Subscribe Us

दहावी व बारावी परीक्षा सन-2022 वेळापत्रक | 10th 12th Exam 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा सन-2022 वेळापत्रक


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन-2022 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

बारावीची परीक्षा 14 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 25 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. सदर वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान राहील. (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन दिनांक 31मार्च ते 9एप्रिल या कालावधीत घेण्यात येईल.) तर दहावीच्या लेखी परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 मार्च 2022 या कालावधीत होईल.

विषय व माध्यमनिहाय वेळापत्रक PDF

दहावी परीक्षा 2022  वेळापत्रक 

बारावी परीक्षा 2022  वेळापत्रक 

    विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करता यावे म्हणून राज्याच्या शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार बारावीची परीक्षा 14 फेब्रुवारी ते 21 एप्रिल आणि दहावीची परीक्षा 25 फेब्रुवारी ते 19 एप्रिल दरम्यान होणार आहे. दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या वेबसाइटवर विद्यार्थी आणि पालकांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

    दहावीचा पहिला पेपर भाषा, तर बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा होईल. दहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने नव्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार तर जुन्या विद्यार्थ्यासाठी जुन्या अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक तयार करण्यात येईल. जुन्या विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयाचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कळवले जाईल. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे, तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. सोशल मीडियाकडून व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


Post a Comment

0 Comments