Subscribe Us

वर्ग 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा-2022 आवेदन भरण्यास सुरुवात..!!

वर्ग पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन भरण्यास सुरुवात | शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी फेब्रुवारी - २०२२

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे

अधिसूचना (परीक्षा प्राधान्य)
जा.क्र.मरापप/ शिष्यवृत्ती / २०२१-२२/३५०४ 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 
१७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ०१. 
दिनांक :- ०१/१२/२०२१

प्रति,
१. शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य.) जिल्हा परिषद, सर्व
२. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका,
३. शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई उत्तर दक्षिण / पश्चिम विभाग
४. प्राचार्य, शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव/धुळे/ अमरावती/ औरंगाबाद/केळापूर
५. संचालक, विमुक्त जाती व भटक्या जमाती संचालनालय, पुणे ६. 
    प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख /शिक्षणाधिकारी, म.न.पा. शिक्षण मंडळ
७. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, (सर्व)

विषय :- 
    पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. २० फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना...

    शासनमान्य शाळांमधून सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दि. ०१/१२/२०२१ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

    उपरोक्त परीक्षा दि. २० फेब्रुवारी, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी. 

📱सोबत :- अधिसूचना खालीलप्रमाणे 👇

स्वाक्षरीत/ (तुकाराम सुपे ) 
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०१

Post a Comment

0 Comments