Subscribe Us

शिक्षकांना गुगल क्लासरूम प्रशिक्षण नोंदणी मुदतवाढ | गुगल क्लासरूम शिक्षक प्रशिक्षण

शिक्षकांना गुगल क्लासरूम प्रशिक्षण नोंदणी मुदतवाढ | गुगल क्लासरूम शिक्षक प्रशिक्षण | Google Classroom

गुगल क्लासरूम शिक्षक प्रशिक्षण

विषय :-
राज्यातील सर्व शिक्षकांनी गुगत क्लासरूम साठी आवश्यक नावनोंदणी करणेस मुदतवाढ देणेबाबत..!!

संदर्भ :-
१. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/आय.टी./गुगल क्लासरूम नोंदणी/२०२१/३६१० दिनांक : २३ नोव्हेंबर, २०२१.

    उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे "Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom" या विषयावरीत दोन दिवसीय वेबिनारसाठी नावनोंदणी करण्याची मुदत दि. २६ नोव्हेंबर, २०२१ शुक्रवार रात्री ११:५५ वाजता असल्याची कळविण्यात आले होते. 

    परंतु अनेक शिक्षकांनी सदर प्रशिक्षणासाठी नावनोंदणीसाठी मुदत वाढविण्याबाबत या कार्यालयाकडे विनंती केली असल्याने प्रस्तुत प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करण्याची मुदत दि. ३० नोव्हेंबर, २०२१ मंगळवार रात्री ११:५५ वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. याची कृपया नोंद घेवून राज्यातीत सर्व शिक्षकांना सदर प्रशिक्षणाचा लाभ घेता यावा यादृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकाना सदर वेबिनारसाठी वरील लिंकवर नावनोंदणी करणेसाठी सूचित करण्यात यावे.

विकास गरड
उपसंचालक, आयटी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

🎯गुगल क्लासरूम प्रशिक्षण नावनोंदणी करिता लिंक👇

📱प्रशिक्षण मुदतवाढ परिपत्रक वाचा.👇

Post a Comment

0 Comments