Subscribe Us

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी कशी करावी? सविस्तर माहिती वाचा..!!

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी कशी करावी? सविस्तर माहिती वाचा..!!

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण

🎯प्रशिक्षण नोंदणी करण्याकरिता खालीलप्रमाणे 👇 कृती करावी.

🔹प्रथमतः नोंदणी करण्यासाठी https://training.scertmaha.ac.in या लिंकवर क्लिक करा. 

🔹त्यानंतर शिक्षकांसाठी नोंदणी करण्याकरिता समोर दोन पर्याय दिसतील.
1) वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी 2) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी

🔹आता आपणास ज्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करायचे आहे, तो योग्य पर्याय निवडून त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला शिक्षक पडताळणी (Teacher Verification) करून घ्यायची आहे.

🔹यामध्ये आपणास प्रथमत: आपला शालार्थ आय.डी. टाकायचा आहे.

🔹नंतर Date of Birth (जन्मदिनांक) टाकून घ्यायचा आहे.

🔹त्यानंतर ओटीपी साठी आपल्याता चालू  मोबाईल नंबर टाकायचा आहे.

🔹Register नोंदणी करण्यासाठी क्लिक करा या बटनावर आपणास क्लिक करायचे आहे.

🔹यानंतर आपण जो नोंदणीसाठी मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवर ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून  पडताळणी करून घ्यावी.

🔹यानंतर आपणासमोर शालार्थ आयडी, आपले पूर्ण नाव, मोबाईल नंबर, जन्मदिनाक, प्रथम नियुक्तीचा दिनांक, पद, शाळेचा यु डायस नंबर, शाळेचे नाव, जिल्हा, तालुका, शाळा व्यवस्थापनाचे प्रकार ही सर्व माहिती (बाय डिफॉल्ट) आलेली दिसेल.

🔹यानंतर संबोधन श्री/सौ/श्रीमती इत्यादी निवडून घ्यायचे आहे.

🔹यानंतर Gender/ लिंग निवडून घ्यायचे आहे.

🔹यानंतर पुढच्या रकाण्यामध्ये आपल्याला आपले संपूर्ण नाव देवनागरी लिपी मध्ये लिहायचे आहे.

🔹यानंतर आपला चालू असलेला ईमेल आयडी याठिकाणी आपणास टाकून घ्यायचा आहे. 

🔹यानंतर Educational Qualification Graduation/ शैक्षणिक अहर्ता पदवी निवडून घ्यायची आहे.

🔹यानंतर Educational Qualification Post Graduation/ घ्यायची आहे. शैक्षणिक अहर्ता पदव्युत्तर पदवी निवडून
घ्यायची आहे.

🔹यानंतर Professional Qualification /व्यावसायिक अहर्ता निवडून घ्यायची आहे.

🔹यानंतर खालीलपैकी Training Group /प्रशिक्षण गट आपणास लागू असेल तर निवडून घ्यायचा आहे.

🔹यानंतर Save /जतन करा या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

🔹यानंतर आपण भरलेती संपूर्ण माहिती आपणा समोर दिसेल, माहितीत बदल करायचा असेल तर Edit ऑप्शन वर क्लिक करा व हवी ती माहिती दुरुस्त करून घ्या.

🔹यानंतर I agree all above instructions/ मला वरील सर्व सूचना मान्य आहेत. या चेक बॉक्स मध्ये टिक करून प्रशिक्षण शुल्क भरा या ऑप्शनवर क्लिक (2000 रु) करायचे आहे.

🔹आपली प्रशिक्षण शुल्काची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. त्या नंतरच आपल्याला रजिस्टर ईमेल आयडी वर प्रशिक्षण नोंदणी झाल्याची पावती येईल.

धन्यवाद..!!

🔹वरिष्ठ व निवडूश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२🔹
 📱 प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी लिंक👇

Post a Comment

1 Comments