Subscribe Us

शिक्षक बदली प्रक्रिया-2022 | VC 08.09.2022 मधील महत्वपूर्व अपडेट

शिक्षक बदली प्रक्रिया-2022 | VC 08.09.2022 मधील महत्वपूर्व अपडेट


शिक्षक बदल्यांसंदर्भात ८ सप्टेंबर, २०२२ VC अपडेट-

विषय :- जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत..!!

मुख्य कार्यकारी अधिकारी, 
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक ०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग - २ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.


शासनाच्या संदर्भीय क्र. २ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आता, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने दिनांक ३०.०८.२०२२ रोजी जिल्हा परिषद शिक्षक अभ्यास गटासमवेत व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत खालील मुद्यांवर चर्चा करण्यात आली व सदर बैठकीतीत चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या मुद्यांसंदर्भात खालीलप्रमाणे स्पष्टीकरणात्मक सूचना देण्यात येत आहे.


मुद्दा क्र.1) अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनाबाबत-

स्पष्टीकरण- संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन/ पदस्थापना सदर ऑनलाईन बदली प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना दिनांक १०.६.२०२२ च्या शासन पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत उक्त दिनांक १०.६.२०२२ च्या पत्रातील सूचनांप्रमाणे कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

मुद्दा क्र.2) आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्तीबाबत-

स्पष्टीकरण- सन २०२२ या वर्षात जिल्हा परिषदेतील आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक ५.९.२०२२ पर्यंत कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे शासनाकडील दिनांक ३०.८.२०२२ च्या पत्रान्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना कळविले आहे. तथापि, कार्यमुक्त | करण्याची कार्यवाही करताना प्रचलित धोरणानुसार १० टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही सदर पत्रात नमूद आहे. |त्यामुळे सन २०२२ या वर्षात जिल्हा परिषदेतील आंतरजिल्हा बदली | झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत शासनाकडील दिनांक ३०.८.२०२२ च्या पत्रातील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी.

मुद्दा क्र.3) सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या पसंतीक्रमाबाबत-

स्पष्टीकरण- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसंदर्भातील शासन निर्णय क्र. जिपब ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४, दिनांक ०७.०४.२०२१ मधील परि. ४.५ टप्पा क्र. ५ मध्ये बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती नमूद आहे. त्यानुसार अशा शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र.४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य आहे. असा पसंतीक्रम देताना त्यांना अवघड / सर्वसाधारण क्षेत्रातील जागांचा पसंतीक्रम देण्याची मुभा आहे.

मुद्दा क्र.4) क्षेत्रवाढीमुळे नगरपालिका / महानगरपालिका क्षेत्रात | समाविष्ट झालेल्या शाळांबाबत / बंद शाळांबाबत-

स्पष्टीकरण- महानगरपालिका / नगरपालिका यांचे क्षेत्र वाढीमुळे या क्षेत्रात हस्तांतरीत होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा, शिक्षकांसह सेवा हस्तांतरीत करण्याबाबत पुणे व ठाणे जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी मा. उच्च न्यायालयात विविध रिट | याचिका दाखल केलेल्या आहेत. सदर याचिकांमध्ये ग्रामविकास विभागाकडील दिनांक २०.०७.१९९९ व दिनांक २५/०७/२०१९ रोजीचे दोन्ही शासन निर्णय आजही अस्तित्वात असल्याचा तसेच त्यातील तरतूदी विसंगत / परस्पर विरोधी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून सदर याचिका मा. न्यायालयात प्रलंबित आहेत. महानगरपालिका / नगरपालिका यांचे क्षेत्र वाढीमुळे या क्षेत्रात हस्तांतरीत होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा, शिक्षकांच्या सेवेसह हस्तांतरीत करण्याबाबतचा मुद्दा सदर याचिकांमध्ये न्यायप्रविष्ठ असून अशा प्रकरणी मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा शाळांतील शिक्षकांच्या बदलीबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत शासनाच्या दिनांक १२/०८/२०२२ च्या पत्रान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे / ठाणे यांना कळविण्यात आले आहे.

राज्यातील अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी अशाच प्रकारच्या याचिका मा. न्यायालयात दाखल केल्या असल्यास, त्याप्रकरणी देखील शासनाच्या उक्त दिनांक १२.०८.२०२२ च्या पत्रातील निर्देशाप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. जेणेकरुन मा. न्यायालयाच्या आदेशाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही.

मुद्दा क्र.5) समानीकरणाबाबत-

स्पष्टीकरण- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसंदर्भातील शासन निर्णय क्र.जिपब- ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४, दिनांक ०७.०४.२०२१ मधील परि.२.३ मध्ये शाळानिहाय रिक्त जागा घोषित करण्याबाबतची तरतूद नमूद असून परि. ४.१ टप्पा क्र.१ मध्ये याबाबतची कार्यपध्दती नमूद आहे | समानीकरणाबाबत सदर शासन निर्णयातील उक्त तरतूदीनुसार कार्यवाही करावी.

मुद्दा क्र.6) नवनिर्मित जिल्ह्यात सेवा हस्तांतरीत झालेल्या शिक्षकांच्या मूळ नियुक्तीच्या दिनांकाबाबत-

स्पष्टीकरण- असे शिक्षक सध्या कार्यरत असलेला नवनिर्मित जिल्हा, यापूर्वी ज्या जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता, त्या जिल्हा परिषदेतील त्यांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक हा नवनिर्मित जिल्ह्यात सेवा हस्तांतरीत झालेल्या शिक्षकांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक म्हणून नमूद करावा.

शासनाच्या संदर्भीय दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हांतर्गत बदलीसंदर्भातील शासनाचे सुधारित धोरण, त्या अनुषंगाने वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना तसेच वरील स्पष्टीकरणात्मक सूचना विचारात घेऊन विहीत मुदतीत आवश्यक ती कार्यवाही करावी, ही विनंती.

(का. गो. वळवी) 
उप सचिव, महाराष्ट्र शासन

Post a Comment

0 Comments