Subscribe Us

मध्यान्ह भोजन योजना - Mid Day Meal Scheme (MDM) | दैनिक उपस्थिती व App

मध्यान्ह भोजन योजना - Mid Day Meal Scheme (MDM) | दैनिक उपस्थिती व App


🎯 MDM (शालेय पोषण आहार) -
शाळेमध्ये मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत सुरु असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची नोंदणी करावयाची असते. हि नोंदणी आणि माहिती आपण App किंवा वेबसाईटच्या माध्यमातून करू शकतो.

App वरून माहिती भरण्यासाठी ते डाऊनलोड करून घ्यावे.

वेबसाईट वरून माहिती भरण्यासाठी खालील बटनाला क्लिक करा.

सर्वांना सूचित करण्यात येत आहे की,आजपासुन ज्या शाळेत शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जातो अशा शालेय पोषण आहाराच्या नोंदी सरल मध्ये ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या नोंदी आपणास खालील 2 प्रकारे भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
👉 सरल वेबसाइट च्या माध्यमातून-
👉 MDM मोबाइल Application-


1) सरल मधील school पोर्टल मध्ये MDM या प्रमुख tab ला क्लीक करुन आपण login करावे.
2) login करत असताना id म्हणून आपल्या शाळेचा udise नंबर आणि पासवर्ड म्हणून school पोर्टल चा पासवर्ड हा MDM चा पासवर्ड असणार आहे याची नोंद घ्यावी.
3) लॉगिन केल्यावर आपणास 2 tab मध्ये काम करावयाचे आहे.
➡️ Opening balance
➡️ MDM Daily attendance
4) Daily attendance भरत असताना इयत्तवार उपस्थित मुले (present student) भरावे आणि त्या खाली असलेल्या रकान्यात present मुलांपैकी किती मुलांना पोषण आहार दिला गेला आहे त्या मुलांची आकडेवारी लिहावयाची आहे.या रकान्यात किती धान्य दिले गेले हे लिहावयाचे नाही आहे हे लक्षात घ्यावे.

🔴ऑनलाईन माहिती भरण्याचे दोन प्रकार -
1) Online Website -
ऑनलाइन वेबसाइट - www.education.maharashtra.gov.in
(वरील वेबसाइटवर Click करावे. school वर जावून MDM वर login करावे व माहिती भरावी.)

2) Online MDM App - 
App करीता एंड्राइड मोबाइलवर खालील लिंकवरुन app download करावे.
https://education.maharashtra.gov.in/files/MDMApp.apk
(टीप- playstore वरुण app download करु नये. कारण महाराष्ट्र शासनाने playstore शी कोणतीही लिंकिंग न केल्यामुळे त्यावरील app प्रमाणित नाही.)

1. प्रथम हे MDM App मोबाईलवर इंस्टॉल करा.
2. App वर क्लिक केल्यानंतर नोंदणी स्क्रीन दिसेल.
3. वापरकर्त्याला UDISE कोड आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल.
4. मोबाईलवर SMS द्वारे OTP पाठवला जाईल.
5. OTP मजकूर बॉक्समध्ये प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
6. कन्फर्म OTP वर क्लिक करा.
7. यासाठी कृपया सरल वेबसाइटवरून MDM ओपनिंग बॅलन्स भरा.
8. त्यानंतर त्या App वरून दैनंदिन उपस्थिती प्रविष्ट करा.
9. 1-5 आणि 6-8 वर्गासाठी जेवणाचे तपशील स्वतंत्रपणे शिजवा.
10. जर 1-5 साठी जेवणाचा स्वयंपाक होय असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या आणि ज्या विद्यार्थ्यांना जेवण दिले गेले त्यांची संख्या प्रविष्ट करा.


🔴 MDM मधील Dally Attendance भरतांना -
1) Presents = आजची उपस्थिती भरावी.
2) Meal Served = प्रत्यक्ष आहार दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लिहावी.
(पटसंख्या लिहीली गेली असल्यास पुन्हा update करून घ्यावे.)

MDM मध्ये दररोज करावयाची कार्यवाही.
१) प्रथम education.maharashtra.gov.in वेबसाईट Open करावी. त्यामधील school ला click करावे.
२) त्यानंतर नवीन पेज Open होईल त्यातील शेवटचे Option *MDM* आहे. त्यावर click करावे.
३) School Portal ला जो user id व पासवर्ड वापरला तोच वापरून login व्हावे.
४) पुन्हा *Menu* वर क्लिक करा. MDM Daily attandance ला क्लिक करुन आपली माहिती भरा.
५) शेवटी Update करायला विसरू नका.

Post a Comment

0 Comments