Subscribe Us

निष्ठा 3.0 प्रशिक्षण व प्रमाणपत्र बाबत काही उपयुक्त व महत्वपूर्ण टिप्स | NISHTHA 3.0 (FLN)

निष्ठा 3.0 प्रशिक्षण व प्रमाणपत्र बाबत काही उपयुक्त व महत्वपूर्ण टिप्स | NISHTHA 3.0 (FLN)


📱 निष्ठा प्रशिक्षणासाठी काही उपयुक्त व महत्वपूर्ण टिप्स -

1) Whats app वर आलेल्या link सिलेक्ट केल्यावर खाली बरेच पर्याय दिसतील, त्यामधील diksha app हा पर्याय निवडावा. आणि link आपण Diksha app मधूनच open कराव्यात.

2) दिलेल्या लिंक मधून कोर्स सुरु करू शकता किंवा कोर्स सुरु करण्यासाठी प्रोफाईल मध्ये खाली जावून पुन्हा भाग घेवू शकता. प्रोफाईल मध्ये खाली तुमचे सर्व झालेले पूर्ण व चालू कोर्स दाखविले जातात. कोर्स झाल्यावर येथूनच प्रमाणपत्र download करु शकता.

3) दिलेल्या मुदतीत सर्व कोर्स सुरु करून ठेवावेत. एकदा सुरु केलेला कोर्स आपण तो चालू महिन्यात कधीही व केव्हाही पूर्ण करू शकतो. आपण सर्व कोर्स एकाच वेळी सुरु करू शकतो व आपल्या वेळेनुसार पूर्ण करु शकतो.

4) लिंक मधून कोर्स सुरु करताना कोर्स चे नाव दिसल्यानंतर त्याला open करा, त्यावेळी चेक box ला क्लिक करून प्रोफाईल तपशील शेअर करा. त्यानंतरच शिक्षण सुरु करून कोर्स ला सुरवात करावी.

5) कोर्स सुरु केल्यानंतर ज्या pdf file दिसतील त्या सर्व वाचन करत खाली यावे. थोडक्यात pdf वर सरकवणे pdf १०० % वाचणे आवश्यक आहे. व्हिडीओ शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे.

6) सर्वात शेवटी ४० प्रश्नांची प्रश्नावली दिली आहे. त्यामध्ये ४ पर्यायांपैकी योग्य पर्याय विचारपूर्वक सिलेक्ट करावा. कारण यावेळी प्रत्येक प्रश्नाला चुकीचे उत्तर सांगितले जात नाही किंवा try again हि सूचना देखील दिली जात नाही. बरोबर पर्याय दाखवत नसल्याने योग्य पर्याय सिलेक्ट करून next जायचे आहे. सर्वात शेवटी ४० पैकी गुण दाखवले जातात.

7) प्रश्नावली सोडवण्याची संधीही मर्यादित केली आहे. कोर्स पूर्ण करण्यासाठी ७० % (40 पैकी 28) गुण आवश्यक आहे. Maximum 3 Attempts मध्ये तुम्हाला प्रश्नावली सोडवावी लागणार आहे. पहिल्या प्रयत्नात जर आपण 70% गुण मिळवण्यास अपयशी ठरलात तर तुम्हाला अजून २ संधी दिली जाईल.

8) पहिल्या वेळी प्रश्नावली सोडवल्या नंतर तुमचे गुण दाखवले जातात. ज्यावेळी ४० पैकी २८ पेक्षा कमी गुण मिळतात. त्यावेळी Redo नावाचा ऑप्शन दाखवला जातो. Redo ला क्लिक करून तुम्ही ती प्रश्नावली पुन्हा सोडवू शकता किंवा तुम्ही प्रोफईल मध्ये जावून हि पुन्हा सोडवू शकता.

9) प्रोफाईल मध्ये जावून त्या कोर्स ला click करून थेट खाली जावे. कोर्स विभागामध्ये खाली जावून मूल्यमापन ला click करून देखील तुम्ही २ रा व ३ रा प्रयत्न करू शकता. या वेळी तुम्हाला तुमची कितवी संधी आहे त्याची सूचना दिली जाईल. जर तुमच्या तिन्ही संधी संपल्या असतील तर तुमच्या तिन्ही संधी संपल्याचे स्क्रीन वर दिसेल.

10) आपल्या मराठी माध्यमाच्या तिन्ही संधी संपल्या असतील तर आपण इतर माध्यमांच्या लिंक चा वापर करून, इतर हिंदी किंवा इंग्रजी माध्यमांचा वापर करून कोर्स पूर्ण करू शकतो. पण त्या साठी इतर माध्यमांच्या लिंक दीक्षा app मधून दिलेल्या मुदतीत open करून सुरु कराव्या लागतील.

11) मराठी माध्यमातून तीन संधी संपल्या असतील तर शेवटचा पर्याय अत्रण दीक्षा app open करून डाव्या कोपन्यात असलेल्या वापरकर्ता जोड़ा या tab मधून आपलेच नाव पुन्हा जोडून विचारलेली माहिती अपडेट करावी व नंतर whats app वर जावून आलेली लिंक दीक्षा मधून open करून पुन्हा पहिल्यापासून कोर्स पूर्ण करू शकता..

📱 निष्ठा प्रशिक्षण प्रमाणपत्राबाबत महत्वाच्या टिप्स - 

काही प्रशिक्षणार्थी यांचे 70% गुणांकन प्राप्त होऊन देखील सोडविलेल्या मॉड्युल्सचे प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याची समस्या प्राप्त झाल्या आहेत.

1) शिक्षकांनी योग्य पद्धतीने प्रश्नावली सोडवल्यास 70% गुण (४० पैकी २८ गुण) मिळाल्यास प्रमाणपत्र दिसतेच. 70% गुण मिळणे प्रमाणपत्रासाठी बंधनकारक आहे.

2) 70% गुणांकन मिळूनसुद्धा प्रमाणपत्र मिळत नसेल तर प्रथमतः आपले दीक्षा app अपडेट करावे.

3) तसेच आपण सोडवत असणारे मॉड्युल 100% पूर्ण असे दाखवत असल्याची खात्री करावी. तसे नसल्यास बाजूच्या तीन डॉट्स मध्ये जाऊन sync progress या पर्यायावर क्लिक करावे.

4) याचबरोबर प्रोफाइल मध्ये जाऊन My Learning मध्ये जाऊन त्याच्या उजव्या बाजूवरील Refresh वर क्लिक करावे.

✳️ निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्र.1 ते 12 लिंक्स करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा.
✳️ निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्र.1 ते 12 उत्तर PDF करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा.

Post a Comment

0 Comments