Subscribe Us

"किशोर गोष्टी" सुवर्ण महोत्सवी उपक्रम

सुवर्ण महोत्सवी उपक्रम - "किशोर गोष्टी"

किशोर मासिक उपक्रम - गोष्टीचा शनिवार

    
    बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या किशोर मासिकाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य किशोर मासिक विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रम राबवीत आहे. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'कोरोना' या विषयावर "चित्रकला स्पर्धा" घेण्यात आली होती. या स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल साडे तीन हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. हि स्पर्धा दोन गटात घेण्यात आली असून निवड समिती मार्फत उत्कृष्ट चित्रकलेला पहिला, दुसरा व तिसरा तसेच उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.

    तसेच ‘किशोर गोष्टी’ हा मान्यवर लेखकांनी आपली गोष्ट सांगण्याचा उपक्रम चांगलाच लोकप्रिय झाला आहे. यामध्ये ‘मुलांच्या किशोर गोष्टी’ ही स्पर्धा घेण्यात आली. यात चौथी ते नववीचे विद्यार्थी त्यांना आवडलेली किशोर मासिकातील गोष्ट व्हिडीओ रुपात ध्वनीचित्रमुद्रीत करून पाठवायची होती. ही स्पर्धा ३ री ते ५ वी आणि ६ वी ते ९ वी अशा दोन गटात घेण्यात आली होती. तज्ज्ञांची समिती हे व्हिडीओ पाहून त्यातून पहिला, दुसरा व तिसरा तसेच उत्तेजनार्थ क्रमांक निवडला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रकमेच्या रूपात बक्षीस देण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांच्या गोष्टी ई-बालभारतीच्या पुणे येथील स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करून त्या ई-बालभारतीच्या युट्युब चॅनलवरून प्रसारित होतील.

    किशोर मासिक हे महाराष्ट्रातील एक नामवंत मासिक असून या मासिकाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. यामधील उपक्रम हे अतिशय दर्जेदार असून विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देणारे असतात. आता या मासिकामार्फत "किशोर गोष्टी" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये दर शनिवारी बालसाहित्यिक मान्यवर एक दर्जेदार गोष्ट सांगणार आहे. हि गोष्ट याआधी मासिकातून प्रकाशित झालेली असेल परंतु व्हिडीओ स्वरुपात गोष्टी ऐकण्याचा आनंद मात्र अधिक असतो म्हणून विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करा आणि गोष्ट ऐकण्याचा आनंद घ्या..!!

"किशोर गोष्टी" या उपक्रमातील आजपर्यंत प्रत्येक शनिवारी झालेल्या गोष्टी बघण्याकरिता खालील 👇 चित्राला स्पर्श करा आणि छान छान गोष्टींचा आनंद घ्या..!!


Post a Comment

0 Comments