Subscribe Us

जिल्हांतर्गत बदली- 2022 | Phase : 2 (New Letest Update) संपूर्ण माहिती

जिल्हांतर्गत बदली- 2022 | Phase : 2 (New Letest Update) संपूर्ण माहिती


आंतरजिल्हा शिक्षक बदली शिक्षक याद्या-2022
(आंतरजिल्हा शिक्षक बदली दुरुस्ती यादी-2022)

आंतरजिल्हा बदली साठी अर्ज केलेल्या शिक्षकांना कळविण्यात येते की, Incoming आणि Outgoing ची यादी राज्यस्तरावरून प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु त्या यादीमध्ये District Joining Date च्या कॉलम मध्ये School Joining Date आलेली होती. राज्यस्तरावरून ती दुरूस्त करून Disrat Joining Date आणि Mediam सह Rewise याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत. बाकी कुठलाच बदल करण्यात आलेला नाही.


!! सर्व जिल्ह्याची एकत्रित येणारे - जाणारे शिक्षक बदली यादी !!

बदलीसाठी आवश्यक कागदपत्रे व नमुना Pdf -

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना बदली प्रस्ताव तयार करतांना काही आवश्यक कागदपत्रे व नमुन्यांची गरज भासते. आपले काम सोपे व्हावे म्हणून खाली काही कोरे नमुने व pdf दिली आहे. 

1) आंतरजिल्हा बदली प्रस्ताव -

2) कार्यमुक्ती रिपोर्ट (कोरे नमुने) -

3) बदली प्रमाणपत्र (कोरे नमुने) -

4) हजर रिपोर्ट (कोरे नमुने) -

5) आवश्यक कागदपत्रे Pdf -

खालील Click Here बटनाला स्पर्श करून आवश्यक कागदपत्रे Download करा.

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात..!!
(लवकरच जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार)

1) आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून लवकरच म्हणजे दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी आंतर जिल्हा बदली आदेश निर्गमित होणार आहेत.

2) या अगोदर दिनांक दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट 2022 पर्यंत सर्व जिल्हा परिषदांनी आपले रोस्टर पोर्टलवर अपलोड केले होते. त्यानंतर 4 ऑगस्ट 2022 ला पोर्टलवरच रोस्टर सर्वांसाठी खुले झाले.

3) सर्व जिल्हा परिषद शिक्षकांनी ज्यांना इतर जिल्हा परिषदेमध्ये बदली करून घ्यायची आहे त्यांनी दिनांक 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2022 पर्यंत आपले ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.

4) सदर अर्जंट अर्जांची पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर दिनांक 12 ऑगस्ट 2022 ते 16 ऑगस्ट 2022 म्हणजे आजपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

5) मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर आज आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील संवर्ग एक व दोन यांचे अर्ज पडताळणी पूर्ण झाल्यानंतर.

6) आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील अर्जांवर दिनांक 17 ऑगस्ट 2022 ते 20 ऑगस्ट 2022 पर्यंत पोर्टल वरील प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

7) व अंतर जिल्हा बदलीचा अंतिम टप्पा म्हणजे आंतरजिल्हा बदली आदेश निर्गमित होणे हे दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी अपेक्षित आहे.

8) म्हणजेच ज्यांनी अंतर जिल्हा बदली ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत व त्यांनी भरलेली माहिती पूर्णपणे अचूक आणि बरोबर आहे आणि उपलब्ध संवर्गानुसार पद त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहे अशा शिक्षकांच्या बदल्या इच्छित जिल्हा परिषदेमध्ये होणार आहेत त्यांचे आदेश दिनांक 21 ऑगस्ट 2022 ला मिळणार आहेत.

9) 21 ऑगस्ट 2022 ला आंतरजिल्हा बदली आदेश निर्गमित झाल्यानंतर पोर्टलवर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी पुढील प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. 

आंतरजिल्हा बदली ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वेळापत्रक-
(आजचे ग्रामविकास विभागाचे पत्र)

आंतर जिल्हा बदली प्रक्रिया तांत्रिक कारणासह व अन्य कारणास्तव सदर प्रक्रियेस कार्यरत होण्यासाठी काही विलंब झाला आहे. मात्र आता ऑनलाईन द्वारे बदल्या करण्यासाठी कार्यवाही पूर्ण झाली असल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बाबत वेळापत्रक आजच्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

आज दिनांक एक ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे जिल्हा परिषद शिक्षक आंतरजिल्हा बदली 2022 आंतरजिल्हा बदल्या वेळापत्रक जाहीर करणारे पत्र पुढीलप्रमाणे.

बहुप्रतीक्षित ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू झाली असून दिनांक 6 ऑगस्ट 2022 पासून 9 ऑगस्ट 2022 पर्यंत शिक्षकांना ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे अंतर जिल्हा बदलीची कार्यवाही दिनांक 10 ऑगस्ट 2022 ते 12 ऑगस्ट 2022 या तीन दिवसात होणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित होणार आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांचे रोस्तर म्हणजेच बिंदू नामावली दिनांक 2 ऑगस्ट ते तीन ऑगस्ट 2022 या दोन दिवसात अपलोड करावयाची आहे.

दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी सर्व जिल्हा परिषदांची रोस्टर म्हणजेच बिंदू नामावली प्रसिद्ध होणार आहे.

सर्व शिक्षकांना अवलोकनाससाठी बिंदू नामावली दिनांक 4 व 5 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रक्रिया-
(6 जुलै 2022 VC मधील ठळक मुद्दे)

✳️ प्रत्येक जिल्ह्याच्या टोस्टरची अचूक माहिती मेल वरून मागवली. (विलंब टाळण्यासाठी यापूर्वीच सूचना दिल्या होत्या.)

1) ती माहिती कंपनीला देऊन फेज 2 (आंतरजिल्हा बदली प्रक्रिया) सुरु करण्याबाबत सूचना देण्यात येतील असे सांगितले.

2) आंतरजिल्हा बदली प्रक्रिया करिता 31 जुलै पर्यन्त मुदत घेतली असल्याने अन्य तांत्रिक बाबींची अडचण येणार नाही.

✳️ जिल्हानंतर्गत बदल्या वेळेत होण्यासाठी यंदा प्रत्येक संवर्गला कालावधी कमी करण्यासाठीचा शासन निर्णय काढला असल्याबाबत सांगण्यात आले.

1) जिल्हा अंतर्गत बदल्यांना 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ

2) शिक्षकांसाठी profile अपडेट करणे बंद झालेले असून BEO ना फोर्स ACCEPTANCE द्वारे शिक्षक profile accept करावे लागेल.

3) शिक्षक प्रोफाईल दुरुस्ती पूर्ण करणे.

Post a Comment

0 Comments