Subscribe Us

जिल्हांतर्गत बदली- 2022 | All Demo Video (Vinsys Transfer Software)

जिल्हांतर्गत बदली- 2022 | All Demo Video (Vinsys Transfer Software) 


Video No.14
तुमचे प्रश्न, आमचे उत्तर ? बदलीपात्र (संवर्ग ४)

    जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया २०२२ अंतर्गत संवर्ग ४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदलीसाठी अनेक शिक्षकांना काही शंका आहेत अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 23 जानेवारी, 2023) खालीलप्रमाणे-


Video No.13
बदलीपात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ? (Eligible - Round 1)सविस्तर माहिती

    बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवल्यानंतर पुन्हा एकदा रिक्त पदांची सुधारित यादी प्रणालीवर प्रसिद्ध होईल. त्यानंतर बदलीपात्र शिक्षकांसाठी पहिली फेरी राबवली जाईल. यामध्ये बदलीपात्र शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरायचे याबाबतची सविस्तर माहिती या विडियो मध्ये दिलेली आहे. संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी विडियो शेवट पर्यन्त पाहावा.

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 20 जानेवारी, 2023) खालीलप्रमाणे-


Video No.12
बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती

    विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांची प्रणालीद्वारे संगणकीय रित्या बदली प्रक्रिया राबवली जाईल व पुन्हा एकदा रिक्त पदांची यादी प्रणालीवर प्रसिद्ध होईल. बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरायचे याबाबतची सविस्तर माहिती या विडियो मध्ये दिलेली आहे. संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी विडियो शेवट पर्यन्त पाहावा.
शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 09 जानेवारी, 2023) खालीलप्रमाणे-


Video No.11
विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती.

    विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम दिल्यानंतर प्रणालीद्वारे संगणकीय रित्या बदली प्रक्रिया राबवली जाईल. पुन्हा एकदा रिक्त पदांची यादी प्रणालीवर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम भरण्यासाठी दिले जातील. विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरायचे याबाबतची सविस्तर माहिती या विडियो मध्ये दिलेली आहे. संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी विडियो शेवट पर्यन्त पाहावा.

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 27 डिसेंबर, 2022) खालीलप्रमाणे-


Video No.10
विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती.
    मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आक्षेपांवर अंतिम निर्णय दिल्यानंतर पुन्हा एकदा बदलीपात्र, बदली अधिकारप्राप्त, विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांच्या याद्या प्रणालीवर प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंत विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम भरण्यासाठी दिले जातील. विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरायचे याबाबतची सविस्तर माहिती या विडियो मध्ये दिलेली आहे. संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी विडियो शेवट पर्यन्त पाहावा.

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 20 डिसेंबर, 2022) खालीलप्रमाणे-


Video No.9

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या अपीलांवर कसा निर्णय द्यावा? सविस्तर माहिती.
    जर शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे याद्यांबद्दल आक्षेप नोंदवला असेल आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय शिक्षकांना मान्य नसेल तर त्या शिक्षकांना पुन्हा एकदा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपील करण्याची सुविधा प्रणालीमध्ये दिलेली आहे. या विडियो मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षकांनी नोंदवलेल्या आक्षेपांवर कसे निर्णय देऊ शकतील तसेच शिक्षकांचे प्रोफाईल कसे सुधारित करू शकतील व जर विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील अर्ज अवैध असल्यास ते कसे रद्द करू शकतील याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 13 डिसेंबर, 2022) खालीलप्रमाणे-



Video No.8
शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या आपीलांवर कसा निर्णय द्यावा? सविस्तर माहिती.
    बदलीपात्र, बदली अधिकारप्राप्त, विशेष संवर्ग भाग १ व भाग २ या सर्व याद्या प्रणालीवर प्रसिद्ध झाल्यावर शिक्षकांना त्या याद्यां बद्दल काही आक्षेप असल्यास शिक्षण आधिकाऱ्यांकडे अपील करण्याची सुविधा प्रणालीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या विडियोमध्ये शिक्षण आधिकारी त्यांच्याकडे आलेल्या आपीलांवर कसे निर्णय देऊ शकतील तसेच शिक्षकांचे प्रोफाईल कसे सुधारित करू शकतील व जर विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील अर्ज अवैध असल्यास ते कसे रद्द करू शकतील याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 30 नोव्हेंबर, 2022) खालीलप्रमाणे-


Video No.7
शिक्षकांनी अपील कसे करावे? सविस्तर माहिती.
    बदलीपात्र, बदली अधिकारप्राप्त, विशेष संवर्ग भाग १ व भाग २ या याद्यांवर आक्षेप घेण्याची सुविधा प्रणालीमध्ये देण्यात आलेली आहे. या याद्यांमधील दुरुस्तीसाठी शिक्षक प्रथम शिक्षण अधिकाऱ्यांकडे अपील करू शकतात. परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय शिक्षकास मान्य नसेल तर शिक्षक पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपील करू शकतात. शिक्षकांनी अपील कसे करावे याबाबत सविस्तर माहिती येथे देण्यात आलेली आहे.

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 29 नोव्हेंबर, 2022) खालीलप्रमाणे-


Video No.6
बदलीपात्र व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची यादी पुन्हा प्रसिद्ध करणे? सविस्तर माहिती.
    या आधी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी बदलीपात्र व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची यादी जाहीर केलेली आहे परंतु शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग १ व भाग २ चे अर्ज भरल्यानंतर त्यामध्ये बदल होऊ शकतात म्हणून गट शिक्षण अधिकारी बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी पुन्हा एकदा प्रणालीवर कश्या प्रसिद्ध करतील व विशेष संवर्ग भाग १ व भाग २ यादी देखील कशी प्रसिद्ध करतील? याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 28 नोव्हेंबर, 2022) खालीलप्रमाणे-


Video No.5
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष संवर्ग भाग १ व भाग २ अर्ज कसे रद्द करावे?

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 21 नोव्हेंबर, 2022) खालीलप्रमाणे-


Video No.4
शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग-1 व  भाग-2 अर्ज कसा भरावा?
    या विडियोमधून शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग १ व भाग २ अर्ज कसा भरावा या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच ही बदली प्रक्रिया शासन निर्णयाला अनुसरूनच करण्यात येत असल्याने कृपया जिल्हांतर्गत बदलीचा शासन निर्णय बदलीपूर्व वाचवा.

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 11 नोव्हेंबर, 2022) खालीलप्रमाणे-


Video No.3
रिक्त पदांची यादी कशी भरावी? सविस्तर माहिती.-
    गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर कश्याप्रकारे अपलोड केल्या जाणार याबाबत सविस्तर माहिती या Video मध्ये देण्यात आलेली आहे.

गट शिक्षणाधिकारी -
(स्वतःच्या तालुक्यातील रिक्त पदांची माहिती अपलोड करणे.)
शिक्षणाधिकारी -
(सर्व तालुक्यांची रिक्त पदांची यादी पडताळणे.)
मुख्य कार्यकारी अधिकारी -
(संपूर्ण जिल्ह्याची रिक्त पदांची यादी जाहीर करणे.)

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 28 सप्टेंबर, 2022) खालीलप्रमाणे-

 

Video No.2
अवघड क्षेत्र बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या कशा प्रसिद्ध होतील?

    महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाने शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणालीसाठी नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. टप्पा क्रमांक 2 यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता टप्पा क्रमांक 3 ची सुरुवात झाली आहे.

■ जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया कशी राबवली जाईल?
■ या बदली प्रक्रियेत कोण कसा सहभाग घेऊ शकतो?
■ या बदली प्रक्रियेचे निकष काय असतील?

या संदर्भात सविस्तर माहिती बघण्याकरिता खालील व्हिडिओ बघा..!!

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 2 सप्टेंबर, 2022) खालीलप्रमाणे-


Video No.1
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया प्राथमिक माहिती -
    खालील व्हिडीओच्या माध्यमातून आपण जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे कशी राबवली जाणार? यामध्ये अवघड क्षेत्र, संवर्ग, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष, एकूण बदली सेवा, अधिकार प्राप्त शिक्षक, विशेष संवर्ग भाग-1 व भाग-2, बदली पात्र शिक्षक व शासन निर्णयानुसार बदलीची इतर प्राथमिक माहिती पाहणार आहोत.

शासनाचा अधिकृत व्हिडीओ (दि. 25 ऑगस्ट, 2022) खालीलप्रमाणे-


Post a Comment

0 Comments