भात अद्याप चालू असलेल्या २०२२ च्या बदली प्रक्रियेमध्ये काही बदल होतील असे वाटत नाही परंतु पदोन्नती प्रक्रिया अद्याप चालू नसल्यामुळे त्यामध्ये निश्चितच बदल होतील असं वाटतं जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात जे काही मुद्दे आले आहेत त्या संदर्भात पुढील वर्षी होणाऱ्या बदल्यांमध्ये शासन आदेशामध्ये तसे बदल करण्यात येतील असं मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

जिल्हांतर्गत बदली अपडेट -

विशेष संवर्ग 1 व 2 मधुन अर्ज करणा-या  शिक्षकांचे मुळ कागदपत्रे तपासणीबाबत..!!
  
➡️ शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक 4.2.8 मध्ये नमुद असलेल्या तालुकास्तरीय समितीमध्ये -
1. गट विकास अधिकारी, 
2. गट शिक्षणाधिकारी व 
3. तालुका आरोग्य अधिकारी 
अशी समिती गठीत केलेली असेल.

➡️ जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग-1 मधुन अर्ज करणा-या प्राथमिक शिक्षकांचे मुळ कागदपत्र पडताळणी वरील समिती करेल.

➡️ विशेष संवर्ग-1 मधील शिक्षकांना सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

➡️ विशेष संवर्ग-2 मधुन अर्ज करणा-या प्राथमिक शिक्षकांना 30 कि.मी रस्त्यांच्या अंतराचा दाखला कार्यकारी अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग/जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचा दाखला संदर्भीय शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक 4.3.5 नुसार आवश्यक असल्यामुळे सदरचा दाखला असणे अनिवार्य आहे.

➡️ वरील समिती ही वरील दोन्ही संवर्गातील कागदपत्रांची पडताळणी दिनांक 22/11/2022 ते दिनांक 24/11/2022 दरम्यान करणार आहे व याच दरम्यान सदर समितीच्या अहवालावर संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांच्या अप्राप्त प्रमाणपत्र किंवा अवैद्य प्रमाणपत्र च्या आधारे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सदर शिक्षकांची बदली अर्ज रद्द ठरवणार आहेत.

➡️ दिनांक 25 /11 /2022 ला पुन्हा संवर्ग-1, संवर्ग-2, बदली अधिकार पात्र व बदली पात्र शिक्षकांच्या याद्या नव्याने प्रकाशित करण्यात येतील.

विशेष संवर्ग भाग 1 व 2 संदर्भात महत्वाचे मुद्दे -

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2022 संपूर्णतः 7 एप्रिल 2021 च्या शासन आदेशानुसार व त्या संदर्भात निर्गमित केलेल्या विविध परिपत्रकानुसार राबविण्यात येत आहे. जरी शासन आदेशातिल विविध परिपत्रके व बदली पोर्टल यांच्या संदर्भात विसंगती आढळत असली तरीही आज बदली पोर्टलच्या संदर्भात सद्यस्थितीत असलेली बदली प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे खाली दिलेले आहे.

विशेष संवर्ग (भाग-1)

➡️ दि.३० जून २०२२ रोजी सध्याच्या शाळेवर तीन वर्षे पूर्ण होत नसतील तर कोणत्याही संवर्गातील शिक्षकाची बदली होणार नाही.

➡️ विशेष संवर्ग 1 आणि बदली अधिकारप्राप्त शिक्षक (अवघड क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण केलेले) यांना फक्त बदलीस पात्र शिक्षकांच्याच जागेवर बदलीने जाता येईल. रिक्तपदी जाता येणार नाही.

➡️ विशेष संवर्ग १ मधील शिक्षकाने (जर सध्याच्या क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झाल्यास) बदलीस नकार दिल्यानंतर त्यांची बदली होणार नाही व अवघड क्षेत्रातील प्राधान्याने भरावयाच्या जागांसाठी विचारही होणार नाही.

➡️ विशेष संवर्ग भाग एक मधील ज्या शिक्षकांची नावे बदली पात्र यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा शिक्षकांना बदली फॉर्म भरणे आवश्यक आहेत या ठिकाणी विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांना बदली मधून सूट हवी असल्यास Yes हा पर्याय निवडावा जेणेकरून आपली बदली होणार नाही व जर आपणास बदली मधून सूट हवी नसेल तर No हा पर्याय निवडावा जेणेकरून आपणास बदली मिळेल.

➡️ विशेष करुन विशेष संवर्ग भाग एक च्या शिक्षकांना जर आपल्याला कार्यरतशाळेवर तीन वर्ष झालेले असतील व आपले नाव बदली पात्र यादीत नसताना सुद्धा त्यांना पोर्टलवर बदली पाहिजे असल्यास होकार व बदली पाहिजे नसल्यास नकार नोंदवणे गरजेचे आहे.

➡️ विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांनी बदली पात्र यादीमध्ये नाव असतांना जर बदली अर्ज भरून होकार किंवा नकार न दिल्यास ते प्रशासकीय बदलीस पात्र होतील.

➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असणाऱ्या शिक्षकांनी वरील प्रमाणे होकार दर्शविल्यास पसंती क्रम भरतांना पोर्टलवर आपणास आपल्या आवश्यकतेनुसार पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवता येईल.

➡️ विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा मागता येतील.

➡️ विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांना निव्वळ रिक्त पदांवर (Clear Vacancy) बदली मागता येणार नाही. (G.R. मुद्दा क्र.4.2.6)

➡️ विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या व्याख्येतील प्राधान्यक्रम व सेवाजेष्ठता विचारात घेऊन केल्या जातील.

➡️ विशेष संवर्ग भाग 1 साठी एकदा संवर्ग 1 मधून बदली झाल्यानंतर त्यांना पुन्हा 3 वर्षे विनंती बदली मागता येणार नाही.(G.R. मुद्दा क्र.4.2.7)

➡️ विशेष वर्ग भाग एक मधील शिक्षकांना आपला प्राधान्यक्रम व पसंती क्रमानुसार एकही बदली पात्र शिक्षकाची जागेवर बदली देता आली नाही तर त्यांची बदली होणार नाही.

➡️ विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक हे विशेष संवर्ग भाग दोन मध्ये येत असतील तर त्यांना दोन पैकी कोणत्याही एकाच संवर्गाचा लाभ घेता येईल.

➡️ बदली पात्र यादीमध्ये येत असलेल्या विशेष संवर्ग भाग एक च्या शिक्षकांनी नकार दिला असल्यास पुढील वर्षी सुद्धा त्यांना बदली पात्र यादी मध्ये समाविष्ट केले जाईल.

➡️ विशेष संवर्ग भाग 1 मधून फॉर्म भरणाऱ्या 1.8.1 ते 1.8.20 मधील शिक्षकांना आपापल्या संवर्गानुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. संबंधित प्रमाणपत्र अवैद्य किंवा ते प्रमाणपत्र देण्यास शिक्षक असमर्थ ठरल्यास त्यांचे नाव बदली प्रक्रियेतून रद्द केले जाईल.

विशेष संवर्ग (भाग-2)

➡️ दि.18/11/2022 ते 21/11/2022 विशेष संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांना आपल्या कार्यरत शाळेवर तीन वर्ष पूर्ण झाले असतील तरच पोर्टल वर जाऊन दोघांपैकी ज्या शिक्षकाला बदली हवी आहे त्यांनी फार्म भरून आपल्या जोडीदाराची माहिती फॉर्मवर अपडेट करायचे आहे आपली व आपल्या जोडीदाराची माहिती अपडेट करून सबमिट करायची आहे. 

➡️ ज्या शिक्षकांनी फॉर्म भरला त्या शिक्षकाचा होकार व ज्या शिक्षकांचा फॉर्म भरला नाही त्या शिक्षकाचा नकार समजला जाईल.

➡️ पती-पत्नी यांना सध्याच्या कार्यरत शाळेवर तीन वर्ष झाले असल्यास कार्यालयांमधील अंतर 30 कि.मी. पेक्षा जास्त असेल तर दोघांपैकी ज्यांना बदली हवी आहे, ते विशेष संवर्ग 2 मध्ये फॉर्म भरू शकतात.शासन निर्णयातील मुद्दा क्र.1.9.1 ते 1.9.6 व्याख्येतील प्राधान्य क्रमांनुसार संवर्ग 2 मधील शिक्षकांच्या बदल्या होतील.

➡️ विशेष संवर्ग २ आणि बदलीस पात्र शिक्षक यांना बदलीपात्र शिक्षकांच्या जागी व रिक्तपदी बदलीने जाता येणार.

➡️ विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग दोन चा लाभ घेतल्यानंतर पुढील वर्षी दोघांपैकी एक जरी बदली पात्र होत असेल तर दोघांनाही एक युनिट मानून पुढील बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग चार मधून बदली देण्यात येऊ शकते. (GR मुद्दा क्र.4.3.4)

➡️ विशेष संवर्ग भाग दोन मधील दोन्ही जिल्हा परिषद शिक्षक असल्यास दोघांपैकी कोणालाही आपल्या सोयीनुसार बदली मागता येईल त्या ठिकाणी सेवाजेष्ठतेची अट लागू नाही.

➡️ विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांच्या जोडीदाराने संवर्ग एक मध्ये अर्ज भरल्यास विशेष संवर्ग भाग दोन मधील जोडीदार शिक्षक विस्थापित होऊ शकतो.

➡️ विशेष संवर्ग 2 मधील शिक्षकांना जोडीदाराच्या पंचायत समिती मधील कोणतीही शाळा निवडता येईल परंतु पंचायत समिती कार्यक्षेत्र बाहेर तसेच कार्यालयापासून फक्त तीस किलोमीटर परिसरातील 30 शाळा निवडता येतील.

➡️ विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांची नावे बदली पात्र यादीमध्ये नसतील व ते बदली करू इच्छित नसतील तर अशा शिक्षकांना बदली अर्ज करण्याची गरज नाही. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये अवघड क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी आपली सेवा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त झाली असेल व शाळेवर पाच वर्षापेक्षा कमी झाली असेल तर अशा शिक्षकांचा समावेश अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरताना तयार करायचे यादीमध्ये येऊ शकते त्यामुळे योग्य तो निर्णय घ्यावा.

➡️ विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षक जर बदली पात्र यादीमध्ये त्यांची नावे समाविष्ट असतील तर त्यांना बदली अर्ज करणे सोयीचे राहील अन्यथा बदली पात्र यादीतील शिक्षकांची संवर्ग चार मधून बदली देण्यात येऊ शकते.

➡️ 30 कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात जवळच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात येईल.30 कि.मी.अंतराचा दाखला हा "कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/ कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग" या सक्षम अधिकाऱ्यांचाच ग्राह्य धरला जाईल.(G.R.मुद्दा क्र.4.3.5)इतर कोणताही अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही.

प्रशासकीय मुद्दे -

➡️ विशेष संवर्ग 1 न 2 अर्ज पडताळणीमध्ये चुकीची माहिती भरल्याचे आढळल्यास त्यांचा अर्ज CEO लॉगिनवरून रद्द करण्यात येईल आणि त्यांच्यावर शासन निर्णय दि .28.06.2018 व उपसचिव, ग्रामविकास यांच्या दि.11.08.2022 च्या पत्रानुसार कारवाई होईल.

➡️ दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या लाभांचा इतरांनी जाणीवपूर्वक फायदा घेतल्यास, त्यांच्यावर RPWD Act 1995 व RPWD Act 2016 मधील तरतुदींनुसार कारवाई होऊ शकते.

➡️ विशेष संवर्ग 1 न 2 मधील शिक्षकांवर बदली प्रक्रियेमध्ये किंवा बदली झाल्यानंतर आक्षेप किंवा तक्रार केली असल्यास ,त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात येईल. अशी पडताळणी केल्यानंतर शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी प्रस्तावित करू शकतात. (G.R. मुद्दा क्र.5.10.4 व 5.10.5)

➡️ सदर बदली पोर्टल हे नव्याने अपडेट होत असल्यामुळे या बदली पोर्टलमध्ये प्रत्येक बदली टप्प्यावर तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात त्यामुळे अजूनही या बदली प्रक्रियेमध्ये वेळ लागू शकते.

नवीन बदली पोर्टल सूचना -
ज्या शिक्षकांना फॉर्म भरूनही  मेल आले नसतील तर Help टॅब मध्ये जाऊन मोबाईल क्रमांक, इ-मेल Address व मदत काय हवी याबात कमेंट बॉक्स मध्ये टाकावी. आपणास व्हेरिफिकेशन करून माहिती विचारली जाईल ती मेल द्वारे मागितली जाईल, भरून ध्यावी आपणास फॉर्मची प्रत उपलब्ध होईल..!!

सुधारित वेळापत्रक जाहीर आणि संवर्ग भाग 1 व 2 चे अर्ज भरण्यास सुरुवात..!!

✳️ विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2  च्या शिक्षकांना अर्ज भरण्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे.

✳️ जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक आलेले असून सद्यस्थिती पोर्टल बंद आहे परंतु पोर्टल काही वेळातच शिक्षकांना अर्ज भरण्याकरिता सुरू होईल.

✳️ जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया 2022 करिता शिक्षकांनी स्वतःच्या प्रोफाईलवर स्वतः नोंद केलेल्या तारखेनुसार डेटा अंतिम केला आहे. 

✳️ बदली प्रक्रिया ही 30 जून 2022 या तारखेनुसार राबवली जाणार असल्याने 30 जून 2022 या तारखेपर्यंत जे शिक्षक बदलीपात्र व बदली अधिकार पात्र होत आहेत अशा शिक्षकांची यादी यापूर्वीच ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने प्रसिद्ध केलेली आहे . 

✳️ दि.18/11/2022 पासून विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 यामधील शिक्षकांना फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.  सदर सुविधा 20/11/2022 अखेर उपलब्ध असेल विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 च्या शिक्षकांनी याची नोंद घ्यावी.

✳️ जे शिक्षक शासन निर्णय 7 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 1.8 यातील 1 ते 20 उपप्रकारात 30 जून 2022 पर्यंत येत असतील त्या सर्व शिक्षकांनी तसेच जे शिक्षक शासन निर्णय 7 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 1.9 यातील 1 ते 6 उपप्रकारात 30 जून 2022 पर्यंत येत असतील अशाच शिक्षकांना संवर्ग 1 आणि 2 चा लाभ घेता येईल. 

✳️ चुकीच्या पद्धतीने किंवा खोट्या माहितीच्या आधारे फॉर्म भरल्यास शासन परिपत्रकानुसार संबंधित शिक्षकांचा अर्ज बदली प्रक्रियेतून डिलीट करण्यात येईल याची स्पष्ट कल्पना सर्व शिक्षकांना आपले स्तरावरून देण्यात याव्यात.

✳️ या तीन दिवसांमध्ये विशेष संवर्ग एकलाच होकार किंवा नकार द्यायचा आहे. जे शिक्षक विशेष संवर्ग भाग 2 मध्ये येत असतील  व ते दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील तर दोघांनाही आपली माहिती पोर्टलवर अर्जामध्ये भरून सबमिट करावी लागेल.

✳️ या तीन दिवसांमध्ये विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना होकार किंवा नकार देण्याची सुविधा नाही प्राधान्य क्रम भरतीवेळी ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येऊ शकते.

✳️ सदरचे फॉर्म भरल्यानंतर 

👉 विशेष संवर्ग 1

👉विशेष संवर्ग 2

👉 बदलीपात्र

👉बदली अधिकारपात्र

शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

✳️ 2022 च्या बदल्या दिनांक 30 जून 2022 या तारखेनुसार केल्या जाणार आहेत. त्यामुळे या तारखेला सिस्टिमला व्हॅलीडेशन असणार आहे. 

✳️ बदली बाबत आपणास कोणतीही शंका असल्यास दि.07/04/2021 चा शासन निर्णय व ग्राम विकास विभागामार्फत वेळोवेळी आलेली सूचना पत्रे काळजीपूर्वक वाचावीत तसेच विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकृत VDO काळजीपूर्वक पाहावेत/ऐकावेत.

विशेष संवर्ग भाग-1 च्या शिक्षकांनी अर्ज कसा भरावा?

➡️ पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर पोर्टलच्या डाव्या मेनूमध्ये intra district टॅब दिसेल

➡️ या टॅब वर क्लिक केले की application form  टॅब दिसू लागेल

➡️ त्यावर क्लिक केले की apply cadre 1. व  apply cadre 2
हे दोन टॅब दिसतील

➡️ जे शिक्षक विशेष संवर्ग 1 चा लाभ घेऊ इच्छिता त्यांनी apply cadre 1 वर क्लिक करावे व जे शिक्षक विशेष संवर्ग 2 चा लाभ घेऊ इच्छितात त्यानी apply cadre 2  वर क्लिक करावे

➡️ Apply cadre 1  वर क्लिक केले की एक आपल्याला स्विकरण स्विकारावे लागेल

➡️ विशेष वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांची बदली ही त्यांच्या खालील प्राधान्य क्रमानुसार होईल

➡️ शासन निर्णय 7 एप्रिल 2021 चे आदेशातील 
व्याख्यातील प्राधान्य क्रमानुसार
त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार
जन्मतारखेप्रमाणे
व आडनावातील पहिल्या इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे 
वरील प्राधान्य क्रमानुसार बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल

➡️ तसेच विशेष स़वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे प्रमाणपत्र आपल्या वरिष्ठ कार्यालयाला जमा करणे अनिवार्य आहे तसेच हे प्रमाणपत्र जर अवैद्य ठरल्यास किंवा प्रमाणपत्र देण्यास असमर्थ ठरल्यास वरील शिक्षकांचा बदली अर्ज रद्द करण्यात येईल

➡️ वरील स्विकारण स्विकारल्यानंतर विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना बदली अर्ज दिसू लागेल

➡️ या अर्जामध्ये शिक्षकाचे नाव ,आडनाव, शालार्थ आयडी,व शाळेचा यु-डायस क्रमांक दिसून येईल

➡️ त्याखाली ज्या शिक्षकांचे नाव बदली पात्र यादीमध्ये आलेले असून त्यांना बदलीतून सूट हवी असेल म्हणजेच बदली नको असेल तर अशा शिक्षकांनी dropdown मधून Yes हा पर्याय निवडावा व 

➡️ ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून सूट नको असेल म्हणजेच बदली हवी असेल  तर अशा शिक्षकांनी dropdown मधून No हा पर्याय निवडावा

➡️ त्याखालील dropdown मधून विशेष संवर्गाचा प्रकार निवडावा 

➡️ त्या ठिकाणी Self व Spouse हे दोन पर्याय दिसतील

➡️ Self म्हणजे विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांनी स्वतः संदर्भात असलेल्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या संबंधित असलेला आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा

➡️ Spouse म्हणजे ज्या शिक्षकांचे जोडीदार आजाराने ग्रस्त असतील त्यांनी Spouse हा प्रकार निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या जोडीदाराच्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा

➡️ व आपला अर्ज सबमिट करावा

➡️ शिक्षकाचे वय 53 वर्ष किंवा 53 वर्षापेक्षा जास्त झाले असेल  व त्यांचे नाव बदली पात्र यादीमध्ये असेल तर अशा  शिक्षकांना बदलीतून सूट हवी असेल तर त्यांनी Yes हा पर्याय निवडून Self मधील dropdown मधील 13 क्रमांकाचा मुद्दा प वयाने 53 वर्ष झालेले कर्मचारी हा पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा

➡️ कोणत्याही शिक्षकाला फक्त एका वेळी एकाच संवर्गाचा लाभ मिळू शकेल

 ➡️ एखाद्या शिक्षकांनी संवर्ग एक मध्ये अर्ज केला असेल तर त्याला संवर्ग दोन चा लाभ मिळणार नाही पर्यायाने आपल्या जोडीदार संवर्ग दोन मध्ये असेल तर तो विस्थापित होईल

विशेष संवर्ग भाग-2 च्या शिक्षकांची अर्ज कसा भरावा?

➡️ जे शिक्षक संवर्ग दोन मध्ये येतात त्यांनी अर्ज भरतांना Apply cadre 2 या टॅब वर क्लिक करावे

➡️ क्लिक केल्यानंतर त्याखालील एक स्विकरण स्विकारावे लागेल त्याशिवाय अर्ज दिसणार नाही

➡️ ते खालील प्रमाणे
विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे अंतराचे प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला देणे अनिवार्य आहे हे प्रमाणपत्र देण्यास शिक्षक असमर्थ असेल तर त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल

➡️ वरील प्रकारचे स्विकरण स्विकारल्यानंतर शिक्षकाचा अर्ज स्क्रीनवर दिसून येईल

➡️ अर्जावर शिक्षकाचे नाव ,आडनाव ,शालार्थ आयडी व शाळेचा यु डायस क्रमांक दिसून येईल

➡️ त्याखालील आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कार्यालयातील किंवा शाळेतील अंतर द्यावे लागेल हे अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असेल

➡️ त्यानंतर खालील दिलेल्या dropdown मधून आपल्या विशेष संवर्ग भाग दोन चा प्राधान्यक्रम निवडावा लागेल

➡️ वरील पर्याय विशेष संवर्ग भाग दोनच्या व्याख्येतील प्राधान्य क्रमाने असतील

➡️ जर तुम्ही 1.9.1 पहिला पर्याय पती-पत्नी दोघीही जिल्हा परिषद चे कर्मचारी हा पर्याय निवडल्यास

➡️ त्याखालील जोडीदाराचा शिक्षक प्रकार निवडावा लागेल

➡️ त्याखालील जर आपण Primary हा पर्याय निवडला तर तेथे जोडीदाराचा मोबाईल क्रमांक किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल हा पर्याय दोन्ही पती-पत्नी जिल्हा परिषद चे शिक्षक असून या बदली प्रक्रियेमध्ये असतील अशा शिक्षकांसाठी आहे

➡️ त्याखाली आपल्याला एक स्विकारण स्विकारावे लागेल

➡️ ते खालील प्रमाणे
आपल्या जोडीदाराने संवर्ग एक मधून अर्ज भरलेला असल्यास व आपण पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत विशेष वर्ग भाग दोन मधून अर्ज करत असल्यास दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य असल्यामुळे आपण विस्थापित होऊ शकता हे मला मान्य आहे

➡️ वरील स्विकारण स्विकारल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव, शाळेचे नाव ,शाळेचा यु-डायस क्रमांक स्क्रीनवर दिसून येईल.

➡️ त्याखालील सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सबमिट होईल

➡️ जर आपण जोडीदाराचा शिक्षक प्रकार other than primary हा पर्याय निवडल्यास म्हणजेच हा पर्याय सुद्धा प्राधान्यक्रमातील 1.9.1 एक मधील पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील त्यापैकी एक शिक्षक असेल व एक जिल्हा परिषद चा शिक्षक अथवा कर्मचारी असेल अशांकरिता लागू आहे 

➡️ आपणास जोडीदारचा मोबाईल नंबर किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल

➡️ त्यानंतर जोडीदार चे नाव, शाळेचे नाव, युडायस क्रमांक व उपलब्ध असलेली माहिती टाकून सबमिट करावा

➡️ आपणास जर पहिल्या पर्याय व्यतिरिक्त (1.9.2 ते 1.9.6 )दुसरा कोणताही पर्याय असल्यास तो पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा

➡️ तसेच विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांनी दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य आहे जर दोघांपैकी एकाने संवर्ग एक मधून व दुसऱ्याने संवर्ग दोन मधून अर्ज केल्यास संवर्ग दोन मधून अर्ज करणारा शिक्षक विस्थापित होऊ शकतो

पोर्टलवर फॉर्म कसा भरावा? याबाबत विन्सिस सॉफ्टवेअर कंपनी कडून पाठवलेला VIDEO काळजीपूर्वक पाहावा.
व्हिडिओ पाहण्यासाठी CLICK करा. - CLICK HERE

Online Teachers Transfer Portal -
आपण बदली पात्र आहात की बदली अधिकार पात्र आहात किंवा दोन्ही मध्ये आहात याची माहिती तुम्ही बदली पोर्टलला लॉगीन केल्यानंतर प्राप्त करू शकता. बदली पोर्टलला LogIn करण्यासाठी खाली क्लिक करा.

जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रकात अंशतः बदल -
विषय : सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक.

🔆 विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे -
दिनांक - 5/11/2022 ते 7/11/2022.

🔆 विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे -
दिनांक - 24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस)

🔆 विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे -
दिनांक - 01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस)

🔆 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे -
दिनांक - 08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)

🔆 बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे -
दिनांक - 15/12/2022 ते 17/12/2022 (3 दिवस)

🔆 विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे -
दिनांक - 22/12/2022 ते 24/12/2022 (3 दिवस)

🔆 अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे -
दिनांक - 30/12/2022 ते 01/01/2023 (3 दिवस)

🔆 बदलीचे आदेश प्रकाशित करणे -
दिनांक - 05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस)

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरु संदेश -


ऑनलाइन पोर्टल द्वारे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सुरू असलेल्या बदल्यांमध्ये जिल्ह्यांतर्गत बदल्या सुरू होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. जे शिक्षक बदली पात्र आहेत किंवा बदली अधिकार प्राप्त आहेत त्यापैकी काही शिक्षकांना ई-मेलवर 'टुमारो इंट्रा डिस्टिक ट्रान्सफर विल स्टार्ट' अशा प्रकारचा संदेश प्राप्त झाला आहे. 

आपण जर विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ने तयार केलेले ऑनलाइन बदली पोर्टल ओपन केल्यास त्यावर आपल्याला 'जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया लवकरच सुरू करण्याच्या तयारीत.' 'In preparation of starting Intra District Transfer Process soon.' अशी सूचना इंग्रजी व मराठी मधून देण्यात आलेली दिसून येईल.

त्यामुळे जे शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्थात या संदर्भात  शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो. शासन निर्णयानुसार नेमकी कोणत्या संवर्गाला कधी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध होते हे निश्चित होईल.

शासन निर्णय (दि.29 जून, 2022)
विषय - सन 2022 करीता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण..कालावधी विहित करून देणेबाबत..!!

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत सर्व संवर्गाकरिता अर्ज भरण्याच्या कालावधी या शासन आदेशामध्ये जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण शासन निर्णय PDF स्वरुपात Download करा.


आपण पोर्टलवर लॉगिन केल्यास वरील प्रमाणे सूचना दिसेल किंवा  लॉगिन केल्यानंतर logging disabled असा मेसेज येईल. अर्थातच पोर्टलवर काही बदली संदर्भात घडामोडी घडत आहेत येत्या एक ते दोन दिवसात आपणास बदली प्रक्रिये संदर्भात संवर्गनीहाय वेळापत्रक जाहीर होऊ शकते.

मा. आयुष प्रसाद भाषण (व्हिडीओ) -
दिनांक - 24 सप्टेंबर, 2022

सोलापूर मधील अतिरिक्त विषय शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर पुढच्या आठवड्यात लगेच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार - मा. आयुष प्रसाद (पुणे जि.प. CEO बदली प्रक्रिया समिती प्रमुख)

जिल्हा अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिया संदर्भातील सर्व जिल्हा परिषदांची माहिती अद्यावत झालेली असून फक्त जिल्हा परिषद सोलापूर मधील अतिरिक्त विषय शिक्षक यांचे समायोजन होणे बाकी असल्यामुळे या आठवड्यात बदली प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही या संदर्भात बदली प्रक्रिया समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आयुष प्रसाद यांनी मावळ, पुणे येथे शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले.

मा. आयुष प्रसाद साहेब शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी मावळ पुणे येथे आलेले आहेत. जिल्हाअंतर्गत बदली बाबत बोलताना त्यांनी असे सांगितले की फक्त सोलापूर जिल्ह्यातील राहिलेला पदवीधर शिक्षकांच्या पदस्थापनेचा विषय पुढील दोन दिवसात मार्गी लागला की पुढच्या आठवड्यात बदली प्रक्रिया सुरू होईल.

यापुढे बोलताना ते म्हणाले की पुढील वर्षीपासून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया कधी सुरू होईल किंवा केव्हा होईल हे विचारण्याचे काम राहणार नाही ज्याप्रमाणे आपण कॅलेंडरमध्ये एखादा सण कधी येईल हे निश्चित सांगू शकतो त्याचप्रमाणे दरवर्षी 15 मे पर्यंत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया देखील पूर्ण होईल अशा पद्धतीची व्यवस्था आपण करून ठेवणार आहोत असे देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

बदली प्रक्रिया समितीचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आयुष्य प्रसाद यांनी सदर प्रसंगी नेमके काय म्हटले ते व्हिडिओ स्वरूपात पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता.


जिल्हांतर्गत बदल्या Profile Update सूचना-
खालील सुचना प्रोफाईल अपडेट करण्या संबंधी असून बदली पोर्टलवर आपली माहिती तपासून घ्यावी. बहुतांश शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट झालेले आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची सुचना कार्यालयास देण्याची गरज नाही. ज्या शिक्षकांची माहिती चुकीची आहे त्यांनी कार्यालयास रितसर कळवावे.

Intra district transfers :- 
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक ०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग - १ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.

शासनाच्या संदर्भीय क्र. २ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आता, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने दिनांक ३०.०८.२०२२ रोजी जिल्हा परिषद शिक्षक अभ्यास गटासमवेत व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत खालील मुद्यांवर चर्चा करण्यात आली व सदर बैठकीतीत चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या मुद्यांसंदर्भात खालीलप्रमाणे स्पष्टीकरणात्मक सूचना देण्यात येत आहे.

आज दि ०८/०९/२०२२ रोजी झालेल्‍या व्‍हीसी मध्‍ये दिलेल्‍या सूचनेनुसार प्रत्‍येक शिक्षकाची सध्‍याच्‍या क्षेत्रात (अवघड/ सोपे) रुजू झाल्‍याची तारिख आपल्‍याला आवश्‍यक आहे. या कार्यालयाचे जा.क्र. कार्या-१/पीई-६/२१३ दि ०६/०९/२०२२ या पत्रासोबत दिलेल्‍या Ahmednagar9.9.22 या Excel File मध्‍ये आपल्‍याला सर्व शिक्षकांची सध्‍याच्‍या क्षेत्रात (अवघड/ सोपे) रुजू झाल्‍याची दिनांक नमुद करायची आहे. त्‍याबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.


१. Date Format- 
Excel File आपल्‍या संगणकावर Open करण्‍यापूर्वी संगणकाचा Date Format DD/MM/YYYY असा करुन घ्‍यावा म्‍हणजे फाईल मधील तारखांमध्‍ये तारीख व महिना यांची आपोआप आदलाबदल होणार नाही. तदनंतर सदर Excel File मधील आपला तालुका वगळता इतर तालुक्‍यांची माहिती Delete करावी.

२. नावे Add/ Delete करणे- 
माहितीमध्‍ये अं.जि.ब. २०२२ नुसार अंतर जिल्‍हा बदलीने कार्यमुक्‍त केलेल्‍या तसेच मयत, सेवानिवृत्‍त तसेच सेवानिलंबित झालेल्‍या शिक्षकांची नावे आलेली आहेत. सदरची नावे आपल्‍याला Delete करावयाची आहेत अशा शिक्षकांच्‍या नावांपुढे तसा शेरा नमुद करावा. तसेच कोणी शिक्षक पुर्नस्‍थापित झाले असतील तर त्‍वरीत संपर्क करावा.

३. Current School Joining Date-
मध्‍ये सध्‍याच्‍या शाळेवरील अचूक रुजू दिनांकच टाकावी. (अंतर जिल्‍हा बदलीने जिल्‍ह्यात हजर झाल्‍यानंतरची पहिलीच शाळा असेल तर जिल्‍ह्यातील हजर दिनांक हीच शाळेवरील हजर दिनांक आहे.)

४.आंतर जिल्‍हा बदली-
काही आपसी अंतरजिल्‍हा बदलीने हजर झालेल्‍या प्राथमिक शिक्षकांनी आपसी बदलीमधील दोघांपैकी कनिष्‍ठ कर्मचारी यांची सेवा ग्राह्य धरलेली आहे. तथपि मा. मु.का.अ. जि. प. अहमदनगर यांचे दि १७/०८/२०२२ चे पत्रान्‍वये आपसी आंतरजिल्‍हा बदलीने आलेल्‍या शिक्षकांची जिल्‍हांतर्गत बदलीसाठीची जेष्‍ठता विद्यमान जिल्‍हा परिषदेत प्रत्‍यक्ष रुजू झाल्‍याच्‍या दिनांकापासून गणण्‍यात येणेबाबत सुचित केलेले आहे. तरी आपसी आंतरजिल्‍हा बदलीने हजर झालेल्‍या शिक्षकांची अहमदनगर जिल्‍ह्यातील हजर दिनांक Current District Joining Date या रकान्‍यात नोंदवावी.

५. Current School Area Joining Date (Difficult/ Non-Difficult)-
या रकाण्‍यात संबंधीत शिक्षक सध्‍या ज्‍या शाळेत कार्यरत आहे त्‍या शाळेचे जे क्षेत्र आहे (सोपे/ अवघड) त्‍या क्षेत्रात ते केंव्‍हापासून कार्यरत आहे ती दिनांक नमुद करावी. सध्‍याच्‍या शाळेचे क्षेत्र ठरवताना सन २०१९ च्‍या अवघड क्षेत्राची यादी गृहीत धरावी. सध्‍याच्‍या शाळेच्‍या क्षेत्रात (सोपे/ अवघड) रुजू झाल्‍याची तारीख नोंदवीताना नोंदवीलेल्‍या तारखेपासून संबंधीत शिक्षक सलग (शाळा बदलली असेल तरी) त्‍याच क्षेत्रात कार्यरत असावा.

६. Worked 10 Years- 
ही बाब काळजीपूर्वक तपासावी कारण येथील माहितीवर शिक्षक बदलीपात्र आहे अथवा नाही हे ठरते. या रकाण्‍यात सध्‍याच्‍या क्षेत्रात (सोप्‍या किंवा अवघड) दि ३०/०६/२०२२ या संदर्भ दिनांकास जर सलग १० वर्षे सेवा झाली असेल तर Yes येईल व नसेल तर No येईल.

७. ELIGIBLE-
संदर्भ दिनांकास सध्‍याच्‍या क्षेत्रात १० वर्षे व सध्‍याच्‍या शाळेत ५ वर्षे सेवा असे दोन्‍ही निकष ज्‍या शिक्षकाचे पूर्ण होत असतील ते बदलीपात्र होतील (ELIGIBLE). दोन्‍हीपैकी एक जरी निकष पुर्ण होत नसेल तर ते शिक्षक बदलीपात्र होणार नाहीत.

८. ENTITLED- 
सन २०१९ च्‍या अवघड क्षेत्राच्‍या शाळांमध्‍ये कार्यरत शिक्षकांना संदर्भ दिनांकास सलग ३ वर्षे पुर्ण होत असलील तर ते बदली अधिकारप्राप्‍त (ENTITLED) होतील. जर अवघड क्षेत्रात विहित कालवधी पुर्ण होत नसेल तर बदली अधिकारप्राप्‍त होणार नाहीत (NOT ENTITLED).

९. दुरुस्‍तीचा नमुना-
Current School Area Joining Date (Difficult/ Non-Difficult) या रकाण्‍यातील माहिती आपण सादर केलेल्‍या Excel File मधुन घेण्‍यात येईल व इतर काही दुरुस्‍ती असेल तर दि ०६/०९/२०२२ रोजीच्‍या पत्रातील विहित नमुन्‍यात सादर करावी.

१०. Background Color- 
ज्‍या माहितीमध्‍ये बदल केला आहे त्‍या Cell चा Background Color Yellow (पिवळा) करावा व फक्‍त आपल्‍याच तालुक्‍याच्‍या माहितीची हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी विहित मुदतीमध्‍ये कार्यालयास माहितगार कर्मचा-याच्‍या हस्‍ते सादर करावी.


शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या होणारच- 
(ग्राम विकास मंत्री मा. गिरीश महाजन)

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया देखील शिक्षकांना ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज सादर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या विधान भवनात अधिवेशनादरम्यान जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली संदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री माननीय श्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. त्यांच्या उत्तरानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा जिल्हा अंतर्गत बदलीसाठी दिनांक 7 एप्रिल 2021 च्या दोन स्वतंत्र शासन निर्णय सुधारित धोरनानुसार निर्गमित करण्यात आले आहे. शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया दिनांक 1 ते 31 मे पर्यंत पूर्ण करण्याबाबत सदर शासन निर्णय मध्ये सुचित केले आहेत.

तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे सदर ऑनलाईन द्वारे बदली प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करणे शक्य झाली नाही. सद्यस्थितीत जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी शिक्षकांनी अर्ज सादर करण्याची कार्यवाही पूर्ण झाली असून जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी शिक्षकांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज सादर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.

वरील उत्तर माननीय ग्राम विकास मंत्री यांनी दिलेले असल्यामुळे आंतर जिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे आता जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्यास कोणतीच अडचण उरली नाही व आजच्या ग्रामविकास मंत्र्यांनी विधान भवनात दिलेल्या उत्तरानुसार जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया देखील सुरू होणारच अशी खात्री वाटते.

Post a Comment

0 Comments