Subscribe Us

"माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" - सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा

"माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" अभियान
सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा
(Continuous Learning Plan)


    कोविड - १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous Learning Plan) राबविणेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत व त्याच्या अंमलबजावणीसाठी "माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" अभियान राबविणेबाबत...!!

📱'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' कार्यक्रम 👇 बघा..!!
शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद - LIVE

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
दि.०४ ऑक्टोबर,२०२१

🟣 पार्श्वभूमी :

    प्रत्येक शैक्षणिक वर्षाची सुरुवात साधारणतः जून महिन्यापासून होत असते. तथापि कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये औपचारिकरित्या व नियमितपणे सर्वच शाळा सुरू करता आलेल्या नाहीत. अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे शाळांचे वर्ग दि.०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे. शासनाकडून जरी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होत असल्या तरी इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग अद्याप नियमितपणे सुरू होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार आहे. तसेच सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत तर अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची सुरक्षितता व गुणवत्ता यासाठी अध्ययन-अध्यापन (शिक्षण) प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणेकरिता राज्यातील शाळा, शिक्षक यांच्यासाठी “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याची (Continuous Learning Plan) अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

🟣 शासन परिपत्रक :

    कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा अध्ययन हास (Learning Loss) टाळण्यासाठी आणि अध्ययनाची पोकळी (Learning Gap) भरून काढण्यासाठी निश्चित अध्ययन आराखड्याची गरज निर्माण झालेली आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, त्यांच्याजवळ उपलब्ध असणारी साधने आणि सुविधांनुसार ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवणे, प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक संपादणूक जाणून घेणे आणि संपादणूक वाढीसाठी सातत्यपूर्ण अध्ययनाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्येही विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि त्यांचा सर्वांगीण विकास ही जबाबदारी यशस्वी करण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याची (Continuous Learning Plan) अंमलबजावणी करण्यासाठी “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

🟣 "माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" या अभियानाचा उद्देश -

1) विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अध्ययनासाठी आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे.
2) कोविड - १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा राबविणे.
3) विद्यार्थ्यांना त्यांच्या डिजिटल सुविधांच्या उपलब्धतेनुसार सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याद्वारे शैक्षणिक सहाय्य करणे.
4) माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानांतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षीय यंत्रणेतील घटक, अधिकारी आणि पालक यांच्या भूमिका व जबाबदारी निश्चित करणे.
5) सरल प्रणालीद्वारे डिजिटल सुविधांच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थ्याच्या सातत्यपूर्ण अध्ययनाचा मागोवा घेणे. (Tracking of Learning).

🟣 सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous Learning Plan) :

🔸 सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना :
१. सातत्यपूर्ण अध्ययनासाठी डिजिटल साधनांची उपलब्धतताबाबत सर्वेक्षण :
२. शौक्षणिक गरजांची सद्य:स्थिती :
३. विद्यार्थिनिहाय सातत्यपूर्ण अध्ययनासाठी नियोजन :
    अ. डिजिटल साधने उपलब्ध असणारे विद्यार्थी (ऑनलाईन)
    ब. मर्यादित स्वरूपात डिजिटल साधने असणारे विद्यार्थी (ऑनलाईन-ऑफलाईन)
    क. कोणतेही डिजिटल साहित्य उपलब्ध नसणारे विद्यार्थी (ऑफलाईन)
४. सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्यामध्ये (ऑनलाईन/ऑफलाईन) समाविष्ट करावयाचे घटक/बाबी :
    १. अध्ययन - अध्यापन नियोजन
    २. वेळापत्रक
    ३. उपस्थिती
    ४. अध्ययन स्रोत/साहित्य
    ५. अध्ययन-अनुभूतींचे स्वरूप
    ६. पालक सहभाग
    ७. मूल्यमापन आणि उपचारात्मक अध्ययन
    ८. अभ्यासेतर उपक्रम नियोजन
    ९. स्थलांतरित / वंचित घटकातील विद्यार्थी नियोजन
    १०. शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन सुविधा
    ११. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य विशेष नियोजन
    १२.स्थानिक परिस्थितीनुसार विशेष उपक्रम

🔸 कोविड कालावधीत राज्याने राबविलेले उपक्रम :
    १. शैक्षणिक दिनदर्शिका
    २. अभ्यासमाला
    ३. सेतु अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स)
    ४. दीक्षा App
    ५. दूरदर्शनवरील ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम
    ६. गुगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षण
    ७. गोष्टींचा शनिवार
    ८. पायाभूत भाषिक व अंकगणित साक्षरता कार्यक्रम
    ९. ऑनलाईन समुपदेशन व महाकरिअर पोर्टल
    १०. शिक्षक व विद्यार्थ्यांची सायबर सुरक्षितता
    ११. स्वाध्याय उपक्रम
    १२. १०वी / १२वी विद्यार्थ्यांसाठी शंका समाधान सत्र
    १३. प्रश्पेठी
    १४. पूरक अध्ययन साहित्य
    १५. स्वयं पोर्टल
    १६. 'शिकू आनंदे' उपक्रम
    १७. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण

    माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियानांतर्गत उपरोक्त मार्गदर्शक सूचनांशिवाय वेळोवेळी शासनस्तरावरून तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या स्तरावरून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. सदरचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा सांकेतांक २०२११००४१५३९११०१२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार
Rajendra Shankarrao Pawar
(सहसचिव, महाराष्ट शासन)

📱अधिक माहितीकरिता GR 👇 वाचा व Download करा..!!

Post a Comment

0 Comments