Subscribe Us

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ | नवीन अपडेट-तक्रार निवारण

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ | नवीन अपडेट-तक्रार निवारण


New update - (5 जून) 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स चे विकसन करण्यात येऊन सदर कोर्स इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रशिक्षण दरम्यान येणाऱ्या अडचणी करिता खालील लिंक च्या माध्यमातून तक्रारी करू शकता..!!

तक्रार निवारण फॉर्म - 
प्रशिक्षणाबाबत काही शंका अथवा प्रशिक्षण प्रकार बदल, ईमेल बदल अथवा इतर अनुषंगिक बदल याबाबत आवश्यक तक्रार निवारणासाठी आवश्यक फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.


प्रशिक्षणार्थी खालील तक्रार निवडा मधून योग्य तो पर्याय निवडू शकतात. हि सुविधा दि.5 जून 2022 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

1. नोंदणी केली होती परंतु यादी मध्ये नाव नाही.
2. प्रशिक्षण प्रकार बदलणे आहे.
3. युजर आयडी व पासवर्ड चा मेल अप्राप्त-
4. शाळेच्या वा विद्यालयाच्या नावामध्ये बदल-
5. इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड मध्ये लॉगिन होत नाही.
6. प्रोफाइल अपडेट करत असताना अडचण आली.


📱 5 जून 3.00 वा. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण बाबत Live मार्गदर्शन 👇


वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया -

१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.
२. प्रशिक्षण गट बदलता येईल.
३. डबल नोंदणी रद्द करता येईल.
४. ईमेल दुरुस्त करता येईल.

सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी व दुरुस्त्या आपणास 👇 या वेबसाईटवर करता येतील..!!



शंका समाधान सत्र  - 
शंका समाधान सत्र ZOOM Meeting zoom app वर
दि. 2 जून ते 1 जुलै दररोज स. 11 ते 12 या वेळेत
ZOOM App meeting link - Click Here
Meeting ID - 952 1568 5289
Pass code - SCERT

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ, ठराविक वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही.

Post a Comment

0 Comments