Subscribe Us

ऑनलाईन निष्ठा 2.0 प्रशिक्षण आयोजन व वेळापत्रक

ऑनलाईन निष्ठा 2.0 प्रशिक्षण आयोजन व वेळापत्रक


महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
दिनांक : ०४ ऑक्टोबर, २०२१

प्रति,
० विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
० उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
० प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
० शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.), जिल्हा परिषद, (सर्व)
० शिक्षण निरीक्षक (उत्तर मुंबई, पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई.)
० प्रशासन अधिकारी, मनपा/ नपा (सर्व)

विषय :- 
राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत..!!

    उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शिक्षा मंत्रालय, नदी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads’ and Teachers’ Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२०-२०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण हे राज्यातील शासकीय व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी आयोजित केले जात आहे.

    सद्यस्थितीमध्ये देशातील कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर देशामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या इ.९ वी ते १२ वी साठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA (National Initiative For School Heads’ and Teachers’ Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १९ मोड्यूल्स चा समावेश असणार आहे. यामध्ये १२ मोड्यूल्स हे सामान्य अभ्यासक्रमावर (Generic Modules) आधारित व ७ मोड्यूल्स हे दिषयनिहाय अध्यापनज्ञात्रावर आधारित (Pedagogy Based Modules) आहेत.

     एकूण १२ सामान्य अभ्यासक्रमावर आधारित व ७ विषयनिहाय अध्यापनशास्त्र घटकसंचाचे (मोड्यूल्स) प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. यामध्ये सामान्य अभ्यासक्रमावरील मोड्यूल्स हे ३ ते ४ तासाचे असणार आहे व विषयनिहाय अध्यापनझ्ञास्रवरील मोड्युल हे २४ ते २५ तासांचे असणार आहे. यामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकास सर्व १२ सामान्य अभ्यासक्रमावरील मोड्यूल्स (Generic Modules) व आपल्या विषयाचे एक विषय अध्यापनक्यास्रावरील मोड्यूल (Pedagogy Based Modules) ऑनलाईन पूर्ण करावे लागणार आहे, सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये दीक्षा प्लॅटफॉर्म वर होणार आहे.

    ऑनलाईन स्वरूपामध्ये निष्ठा प्रशिक्षण DIKSHA अंपच्या माध्यमातून सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील/ महाविद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पूर्ण करावे. यासाठी सर्व शाळा व शिक्षकांना अवगत करण्याबाबतची आवश्‍यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनांप्रमाणे निर्धारित वेळेमध्ये सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे शाक्य होईल.

(एम. डी. सिंह)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे.

📱अधिक माहितीकरिता 👇 GR वाचा व Download करा.
🟣सोबत :- प्रशिक्षण वेळापत्रक महाराष्ट्र, पुणे.

📱दीक्षा ॲप कसे वापरावे? खालील 👇 Video बघा..!!

Post a Comment

0 Comments