Subscribe Us

निष्ठा 3.0 प्रशिक्षण नोंदणी (दिक्षा ॲपवर) मोबाईल वरून कशी करावी?

निष्ठा 3.0 प्रशिक्षण नोंदणी (दिक्षा ॲपवर) मोबाईल वरून कशी करावी?

🟥 अत्यंत महत्त्वाचे :-
सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण हे राज्यातील इयत्ता 1 ते 5 चे शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी आयोजित केले जात आहे. ज्या शिक्षकांनी अद्यापही निष्ठा 3.0 प्रशिक्षण रजिस्ट्रेशन व प्रशिक्षणास जॉईन झाले नाहीत ते शिक्षक कृपया 25 जानेवारी 2022 पर्यंत प्रशिक्षण रजिस्ट्रेशन व प्रशिक्षणात जॉईन होऊ शकतात त्यानंतर प्रशिक्षणात जॉईन होऊ शकणार नाहीत.

🟥 दिक्षा ॲपवर नोंदणी कशी करावी?

➡️ Diksha app (दीक्षा ॲप) प्ले स्टोअर वर जाऊन download करू शकता किंवा खालील दिलेल्या लिंक वरून सुद्धा download करू शकता.

➡️ दीक्षा ॲप download झाल्यानंतर open करा open होणाऱ्या पेजवर मराठी भाषा निवडा.
➡️ भाषा निवडल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करून शिक्षक या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर नवीन पेज ओपन होईल.
➡️ त्या पेजवर सर्वात खालचा पर्याय बोर्ड निवडा येथे क्लिक करा.
➡️ ओपन होणाऱ्या पेजवरील state Maharashtra वर क्लिक करून सबमिट करा.
➡️ यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर बोर्ड State Maharashtra आलेले असेल त्यानंतर आपल्याला पाहिजे ते माध्यम निवडा येथे मराठी निवडा एकापेक्षा जास्त ही भाषा निवडू शकता व सब्मिट करा.
➡️ आपल्याला पाहिजे ते वर्ग निवडा. आपण जे वर्ग शिकवतो ते वर्ग निवडा एकापेक्षा जास्त ही वर्ग निवडू शकता व पुढे या बटणावर क्लिक करा.
➡️ अशाप्रकारे Diksha app ची नोंदणी होऊन दीक्षा ॲप Open होईल.
➡️ त्या पेजवर खालच्या उजव्या बाजूला प्रोफाइल, (व्यक्तीचे चित्र ) दिसेल त्यावर क्लिक करा ओपन होणाऱ्या पेजवर सर्वात खाली असणाऱ्या लॉगिन करा येथे क्लिक करा.
➡️  सध्या आपणास login ID आणि password मिळालेला नाही.
➡️ लॉगिन करा असा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा पुढील login on Diksha या पेजवरील दोन नंबर चे ऑप्शन register here वर क्लिक करा ओपन होणाऱ्या पेजवर select year of birth वर क्लिक करून आपले जन्माचे वर्ष टाका,आपले पूर्ण नाव टाका, त्यानंतर आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाका. त्यानंतर आपला password create करा.
(खालील दिलेल्या सूचनेप्रमाणे password create करताना कमीत कमी 8 digit असायला हवा.)
➡️ तोच पासवर्ड confirm password या ठिकाणी टाका, त्यानंतर checkbox मध्ये tik करून register येथे क्लिक करा.
➡️ त्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर आपल्या मोबाईल वर आलेला OTP टाका व सबमिट करा.
➡️ अशाप्रकारे आपले दीक्षा ॲप वरील रजिस्ट्रेशन password सह पूर्ण झालेले आहे. आपण क्रिएट केलेला पासवर्ड जतन करून ठेवा.
➡️ आता पुन्हा आपल्या मोबाइल क्रमांक टाकून व आपण create केलेला password टाकून लॉगिन करा.
➡️ नवीन पेज वर पुन्हा बोर्ड निवडा येथे state Maharashtra निवडा सबमिट करा.
➡️ माध्यम निवडा येथे मराठी किंवा आपल्याला पाहिजे ते माध्यम निवडा आपण शिकवीत असलेले वर्ग निवडा व जतन करा या tap वरती क्लिक करा.
➡️ ओपन झालेल्या नवीन पेजवर आपल्या राज्याचे नाव असेलच नसल्यास 
आपले राज्य निवडा व सबमिट करा. 
त्याखाली जिल्हा निवडा व सबमिट करा.
आपला तालुका निवडा.
केंद्र निवडा व शाळा निवडा व सबमिट वरती क्लिक करा.
➡️ त्यानंतर दीक्षा ॲप ओपन होईल त्या पेजवर खालील उजव्या बाजूला, (व्यक्तीचे चित्र ) प्रोफाइल वर पुन्हा क्लिक करा. आपल्या नावासह आपण भरलेली माहिती आपल्यासमोर पेजवर दिसेल. त्यानंतर माहिती संपादित करा.
➡️ त्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यावर कोण आहात येथे teacher निवडा. पुन्हा नवीन पेज ओपन होईल त्यावर State Maharashtra निवडा व सबमिट करा.
➡️त्यानंतर नवीन पेज ओपन होईल तिथे इतर माहिती असेलच सोबत आपला email address टाका. email च्या खाली validate हा टॅब असेल त्याला क्लिक करा व ई मेल वर आलेला ओटीपी त्यामध्ये प्रविष्ट करा.
➡️ त्यानंतर त्याच पेजवर आपल्याला आपल्या शाळेचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा यु-डायस क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर राज्य आणि बोर्ड ने मागितलेला ID प्रविष्ट करा येथे आपल्याला पुन्हा यु-डायस क्रमांक टाकायचा आहे व चेक बॉक्स मध्ये टिक करून माहिती सबमिट करा.

अशाप्रकारे आपण निष्ठा प्रशिक्षणाचे रजिस्ट्रेशन केलेला आहे जर आपल्याला पुन्हा माहिती अपडेट करायची असल्यास अपडेट या tab वर क्लिक करून आपली माहिती आपण अपलोड करू शकता..!!

✳️ निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्र.1 ते 12 लिंक्स करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा.
✳️ निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्र.1 ते 12 उत्तर PDF करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा.

Post a Comment

0 Comments