Subscribe Us

विद्यांजली पोर्टल 2.0 | Vidyanjali Portal Registration & Login | शाळा स्वयंसेवक कार्यक्रम | A school volunteer programme

विद्यांजली पोर्टल 2.0 | Vidyanjali Portal Registration & Login | शाळा स्वयंसेवक कार्यक्रम | A school volunteer programme


विषय - विद्यांजली 2.0 कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत..!!


विद्यांजली कार्यक्रम थोडक्यात -

1. समुदाय/स्वयंसेवकांना थेट शाळांशी जोडण्यासाठी पोर्टल -
विद्यांजली वेब पोर्टल शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयाने सुधारित केले आहे. समुदाय/स्वयंसेवक त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये सामायिक करण्यासाठी नव्याने सादर केलेले पोर्टल -विद्यांजली - मदत करेल. तसेच त्यांच्या आवडीच्या सरकारी आणि अनुदानित शाळांशी थेट संवाद साधतात आणि कनेक्ट होतात.

विद्यांजली 2.0 पोर्टल User Manual लिंक -



2. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मधील तरतुदी -
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मधील लक्ष्य साध्यतेसाठी लोकसहभागाची तसेच खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केली आहे. याकरिता शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी विद्यांजली 2.0 पोर्टल कार्यान्वित केले आहे. विद्यांजली 2.0 देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे एकत्रीकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.


3. उपक्रमात समाविष्ट विभाग व संस्था -
हा उपक्रम भारतीय डायस्पोरामधील विविध स्वयंसेवकांसह शाळांना जोडेल, जसे की तरुण व्यावसायिक, सेवानिवृत्त शिक्षक, निवृत्त सरकारी अधिकारी, निवृत्त व्यावसायिक, NGO, खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, कृतिशील ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, स्थानिक समुदायातील व्यक्ती, शिक्षित स्वयंसेवक, निवृत्त वैज्ञानिक, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, सशस्त्र दलातील व्यक्ती, गृहिणी हे शाळांच्या विनंती नुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. तज्ञता क्षेत्र, योगदान, सेवा / कृती, मालमत्ता / साहित्य / उपकरणे, प्रशासक या क्षेत्रात आपली सेवा प्रदान करू शकतात.

4. समुदाय आणि पालकांसह व्यस्तता -
पालक आणि समुदायासह प्रतिबद्धतेची भूमिका ओळखणे, प्राथमिक स्तरावर आणि विशेषतः निम्न प्राथमिक स्तरासाठी, कृती आराखडा मांडतो. समुदाय स्वयंसेवकांच्या सहभागावर भर (जसे की NYKS आणि NSS) आणि इतर माजी विद्यार्थी, माता, पालक, सेवानिवृत्त शिक्षक इत्यादींसह समाजातील प्रेरित सदस्य व मुलांना शिकण्याच्या क्रियाकलापांमध्ये सहाय्य प्रदान करण्यासाठी.

या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला / मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात. या अनुषंगाने जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांनी विद्योजली 2.0 पोर्टलवर आपल्या शाळांची त्वरित नोदणी करावी.

विद्यांजली पोर्टलवर शाळा Registration कशी करावी?

विद्यांजली 2.0 पोर्टल Registration लिंक -


Volunteer- Individual NGO, Organization -


1. वरिल विद्यांजली school रजिस्ट्रेशन link वर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा यु-डायस अगदी अचूकपणे टाकून captcha टाकावा व नंतर सबमिट बटनावर क्लिक करा.

2. सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर शाळेचा यु डायस व captcha टाकलेला दिसेल तसेच त्याखाली शाळेचा तपशील आढळून येईल.

3. यानंतर शाळेचा तपशील आपल्यासमोर येईल. 

4. मोबाईल वरती रजिस्ट्रेशन करत असल्यामुळे शाळेचा तपशील पाहण्याकरिता स्क्रीन उजवीकडे scroll करा शाळेच्या तपशील मध्ये मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर दिलेला असेल तोच मोबाईल नंबर head master mobile no या ठिकाणी टाकून email addres टाकावा. (यु-डायस भरते वेळी वापरलेला मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर व ई-मेल असणे आवश्यक) आपण get otp यावर क्लिक करा.

5. अशा पद्धतीने विद्यांजली शाळा registraion पूर्ण होईल.

विद्यांजली पोर्टलवर शाळा Login कशी करावी?

विद्यांजली 2.0 पोर्टल Login लिंक -



1. वरील link वर क्लिक करा school समोरील गोल वर क्लिक करा.

2. आपला mobile no हाच तुमचा login id असेल, त्यांनतर 6 अंकी ओटीपी येणारा हा आपला पासवर्ड असेल.

3. आपला मोबाईल नंबर टाका व send ओटीपी या टॅबला क्लिक करा मेसेज मध्ये येणाऱ्या 6 अंकी ओटीपी टाकून लॉगिन करा.

4. आपण कायम पासवर्ड देखील तयार करु शकता. यासाठी genrate password वर क्लिक करा व password तयार करून घ्या. या नंतर send लिंक वर क्लिक करा.व त्यांनतर mail वर जाऊन लिंक वर क्लिक करून आपला password तयार करून log in करा.

5. प्रथम pasword जनरेट करायचे कि नाही ते ठरवा otp च्या माध्यमातून देखील log in करू शकता.

विद्यांजली पोर्टलवर Profile Update कशी करावी?

1. आपला पत्ता, इतर माहिती भरा व school sync यावर क्लिक करा यानंतर profile अपडेट होईल.

2. जर कोणी उत्सुक असतील तर त्या संस्था, व्यक्ती आपल्याशी म्हणजे शाळेला मदत करू शकतात. थोडक्यात लोकसहभाग वाढवणे असे यात अपेक्षित आहे.

➡️ थोडक्यात काय तर आपल्या शाळेची भौतिक आणि गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून वाढ करायचे असेल तर आपल्याला विद्यांजली पोर्टल वरती शाळा रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या शाळेसाठी असणाऱ्या गरजा लक्षात घेऊन रिक्वेस्ट देखील पाठवायची आहे.या संदर्भात जर कोणी इच्छुक असतील ते आपल्या शाळेला मदत करतील आणि आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देता येईल.

धन्यवाद!

Post a Comment

0 Comments