Subscribe Us

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2021-22 नवीन अपडेट नुसार | New Update

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2021-22 करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी कशी करावी? नवीन अपडेट नुसार (New Update)


वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन बाबत महत्वपूर्ण सूचना -
(वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन 2 भागात करण्यात आलेले आहे)

1) दि. 31 डिसेंबर 2021 रोजी 12 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 12 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

2) दि. 31 डिसेंबर 2021 रोजी 24 वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच 24 वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

3) प्रशिक्षण नोंदणी दिनांक 05 जानेवारी, 2022 पर्यंत सुरु राहील.
(या तारखेत काही अपरिहार्य कारणास्तव बदल होऊ शकतो)

4) प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID,शाळेचा UDISE क्रमांक, मोबाईल, ईमेल इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन लिंक -
(वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन 2 भागात करण्यात आलेले आहे.)

1) शालार्थ ( ID) क्रमांक असलेल्यांसाठी नोंदणी लिंक -

वरिष्ठ वेतन श्रेणी (सेवेची 12 वर्षे झालेल्यानी) खालील लिंक भरावी


निवड वेतन श्रेणी (सेवेची 24 वर्ष झालेल्यानी) खालील लिंक भरावी

2) शालार्थ ( ID) क्रमांक नसलेल्यांसाठी नोंदणी लिंक -

वरिष्ठ वेतनश्रेणी (सेवेची 12 वर्ष झालेल्यानी) खालील लिंक भरावी

निवड वेतन श्रेणी (सेवेची 24 वर्ष झालेल्यानी) खालील लिंक भरावी

वरील चार पैकी योग्य त्या पर्यायाला क्लिक वरून नोंदणी सुरु करावी.

➡️ आपला शालार्थ आय. डी. नोंदवावा.
प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.आपणास शालार्थ आयडी ऑनलाईन पगार बीलावर किंवा कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आयडी कार्ड वर सहज मिळून जाईल.

➡️ आपली जन्म दिनांक नोंदवा.

➡️ वापरात असणारा आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा..
नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

➡️ नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP नोंदवून verify करून घ्यावे.

➡️ त्यानंतर आपल्या मोबाईल वर नवीन पेज ओपन होईल या पेजवर आपण या आधीच भरलेली शालार्थ वरील माहिती all ready upload झालेली असेल या पेजवर काही आपली महत्त्वाची माहिती जसे qualification वगैरे अशी माहिती आपणास manually भरावी लागेल. 

➡️ त्यानंतर page चे खालील बाजूस आपला प्रशिक्षण गट निवडावा.
प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे 04 गट करण्यात आलेले आहेत-

गट क्र.1 - प्राथमिक गट 
(इयत्ता 1 ते 8 शिकविणारे शिक्षक)

गट क्र.2 - माध्यमिक गट
(इयत्ता 9 ते 10 शिकविणारे शिक्षक)

गट क्र. 3 - उच्च माध्यमिक गट
(इयत्ता 11 वी 12 वी शिकविणारे शिक्षक)

गट क्र. 4 - अध्यापक विद्यालय गट
(अध्यापक विद्यालय तथा तत्सम संवर्गात येणारे शिक्षक)

वरीलपैकी कोणताही एक गट निवडावा.

➡️ आपण भरलेल्या माहितीची पडताळणी करावी. दुरुस्ती/ बदल असल्यास Edit बटनावर क्लिक करून आवश्यक बदल करू घ्यावा.

➡️ बदल / दुरुस्ती नसल्यास I agree all above instructions. वरील चेक बॉक्स टिक मार्क (✔️) करावी.

➡️.त्यानंतर खालील save या बटनावर क्लिक करून आपली माहिती save करून घ्यावी.

त्यानंतर आपले रजिस्ट्रेशन आपण पुढे सुरू ठेवणार आहोत.

➡️त्यानंतर pay training fees असा tab दिसेल त्यावर click केल्यानंतर आपणास fees बाबतचा व training बाबतचा तपशिल दिसेल. त्याखाली payment option असा tab दिसेल. त्यावर click केल्यानंतर आपल्या समोर bill days व Razorpay असे दोन पर्याय दिसतील ्यापैकी कोणतेही एका पर्यायाला select करा त्यानंतर आपणास pay now असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर payment पर्याय आपल्याला दिसतील त्यापैकी आपल्याला हवे त्या सोयीस्कर पर्याय निवडून त्यावर click करावे व आपले पेमेंट करून घ्यावे व त्यानंतर आपल्याला complete registrations असा tab दिसेल यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी पूर्ण झालेली आहे असा मेसेज डिस्प्ले होईल.

➡️त्यानंतर आपण प्रशिक्षणास भरलेल्या माहितीची pdf आपल्याला मिळेल ती डाऊनलोड करून आपल्या दप्तरी जतन करावी तसेच आपला रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा आपल्याला डिस्प्ले होईल तो सुद्धा आपल्याकडे लिहून जतन करावा.

➡️ प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठीच्या उपलब्ध सुविधांपैकी आपणाकडे असलेल्या सुविधेमार्फत प्रशिक्षण शुल्क भरणा करावा. प्रशिक्षण शुल्क भरल्याचे चलान जतन करून ठेवावे.

➡️ प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट/ डेबिट कार्ड/UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.

➡️ सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.2000/- (अक्षरी रुपये - दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन अदा करावे, एकदा जमा केलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही कारणात्सव परत केले जाणार नाही प्रशिक्षण नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यास आपणास प्रशिक्षण शुल्क भरल्याची पावती ई-मेलद्वारे प्राप्त होईल

➡️ प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना वेळोवेळी उपरोक्त संकेतस्थळावर व ई-मेलद्वारे देण्यात येतील.

➡️ नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल वरून trainingsupport@maa.ac.in या ई मेल आयडीवर संपर्क करावा.सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबत नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई-मेलद्वारे देण्यात येतील.

Post a Comment

6 Comments

  1. मी उजवला मांडगे शाळा लखमापूर माझ्याकडून निवड श्रेणी ऐवजी वरिष्ठ वेतन श्रेणी चुकून लिंक भरली गेली तसेच 2 हजार पेमेंट ही झाले, परंतु आता बदल करणेसाठी एडिट होत नाही, व फ्रेश नवीन निवड श्रेणी भरले की पुन्हा 2000 रुपये चे ऑप्शन येते, तरी मार्गदर्शन व्हावे

    ReplyDelete
  2. मॅडमजी यात काही बदल होणार नाही त्यांनी आधीच काटेकोर सूचना दिल्या होत्या माहितीत बदल असेल तर ती आधीच करायचा होता , तुम्हाला निवड श्रेणीच प्रशिक्षण घ्यायचं असेल तर पुन्हा लिंक भरा आणि पेमेंट करा.

    ReplyDelete
  3. प्रशिक्षण कधी चालु होणार आहे?

    ReplyDelete
  4. Registration number 2050352.After examination/evaluation I got 66/90.But now tab has vanished.I logined so many times but there is not found Selection grade teachers training tab.please solve the problem.

    ReplyDelete
  5. My registration number 2042633 but my trending course is not opening my evaluation and feedback is incomplete please help and reply.

    ReplyDelete