Subscribe Us

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण SCERT, पुणे मार्फत मार्गदर्शक व्हिडीओ..!!

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण SCERT, पुणे मार्फत मार्गदर्शक व्हिडीओ..!!


SCERT, पुणे मार्फत मार्गदर्शक Video -
शालेय शिक्षण विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे द्वारा आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ मध्ये (प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक / अध्यापक शिक्षण गट) या चार गटातील शिक्षकांनी प्रशिक्षणास सुरुवात कशी करावी? प्रशिक्षण कसे पूर्ण करावे? स्वाध्याय कसा सोडवावा? चाचणी कशी सोडवावी? अभिप्राय कसा द्यावा? याबाबत मार्गदर्शक व्हिडीओ खाली दिलेले आहेत. आपण ते पाहून आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करावे..!!

व्हिडीओ क्र.(1) प्रशिक्षणास सुरुवात कशी करावी? 

व्हिडीओ क्र.(2) प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?

व्हिडीओ क्र.(3) स्वाध्याय कसा सोडवावा?

व्हिडीओ क्र.(4) चाचणी कशी सोडवावी?

व्हिडीओ क्र.(5) अभिप्राय कसा द्यावा?
 

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण :-
हे प्रशिक्षण १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे.

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये :-
1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
2. जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.
3. शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
4. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.
5. एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
6. शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.
7. मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.

पात्रता निकष :-
1. उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
2. १२ वर्षाची अर्हताकारी सेवा
या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.
3. अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण :-
हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे.

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये :-
1. बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी सक्षम करणे.
2. मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे.
3. शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.
4. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे.
5. मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
6. शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
7. जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.

पात्रता निकष :-
1. उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
2. २४ वर्षाची अर्हताकारी सेवा
3. अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
क)प्राथमिक शिक्षकांसाठी – प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.
प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी – पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित – अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.

Post a Comment

0 Comments