Subscribe Us

ऑनलाईन निष्ठा 2.0 प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिंक

ऑनलाईन निष्ठा 2.0 प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिंक

5 ऑक्टोबर पासून निष्ठा प्रशिक्षणाला सुरुवात

🔸विषय -
सर्व शासकीय व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत..!!

🟣निष्ठा 2.0 प्रशिक्षण -
    उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads’ and Teachers’ Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक- २१ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात आली यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२०-२०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण हे राज्यातील शासकीय व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी आयोजित केले जात आहे.

📱DIKSHA App 👇Download करा.

    सद्यस्थितीमध्ये देशातील कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या इ. ९ वी ते १२ वी साठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA (National Initiative For School Heads’ and Teachers’ Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे.

📱ऑनलाईन निष्ठा 2.0 प्रशिक्षण📱
(माध्यम निहाय कोर्स लिंक 👇 PDF)
(खालील PDF मध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमनिहाय कोर्स लिंक दिल्या आहेत त्यातील आपण कोर्स क्रमांक निहाय Link ला Direct Click करून कोर्स Open करू शकता किंवा PDF Download करून कोर्स Open करू शकता.)

🟣निष्ठा प्रशिक्षण वेळापत्रक -

(1) दिनांक २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर, २०२१
    DIKSHAअँपवर शिक्षक नोंदणी करणे.

(2) दिनांक ५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, २०२१
    १. अभ्यासक्रम आणि अध्ययनकेंद्रित सर्व समावेशक शिक्षण
    २. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे अध्ययन अध्यापन आणि मूल्यांकन एकात्मीकरण
    ३. सुरक्षित आणि निकोप शालेय वातावरण निर्मितीसाठी वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्टाचे विकसन

(3) दिनांक ४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर, २०२१
    ४. कला एकात्मिक अध्ययन
    ५. द्वितीय टप्प्यातील शिक्षण : मार्गदर्शन आणि समुपदेशन
    ६. शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य

(4) दिनांक ४ डिसेंबर, २०२१ ते ०२ जानेवारी, २०२२
    ७. शालेय शिक्षणातील पुढाकार
    ८. व्यावसायिक शिक्षण
    ९. शिक्षणातील विविध समस्या

(5) दिनांक ३ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२२
    १०. शालेय नेतृत्व (माध्यमिक स्तर) : संकल्पना व उपयोजन
    ११, खेळणीधारित अध्यापनशास्ल
    १२. शाळा आधारित मुल्यांकन

(6) दिनांक २ फेब्रुवारी २०२२ ते ३ मार्च २०२२
    विषयनिहाय अध्यापनशास्त्र आधारित घटकसंच (मोड्यूल्स)
    विषयाचे अध्यापनशास्त्र इंग्रजी/ उर्दू / संस्कृत/ गणित/ विज्ञान/ सामाजिक शास्त्र

(7) दिनांक ४ मार्च ते ३ एप्रिल २०२२
    सदर दिनांकापासून निष्ठा प्रशिक्षणाचे सर्व कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील.
    या कालावधीमध्ये उर्वरित प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे कोर्स पूर्ण करावेत.

    यासाठी सर्व शाळा व शिक्षकांना अवगत करण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनांप्रमाणे निर्धारित वेळेमध्ये सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे शक्‍य होईल..!!

Post a Comment

1 Comments