भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत "मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान” ची अंमलबजावणी करणेबाबत..!!
राज्यात सन २०२६-२७ पर्यंत (इयत्ता ३ री) पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता ३ री पुढे गेलेल्या तथापि, अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यासाठी “निपुण भारत" अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यास शासन मान्यता देत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत निर्गमित निपुण भारत अभियान यशस्वी करण्यास आवश्यक 10 PDF Download करण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला स्पर्श करा.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६ २७ पर्यत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, असे ठळकपणे नमूद आहे. वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्याना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वानी सर्वकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्याच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे.
त्यासाठी भारत सरकारने “समग्र शिक्षा” मध्ये निपुण भारत (National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता ३ री पर्यत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याकरिता कृती आराखडा तयार करणे, विषयसूची व प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. यासाठी जिज्ञासूपणास वाव देणारा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य (ऑफलाईन व ऑनलाईन). निश्चित क्षमता विधाने (Learning Competencies) व अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes), शिक्षक सक्षमीकरण, मूल्यमापनाची तंत्रे इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे. सध्या इयत्ता ४ थी व ५ वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी मुलभूत कौशल्ये प्राप्त केली नाहीत, त्यानांही आवश्यक नैपुण्य प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, समवयस्क विद्यार्थ्यासोबत गटकार्य व वयानुरूप पूरक अध्ययन साहित्य (छापील व डिजिटल स्वरूपात) उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रामध्ये मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची आवश्यकता :-
दिनांक २२ जून, २०१५ च्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातील शाळांमध्ये नियमितपणे जाणाऱ्या प्रत्येक मुलाने मुलभूत अध्ययन क्षमता प्राप्त करणे, कोणतेही मूल अभ्यासात मागे न राहणे हे ध्येय होते. याकरीता अधिकाऱ्यांनी, शाळा व्यवस्थापनाने व अधिक महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांनी या कार्यक्रमाला गती दिली. सन २०१४,२०१६ व २०१८ च्या ASER अहवालानुसार या कार्यक्रमास प्रचंड यश मिळाले. तथापि, कोविड १९ च्या वैश्विक महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला.
■ युनेस्कोने केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील विद्यार्थ्याचा शालेय शिक्षणाचा ६५% ते ७४% वेळ वाया गेला आहे.
■ अझिम प्रेमजी विद्यापीठाने सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, केवळ ४२% मुले, ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहू शकली. ज्या मुलांना ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहणे शक्य झाले. त्यांच्या बाबतीतही सदर संधी अपेक्षित परिणामकारक ठरली नाही. बहुसंख्य शिक्षक ऑनलाईन वर्गामध्ये दररोज प्रत्येक इयत्तेला एकच तास शिकवू शकले. ८०% पेक्षा अधिक शिक्षकांना ऑनलाईन विद्यार्थ्याबरोबर भावनात्मक संपर्क ठेवणे कठीण गेले व ९०% पेक्षा अधिक शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन परिणामकारकरित्या करणे अशक्य झाले.
■ अशियन विकास बँक २०२१ नुसार. शाळा बंद राहिल्यामुळे ५ अशियन देशांमधील (भारतासह) मुलांच्या भावी सरासरी कमाईच्या ३.५% ते ४.७% नुकसान झाले. तसेच दक्षिण आशियाच्या सन २०२० सालच्या एकूण ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५% ते ७% नुकसान झाले.
■ एका सर्वेक्षणानुसार. शाळा आधीच सोडलेल्या ३% मुलांबरोबरच ६% मुले शाळेत परत येण्याची शक्यता नाही. (ए. एस. ई. आर. २०१९) महामारीनंतर शिक्षण व्यवस्थेमधून आणखी २४ दशलक्ष मुलांची गळती होईल. म्हणून सध्याची स्थिती व गेल्या कालावधीत शाळा सतत बंद राहिल्यामुळे झालेले नुकसान लक्षात घेता पुढील काळात शिक्षणाचा पाया "पायाभूत शिक्षण" असणे, आवश्यक आहे.
0 Comments