Subscribe Us

निष्ठा 3.0 प्रशिक्षणास (दिक्षा ॲपवर) मोबाईल वरून कसे जॉईन व्हावे?

निष्ठा 3.0 प्रशिक्षणास (दिक्षा ॲपवर) मोबाईल वरून कसे जॉईन व्हावे?


🔹 अत्यंत महत्त्वाचे :-
ज्या शिक्षकांनी अद्यापही निष्ठा 3.0 प्रशिक्षण रजिस्ट्रेशन व प्रशिक्षणास जॉईन झाले नाहीत ते शिक्षक कृपया 25 जानेवारी 2022 पर्यंत प्रशिक्षण रजिस्ट्रेशन व प्रशिक्षणात जॉईन होऊ शकतात. त्यानंतर प्रशिक्षणात जॉईन होऊ शकणार नाहीत..!!

🔹 दीक्षा ॲपवर निष्ठा 3.0 प्रशिक्षणात जॉईन कसे व्हावे?
➡️ सर्वप्रथम आपल्या मोबाईल वरुन दीक्षा ॲप Open करा.
➡️ दीक्षा ॲप ओपन केल्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर खालच्या बाजूला 5 tab आपल्याला दिसून येतील त्या पेजवरिल सर्वात खालच्या उजव्या बाजूचे profile चे ऑप्शन असेल त्या profile च्या ऑप्शनला क्लिक करा.
➡️ क्लिक केल्यानंतर बोर्ड, माध्यम, वर्ग व विषय दिसून येतील ज्या ऑप्शन मध्ये वर्गाचा उल्लेख आलेला असेल त्या ऑप्शन खालील संपादित करा हा tab आहे त्या tab वरती क्लिक करा.
➡️ त्यानंतर आपण शिकवीत असलेला वर्ग निवडा व वर्गा खालीच CPD हे ऑप्शन दिसेल त्यालाही क्लिक करा कारण CPD च्या माध्यमातूनच आपल्याला प्रशिक्षण दिले जाईल.
➡️ या ठिकाणी आपण शिकवीत असलेले वर्ग निवडणे अत्यावश्यक आहे कारण वर्गानुसार आपल्याला प्रशिक्षण म्योडूल्स courses उपलब्ध होतील आणि याच म्योडूल्स कोर्सेस चे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
(वर्ग व CPD निवडल्यानंतर सबमिट करा वर क्लिक करा.)
➡️ त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर आपल्याला बोर्ड, माध्यम, इयत्ता आणि विषय दिसून येतील इयत्ता मध्ये आपण निवडलेल्या इयत्ता व CPD ऑप्शन दिसेल त्याखालील जतन करा या tab वर क्लिक करा.
(अशा प्रकारे आपली profile अपडेट झालेले असेल.)
➡️ यानंतर back या back आल्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर खालच्या बाजूला 5 tab दिसून येतील त्यामधील दोन नंबरचे tab हे courses चे आहे त्या tab वरती क्लिक करा.
➡️ ओपन होणाऱ्या पेजवर आपण निवडलेल्या वर्गानुसार MH-FLN Q ward असलेले 3 म्योडूल्स courses, दिसून येतील त्या खालील अधिक पाहा या ऑप्शनला क्लिक करा.
➡️ MH-FLN नावाचे म्योडूल्स कोर्सेस व इतर ही कोर्सेस दिसून येतील. MH-FLN नावाने डिस्प्ले झालेले म्योडूल्स निष्ठा 3.0 प्रशिक्षणा करीता आहेत व याच म्योडूल्स कोर्सेस चे आपणास प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. इतर दिसणारी courses हे Secondary करिता आहे ते आपणास करण्याची गरज नाही.
➡️ MH-FLN नावाने डिस्प्ले होणाऱ्या पहिल्या कोर्सवर क्लिक करा नंतर त्यामधील क्रमवार टॉपिक दिसून येतील त्या टॉपिक मधील शेवटचा टॉपिक हा मूल्यमापनाचा आहे प्रत्येक म्योड्यूल्स वर मूल्यमापन टॉपिक दिलेला आहे प्रत्येक मूल्यमापन टॉपिक मध्ये एक प्रश्नावली दिलेली असेल ती सोडविणे आवश्यक आहे.
➡️ त्याकरिता पहिल्या म्योड्यूल्स मधील पहिल्या टॉपिक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या टॉपिक वरील व्हिडीओ प्रदर्शित होईल तो सुरू करून पूर्ण करावा व्हिडिओ replay , back व exit होतो.
➡️ अशाप्रकारे प्रत्येक म्योड्यूल्स कोर्सेस मधील क्रमवार टॉपिक चे व्हिडीओ पाहून व त्यावरील प्रश्नावली सोडवून आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.
➡️ अशाप्रकारे आपण आपले कोणते म्योड्यूल्स कोर्सेस प्रशिक्षण पूर्ण केले आहे ते पाहण्याकरिता कोर्सेस विभाग वर क्लिक करून पाहू शकतो जो आपला टॉपिक पूर्ण झाल्या आहे त्या समोर ग्रीन राईट मार्क येतो.
(अशा पद्धतीने आपणास प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.)
➡️ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्गमित केलेल्या वेळापत्रकानुसार आपणास 12 म्योड्यूल्स कोर्सेसचे प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे ज्या शिक्षक बंधू-भगिनीं कडून हे प्रशिक्षण पूर्ण होणार नाही त्यांना 1 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 दरम्यान हेच प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.

✳️ निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्र.1 ते 12 लिंक्स करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा.
✳️ निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्र.1 ते 12 उत्तर PDF करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा.

Post a Comment

1 Comments