Subscribe Us

१० वी / १२वी मार्च / एप्रिल २२ परीक्षांसंदर्भात नियंत्रण कक्ष व helpline सुविधा उपलब्ध

१० वी / १२वी मार्च / एप्रिल २२ परीक्षांसंदर्भात नियंत्रण कक्ष व helpline सुविधा उपलब्ध
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक 
शिक्षण मंडळ, पुणे ४११००४
प्रकटन

विषय :-
मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षांसंदर्भात नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक ०४/०३/२०२२ ते ३०/०३/२०२२ या कालावधीत तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा दिनांक १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळामार्फत सदर परीक्षांबाबत केलेले नियोजन, विशेष उपाययोजना, विविध घटकांसाठी निश्चित केलेल्या विशेष मार्गदर्शक सूचना तसेच नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा इत्यादीबाबतचा तपशील विभागीय मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांना देखील विभागीय मंडळ स्तरावर स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे व तो मंडळाच्या www.mahahsscboard.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे.

राज्यमंडळ व विभागीय मंडळातील नियंत्रण कक्ष हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले अधिकारी व मंडळ कर्मचारी यांची नावे व दूरध्वनी भ्रमणध्वनी क्रमांक तपशील पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे. तरी संबंधितांनी आपल्याशी संबंधित असलेल्या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.

१० वी / १२वी मार्च / एप्रिल २२ परीक्षांसंदर्भात 
(नियंत्रण कक्ष व helpline सुविधा.)

Circular regarding HSC Mar/Apr 2022 Exam. 
(Time table partial changes.)
HSC मार्च/एप्रिल 2022 परीक्षेबाबत परिपत्रक.
(वेळापत्रक आंशिक बदल.)

HSC Mar-Apr 2022 Exam. 
(revised time table for 7TH & 8th March 22.)
HSC मार्च-एप्रिल 2022 परीक्षा.
(सुधारित वेळापत्रक 7 आणि 8 मार्च 22.)

Post a Comment

0 Comments