Subscribe Us

YCMOU बी.एड. प्रवेश प्रक्रिया | B. Ed. Admission Process 2022-2024

YCMOU बी.एड. प्रवेश प्रक्रिया | B. Ed. Admission Process 2022-2024


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याद्वारे सेवांतर्गत बी. एड. शिक्षणक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2022/24 करिता जाहीर झाली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून वेळापत्रक खालीलप्रमाणे -

अर्ज भरण्यास सुरुवात - 5 मे 2022
अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक - 25 मे 2022
स्व संपादन करण्याची मुदत - 27 ते 31 मे 2022




नियम व अटी -
1) रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने करावे लागेल.
2) अर्जदार सेवेत कार्यरत असावा.
3) मान्यताप्राप्त विद्यापीठाद्वारा कोणत्याही विषयात पदवी प्राप्त असावी.
4) डी. एड. / डी. टी. एड. पूर्ण असावे.


बी.एड. शिक्षणक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी सूचना -
1) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेद्वारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.
2) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.
3) ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
4) तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.
५) ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्ण करण्यात आपणास कधीही काही अडचण अथवा अडथळा आल्यास विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/https://ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

Post a Comment

0 Comments