Subscribe Us

मोबाईल वरून युनिव्हर्स पास कसा काढावा ? संपूर्ण माहिती

मोबाईल वरून युनिव्हर्स पास कसा काढावा ? Universal Pass | संपूर्ण माहिती


कोविड लसीकरणाचे 2 डोज झालेल्यांसाठी Universal pass बऱ्याच दिवसापासून सुरू करण्यात आलेला आहे हा पास सार्वजनिक वाहतूक, मॉलमध्ये, विमान प्रवासासाठी, इ. आवश्यक आहे.

📱खालील प्रमाणे आपण युनिव्हर्सल पास मोबाइलवरून काढू शकतात..!!

1) सर्वप्रथम पात्र नागरिकांनी अर्थातच लसीकरणाच्या दोन डोज घेतलेल्या व्यक्तींनी
या संकेतस्थळावर जावे. वरील संकेत स्थळ कॉपी करून ब्राउझर मध्ये पेस्ट करावे लिंक ओपन झाल्यानंतर चार पर्याय आपल्याकडे असतील.

2) त्यावरील Travel Pass for double Vaccinated Citizens या तीन नंबरचा पर्यायायावर क्लिक करावे.

3) त्यानंतर आपला कोव्हिड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाईल क्रमांक नमूद करावा.

4) त्यानंतर लगेचच मोबाईलवर OTP पासवर्ड Sms द्वारे प्राप्त होईल.

5) हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे आपले नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.

6) त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (generate pass) या पर्यायावर क्लिक करावे.

7) त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोव्हिड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची तारीख इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.

8) या तपशिलामध्ये 'सेल्फ इमेज’ (self image) या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र mobile gallery मधून अपलोड करावे. मोबाईल गॅलरीतून छायाचित्र अपलोड करता येवू शकते किंवा मोबाईल कॅमेऱ्याद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढून देखील अपलोड करता येईल.

9) ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 24 तासांमध्ये युनिव्हर्सल पास करीता एसएमएस द्वारे लिंक प्राप्त होईल, असा संदेश झळकेल. 

10) लिंक प्राप्त झाल्यानंतर universal pass मोबाईलमध्ये download करून (Save) करून घ्यावा.

Post a Comment

0 Comments