Subscribe Us

पायाभूत चाचणी 2023 गुणांची नोंद PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर कशी करावी?

पायाभूत चाचणी 2023 गुणांची नोंद PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर कशी करावी?


PAT पायाभूत चाचणी (२०२३-२४) -
    STARS प्रकाल्पामधील SIG-2 limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ च संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे.


    उपरोक्त शासन निर्णय क्र. १ नुसार राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम) गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.

    शासन निर्णय क्र. २ नुसार विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात आलेल्या आहेत. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०१:३० या कालावधीत यु-ट्युवद्वारे प्रशिक्षणही शिक्षकांना देण्यात आलेले आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत कळविण्यात आले होते.

चाटबॉटवर गुणांची नोंद कशी करावी? व्हिडीओ लिंक : 

    तथापि याबाबत अद्यापही पाहिजे तसा प्रतिसाद दिसून येत नाही. तरी सदर बाबत प्राध्यानाने घेवून दि. २५/०९/२०२३ पर्यंत इयत्ता तिसरी ते आठची शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री. वेंकटेश अनंतरामन ८०००४९४७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा. तसेच आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे..!!

PAT चाटबॉट मार्गदर्शिका Download करा. - 

चाटबॉट App मध्ये जाण्यासाठी आणि
पायाभूत चाचणी गुण भरण्यासाठी चाटबॉट लिंक - 

चाटबॉट App Download लिंक -

PAT चाटबॉट शंका समाधान -
    VSK राज्य समन्वयक यांचेशी आपल्याला आलेल्या काही प्रॉब्लेम बाबत चर्चा झाल्यानंतर राज्यस्तरावर याबाबत Technical Team सोबत चर्चा सूरु आहे. आपण खालील मुद्द्याच्या अनुषंगाने PAT चे काम करा..!!

1. ज्यांचे शालार्थ ID आहेत अशाच शिक्षकांनी गुण भरावेत. आश्रमशाळा व अन्य सेवार्थ मधील शिक्षकांनी भरू नये.
2 विषयाच्या गुणांकनात तफावत आढळल्यास त्या विषयाचे गुण वगळून इतर विषयाचे गुण भरावेत. काही दिवसात त्या विषयामध्ये गुण भरता येतील.
3. जे विद्यार्थी BOT मध्ये दिसत नाहीत त्यांचे गुण भरता येणार नाही. याबाबत DATA UPDATE चे काम सुरू आहे.
4. काही वेळा इयत्ता Select होते मात्र विद्यार्थी दिसत नाही. काळजी करू नका ते नंतर भरण्यासाठी वेळ दिला जाईल.
5. जे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या शाळेतून आलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हजर किंवा गैरहजर काही करु नयेत. ते विद्यार्थी तसेच असुदेत.
6. काही शिक्षकांच्या अन्य ठिकाणी बदल्या झाल्याने सध्याच्या शाळेत नाव दिसत नाही. त्या ठिकाणी सध्या जैसे थे असू द्या.
7. ज्या शाळेवर शिक्षक नाहीत मात्र अन्य शाळेतील शिक्षक व्यवस्थापन करतात, अशा शाळेतील विद्यार्थ्यांचे गुण सध्या भरू नये.
8. सप्टेंबर 2023 ला सर्व Deta Update झाल्यानंतर त्या शाळेचे गुण भरता येतील. काळजी नसावी.

VSK सुलभक -
श्री. किशोर गोवर्धन बुरघाटे.

Post a Comment

0 Comments