Subscribe Us

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2021-22

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2021-22

इयत्ता 5 ते 7 व इयत्ता 8 ते 10 करिता -

महाराष्ट्र शासनाची ही योजना असून राज्यामध्ये इयत्ता 5 ते 7 व इयत्ता 8 ते 10 च्या मुलींची गळती होवू नये तसेच शिक्षणामध्ये मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी -

    सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही समाज कल्याण विभागा मार्फत राबवीली जात असून इ. 5 ते 7 व इयत्ता 8 ते 10 च्या S.C, V.J.N.T., N.T.B., N.T.C., N.T.D. आणी S.B.C. संवर्गातील मुलींसाठी आहे.

    प्रत्येक शैक्षणिक वर्षांमध्ये एका लाभार्थ्यास एकाच शिष्यवृत्तीचा लाभ देता येतो म्हणून S.C. संवर्गातील मुलींना अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीचा लाभ दिला असल्यास या योजनेमध्ये त्यांना घेऊ नये.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लाभार्थी निकष -

1.लाभार्थी ही मुलगी असली पाहीजे.

2. S.C, V.J.N.T., N.T.B., N.T.C., N.T.D. आणी S.B.C जातीच्या प्रवर्गातील मुलगी असली पाहीजे.

3. या योजनेसाठी इयत्ता 5 वी ते 7 वी व इ‌ 8 वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या मुली पात्र आहेत.

4. या योजनेसाठी उत्पन्नाची किंवा गुणवत्तेची कोणत्याही प्रकारची अट नाही.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे लाभ -

इयत्ता 5 ते 7 करिता -

S.C, V.J.N.T., N.T.B., N.T.C., N.T.D. आणी S.B.C या जातीच्या प्रवर्गातील मुलींना 60 रूपये प्रति महिना या प्रमाणे वर्षातील 10 महिन्यांचे एकूण 600 रूपये दिले जातात.

इयत्ता 8 ते 10 करिता -

S.C, V.J.N.T., N.T.B., N.T.C., N.T.D. आणी S.B.C या जातीच्या प्रवर्गातील मुलींना 100 रूपये प्रति महिना या प्रमाणे वर्षातील 10 महिन्यांचे एकूण 1000 रूपये दिले जातात.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जाची प्रक्रिया -

    या योजनेसाठी विद्यार्थी किंवा पालकांनी कोणत्याही प्रकारचा अर्ज किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसून शाळेचे मुख्याध्यापक हे आपल्या शाळेतील सर्व पात्र मुलींचे प्रस्ताव एकत्रित पंचायत समिती स्तरावर Ofline स्वरुपात सादर करतील व तालुका स्तरावरून संपूर्ण प्रस्ताव जिल्हयाचे समाज कल्याण अधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करतील.

Post a Comment

2 Comments