Subscribe Us

उच्च माध्यमिक परीक्षा (12वी) निकाल- 2023 |12th HSC Exam Result- 2023 (महाराष्ट्र)

उच्च माध्यमिक परीक्षा (12वी) निकाल- 2023 |12th HSC Exam Result- 2023 (महाराष्ट्र)



12 वी (HSC) परीक्षा निकाल-

    माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने 12वी निकाल 2023 महाराष्ट्र 12th HSC Exam Result 2023 गुरुवार 25 मे,2023 रोजी 2.00 pm वाजता ऑनलाईन घोषित केला जाईल.


    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2023 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार, दिनांक 25/05/2023 रोजी दुपारी 2.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

    उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा सन 2023 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. त्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2023 ची घोषणा केली जाईल. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

12वी निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक्स व Side-

1. mahresult.nic.in

2. https://hsc.mahresults.org.in/

3. http://hscresult.mkcl.org

4. https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

5. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023

6. https://mh12.abpmajha.com



बारावीचा निकाल कसा तपासायचा ?

1) महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2) मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा विभाग तपासा.

3) HSC निकाल 2023 ( कला, विज्ञान किंवा वाणिज्य ) साठी लिंक निवडा आणि त्यावर क्लिक करा.

4) लॉगिन विंडोमध्ये परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.

5) तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

6) तसेच, भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र 12 वी परीक्षेच्या निकालाची प्रिंटआउट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

IMP माहिती -

1) www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

2) www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Post a Comment

0 Comments