Subscribe Us

पायाभूत चाचणी २०२३-२४ (इयत्ता 3री ते 8वी) शिक्षकांसाठी सूचना आणि उत्तरसूची

पायाभूत चाचणी २०२३-२४ (इयत्ता 3री ते 8वी) शिक्षकांसाठी सूचना आणि उत्तरसूची


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०.


'STARS' प्रकल्प :-

नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. 17 ते 19 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.



भूमिका व दृष्टिकोनातील बदल :-

"STARS' प्रकल्पांतर्गत २०२३ २४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून विद्याथ्र्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने संबंधित इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी या चाचण्यांद्वारे करण्यात येईल.

या चाचण्यांद्वारे विद्यार्थी संपादणुकीचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून गुणवत्ता समृद्धीसाठी आवश्यक उपाययोजना करणे तसेच शाळाधारित मूल्यांकन प्रक्रियेचे बळकटीकरण करणे हा उद्देश आहे.

राज्यस्तरावरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात सुरुवातीस इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तींवर आधारित इयत्ता तिसरी ते विद्याव्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येत आहे. सदर चाचणीचा मुख्य उद्देश विद्याथ्यांनी मागील इयत्तेमधील अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.


शिक्षकांसाठी सूचना आणि उत्तरसूची :-

शिक्षकांसाठी वर्गनिहाय व विषयनिहाय शासनाने काही सूचना दिलेल्या आहेत. सोबतच उत्तरसुची सुद्धा निर्गमित करण्यात आली आहे. तरी त्यांचे वाचन करून योग्य ती अंमलबजावणी करण्यात यावी. सूचना व उत्तरसुची डाऊनलोड करण्यासाठी Click Here बटनाला स्पर्श करा.








Post a Comment

0 Comments