Subscribe Us

नवोदय प्रवेश अर्ज कसा भरावा? JNVST_2022 New Update

नवोदय प्रवेश अर्ज कसा भरावा? JNVST_2022 | जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म कसा भरावा? JNV Online Aplication Form- 2021


🎯 जवाहर नवोदय विद्यालय पूर्वपरीक्षा- 2022 करिता Online प्रवेश फॉर्म भरतांना यामध्ये - 

१) Certificate भरून कसे add करावे? 
२) Photo,Sign ची Size कमी कशी करावी? 
३) अचूक प्रवेश अर्ज कसा भरावा? 
४) Image,Certificate Upload कसे करावे? 
५) फॉर्म ची Print कशी काढावी? 
या संदर्भात संपूर्ण माहिती खालील व्हिडीओ मध्ये दिलेली आहे..!!


🎯नवोदय प्रवेश अर्ज कसा भरावा? 
🔹How to Fill JNV Aplication Form?


इ.6 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2022 च्या आवेदनपत्र बाबत महत्वाची अपडेट (नवोदय विद्यालय महत्वाची सूचना | Issued by नवोदय विद्यालय समिति )

नवोदय प्रवेश अर्ज भरण्याकरिता  www.navodaya.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

दिनांक 17 नोव्हेंबर 2021 चे अपडेट नुसार अपलोड करायच्या फार्ममध्ये बदल करण्यात आलेला आहे.

    सत्र 2022-23 साठी जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी इयत्ता 6 निवड चाचणी 2022 साठी ऑनलाइन अर्ज पोर्टल बरेच दिवसापासून खुले आहे. विद्यार्थ्यांच्या अपलोड करायच्या फार्म मध्ये दिलेली माहिती संबंधित शाळा मुख्याध्यापकांकडून प्रशासकीय कारणास्तव संबंधित प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्याचे ठरविले आहे. यापूर्वी पालकाची आणि विद्यार्थ्याच्या सहीनिशी असलेल्या फार्म मध्ये बदल करण्यात आलेला आहे संबंधीत नवीन फॉर्म मध्ये भरलेली माहिती संबंधित शाळा मुख्याध्यापकांनी आपल्या सही व शिक्का सह सत्यापीत करण्याबाबत मजकूर वाढवलेला आहे व तोच फार्म नव्याने भरणे किंवा अपलोड करणे आवश्यक आहे.

    ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत पोर्टल वर अर्ज केलेला नाहीअसे पात्र उमेदवारांचा मुख्याध्यापक किंवा संबंधित पालक पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. सर्व उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे तपशील सुधारित नमुन्यात भरावे आणि संबंधित मुख्याध्यापकांकडून अर्जात भरलेल्या तपशिलाची पडताळणी करून अर्जावर मुख्याध्यापकांच्या सही व शिक्का सह अर्ज अपलोड करावा पूर्वी भरलेल्या अर्जामध्ये मुख्याध्यापकांचा सही व शिक्का हा तपशील नव्हता यापूर्वी फॉर्म न भरलेल्या उमेदवारांना ऑफलाईन अर्ज देण्याची गरज नाही.

    परंतु काही मुख्याध्यापकांनी अथवा उमेदवारांनी यापूर्वीच आपला अर्ज पोर्टल वर अपलोड केलेला असेल तर त्या अर्जदारांनी अथवा मुख्याध्यापकांनी संबंधित उमेदवाराचा ऑफलाइन सुधारित अर्ज भरून मुख्याध्यापकांच्या सही व शिक्का सह सत्यापित करावा आणि त्या अर्जाची ऑफलाइन प्रत संबंधित जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय च्या मुख्याध्यापकांकडे सादर केले जावे. त्यासंबंधी आपणास आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडून सुधारित सूचना मिळतील.


▶️विद्यार्थी व शिक्षकांसाठी महत्वपूर्ण Website - 
📲 (शैक्षणिक Blog ला अवश्य भेट द्या.) 

Post a Comment

0 Comments