Subscribe Us

वरिष्ठ श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वपूर्ण Update

वरिष्ठ श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वपूर्ण Update


नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींना लॉगीन आयडी आणि पासवर्ड - दि. 16/01/21 ते दि.20/01/21 यादरम्यान आपल्या ईमेलवर पाठवण्यात येतील..!!

निवडश्रेणीसाठी शिक्षकांच्या अर्हता ,अनुभव, पात्रता खालीलप्रमाणे -

1) प्राथमिक शिक्षक (वर्ग 1 ते 8, D.Ed पात्रता धारक) :-
कोणतीही शासन मान्य पदवी प्राप्त करणे आवश्यक (B.A, B.Com,B.Sc), 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वरीष्ठ वेतनश्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा.

2) माध्यमिक शिक्षक (वर्ग 9,10 वि B.Ed. पात्रता) :-
वरीष्ठवेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा,पदवीधर शिक्षकांनी पदव्यूत्तर पदवी करणे आवश्यक आहे.
अ) B.A B.Ed धारकांनी M.A/M.Ed/M.A(Edu)
ब) B.Com B.Ed धारकांनी M.Com/M.Ed/M.A(Edu)
क) B.Sc B.Ed धारकांनी M.Sc /M.Ed/M.A(Edu)
ड) B.Sc B.Ed यांनी इतर विषयात इतिहास,मराठी,समाजशास्त्र इ. MA केले असेल तर ग्राह्य धरले जात नाही.

3)उच्च माध्यमिक शिक्षक :-
(11,12 वी) उच्च माध्यमिक शिक्षक ( M.A B.Ed/ M.Sc B.Ed/M.Com B.Ed) उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय/अध्यापक विद्यालयातील* शिक्षकांना 12 वर्षाचे वरीष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा, M.Phil / P.hd / M.Ed /संगणकातील पदव्युतर पदवी MS - ACITIT इ अर्हता आवश्यक राहील.

4) शारीरिक शिक्षक :-
SSC, HSC व एक वर्षे शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र धारकांना B.P.Ed ही अर्हता तर B.P.Ed धारकांनी M.P.Ed ही अर्हता प्राप्त करावी.

5) हिंदी शिक्षक :- 
SSC,HSC धारकांनी संबधित विषयातील पदवी अथवा समकक्ष व पदवी धारकांनी संबंधित पदव्युत्तर वा समकक्ष अर्हता धारण करावी.

6) संगीत शिक्षक :- 
मॅट्रिक/SSC असलेल्या संगीत विशारद शिक्षकांनी संबंधित विषयातील पदवी तर पदवीधर शिक्षकांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर अर्हता धारण करावी.

7) चित्रकला शिक्षक :- 
DTC किंवा DMC किंवा ATD अशी अर्हता धारण करणाऱ्यानी आर्ट मास्टर (AM) प्रमाणपत्र तसेच G.D.आर्ट किंवा BFA पदवी( रेखा/रंगकला/उपयोजित कला/ शिल्पकला व प्रतिमान) अर्हता धारकांनी कला क्षेत्रातील आर्ट मास्टर प्रमाणपत्र पदवी (AM) किंवा कला शिक्षणशास्त्र पदविका (D.Ed.) अशी अर्हता धारण करावी.

महत्वाचे एकाच वेतनश्रेणीमध्ये 12 वर्षे झाले तरच वरीष्ठवेतनश्रेणी व 24 वर्षे सेवा झाली असेल तरच निवडश्रेणी निवडश्रेणी संवर्गातील वरीष्ठवेतनश्रेणी मधील सेवाजेष्ठता नुसार 20 % पदांना मिळते.

राज्य सरकारी कर्मचार्च्या प्रमाणे शिक्षकांना ही विनाअट वेतनश्रेणीचा लाभ झाला पाहिजे, व निवड वेतन श्रेणी सरसकट शिक्षकांना लागू करावी यासाठी राज्यस्तरावर विविध शिक्षक संघटना लढा देत आहे.


🔹वरिष्ठ व निवडूश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२🔹
 📱 प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी लिंक👇

Post a Comment

2 Comments

  1. मी खोत सुनिता मधुकर, 19/06/2019ला निवडश्रेणीसाठी एकाच वेतनश्रेणीत 24वर्षे पूर्ण केली आहेत. असे असूनही ट्रेनिंग रजिस्ट्रेशन करतेवेळी शालार्थ नोंदणी नुसार निवडश्रेणीस पात्र नाही असे येत आहे. असे का?

    ReplyDelete
  2. मी 5जानेवारी ला निवडश्रेणी प्रशिक्षण साठी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे 2000रूपये फी भरली आहे आपण सांगितले की आपल्या ईमेलवर प्रशिक्षण बाबत माहीती पाठवली जाईल व 24जानेवारीपासून प्रशिक्षण सुरू होणार होते परंतु आज 2मार्च आला तरी काहीहीमाहीती ईमेलवर आली नाही .नक्की प्रशिक्षण होणार की नाही आम्ही भरलेल्या फीचे काय?

    ReplyDelete