Subscribe Us

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ | शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ | शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी | Bridge Course 2022-23


विषय :- पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत..!!

कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या शाळा नियमित झाल्या नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा ऱ्हास झालेला सर्वेक्षणानुसार निदर्शनास आले आहे. तसेच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यामध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. इयत्तानिहाय व विषयनिहाय विद्यार्थ्यांना क्षमता संपादित होण्यास अडथळा निर्माण झालेला आहे. सन २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावर "शाळा बंद पण शिक्षण सुरू" या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून ४५ दिवसाचा सेतू अभ्यासक्रम राबविण्यात आला होता यामध्ये सेतू अभ्यासक्रम अधिक परिणामकारक झाला असे निष्कर्ष मिळालेे आहे.


शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत . त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ऑनलाईन उद्बोधन सत्र आयोजन -

शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेसाठी दि. ९. जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अमलबजावणी विषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप, कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही बाबत उद्बोधन करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन उद्बोधन सत्राची लिंक आपणास ई-मेलद्वारे सूचित करण्यात येईल.

सेतू अभ्यासक्रम, पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी Download करा.
(माध्यमनिहाय व विषयनिहाय इ. 2री ते 10वी)

पुनरचित सेतू अभ्यासाचा कालावधी -

राज्यातील शाळांसाठी चे नियोजन
पूर्व चाचणी- 17 ते 18 जून, 2022
सेतू अभ्यास कालावधी- 20 जून ते 23 जुलै
उत्तर चाचणी- 25 व 26 जुलै, 2022

विदर्भातील शाळांसाठी चे नियोजन
पूर्व चाचणी- 1 ते 2 जुलै, 2022
सेतू अभ्यास कालावधी- 4 जूले ते 6 ऑगस्ट 
उत्तर चाचणी 8 ते 10 ऑगस्ट, 2022

पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप :-

१. इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

२. सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.

३. पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.

४. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्याथ्र्यांसाठी सविस्तर सूचना सेल अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टकरिता ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

पुनरचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :-

1. सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्याथ्र्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची, अमलबजावणी करावी.

2. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वतः कडे ठेवाव्यात.

3. मागील इयत्ताच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या ३० दिवसामध्ये सेतू अभ्यासाची अमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.

4. सदर कृतीपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.

5. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका 'विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.

6. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वतः कडे ठेवाव्यात.

7. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी.

अंमलबजावणी व शाळा भेटी -
उपरोक्त प्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व घटकांना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. सेतू अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झालेनंतर शाळा भेटींच्या आधारे सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीचा जिल्हानिहाय अहवाल पुढील 15 दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास विनाविलंब सादर करावा.

Post a Comment

0 Comments