Subscribe Us

PRC निमित्य आवश्यक रेकॉर्ड

 PRC निमित्याने  मुख्याध्यापक व शिक्षकांनी 
शाळा स्तरावर ठेवायचे  आवश्यक रेकॉर्ड 

PRC निमित्ताने मुख्याध्यापक बैठकीसाठी महत्त्वाचे मुद्दे :-

1. शालेय परिसर :-

🔸 शाळेचा नामफलक लावणे.

🔸 शालेय परिसर (संपूर्ण स्वच्छता)

🔸 वाढलेले गवत काढणे.

🔸 शौचालय, मुतारी स्वच्छता राखणे.

🔸 शौचालयात बादली, मग, साबण व Handwash ठेवणे.

🔸 पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करणे.

🔸 Handwash स्टेशन असल्यास, Handwash किंवा साबण ठेवणे.

🔸 किचनशेड स्वच्छ करणे.

🔸 सर्व वर्गखोल्या स्वच्छता.

🔸 मुख्याध्यापक कक्ष स्वच्छता.

🔸 शा. पो. आ. कोठीगृह स्वच्छता.

🔸 शिल्लक माल असल्यास नोंदवही प्रमाणे ठेवावा.

🔸 दर्शनी भागावर फलक लेखन.

🔸 वर्गवार इयत्तेच्या पाट्या लावणे.

🔸 मुख्याध्यापक कक्ष व इतर कक्षांच्या पाट्या.

🔸 अडगळीच्या साहित्याची योग्य मांडणी अथवा विल्हेवाट.

 

2. मुख्याध्यापक कक्ष :-

🔸 कक्षाची रचना सुव्यवस्थित करावी.

🔸 सर्व फलकांवरील सर्व माहिती अद्यावत करावी.

🔸 कक्षातील सर्व वस्तूंची स्वच्छता व मांडणी करावी.

🔸 महापुरुषांचे फोटो सुव्यवस्थित लावावे.

🔸 अधिकारी / पदाधिकारी फलक अद्ययावत करावेत.

🔸 मुख्याध्यापक टेबलावर काच असल्यास त्याखाली आवश्यक माहिती ठेवावी, अनावश्यक ठेवू नये.

🔸 कपाटातील सर्व फाईलला नावे व क्रमांक देऊन सुव्यवस्थित लावावे, अनावश्यक साहित्य ठेवू नये.

🔸 महत्त्वाच्या फाईल व रजिस्टर पटकन दिसतील अशा ठेवाव्यात.

🔸 महत्त्वाची जीआर व परिपत्रके फाईल ठेवावी.

 

3. वर्गखोल्या :-

🔸 सर्व वर्गशिक्षकांनी वर्गखोली सुव्यवस्थित ठेवाव्यात.

🔸 वर्गाचा नाम फलक लावलेला असावा.

🔸 शिक्षक परिचय वेळापत्रक लावावे.

🔸 वर्गातील साहित्याची स्वच्छता व मांडणी करावी.

🔸 वर्गस्तरीय विद्यार्थी हजेरी अद्यावत ठेवाव्यात.

🔸 टाचण वही अथवा कार्यविवरण नोंदवही अद्यावत ठेवावी.

🔸 मागील वर्षाचा संकलित निकाल व नोंदवह्या ठेवाव्यात.

🔸 किरकोळ दुरुस्ती करून घ्यावी.

🔸 सुरू असलेलेया वर्गातील आवश्यक विद्यार्थी बैठक व्यवस्था.

🔸 मागील वर्षापासून कोविड काळात केलेल्या कामकाजाचा तपशील ठेवावा.

🔸 विशेष कार्य केले असल्यास नोंद ठेवावी.

🔸 वर्ग स्तरीय विशेष उपक्रमाची तयारी ठेवावी.

🔸 सद्यस्थितीत करत असलेले शैक्षणिक कामकाज.

🔸 वर्गातील विविध लाभाचे विद्यार्थी नोंद करावी.

🔸 ऑनलाइन / ऑफलाईन अभ्यासाचा तपशील.

🔸 कोविड काळात विद्यार्थ्यांना विशेष मदत केली असल्यास.

 

4. विद्यार्थी लाभ योजना :-

🔸 मोफत पाठ्यपुस्तक लाभार्थी 2016-17 ते 2021-22 वर्षेवार.

🔸 गणवेश वाटप लाभार्थी 2016-17 ते 2021-22 वर्षेवार प्राप्त / खर्च / शिल्लक रक्कम.

🔸 सुवर्ण महोत्सवी लाभार्थी 2016-17 ते 2021-22 वर्षेवार प्राप्त / खर्च / शिल्लक रक्कम.

🔸 उपस्थिती भत्ता लाभार्थी 2016-17 ते 2021-22 वर्षेवार प्राप्त / खर्च / शिल्लक रक्कम.

🔸 लेखन साहित्य लाभार्थी 2016-17 ते 2021-22 वर्षेवार प्राप्त साहित्य संख्या.

🔸 आरोग्य तपासणी 2016-17 ते 2021-22 वर्षेवार दोषी आढळलेले संदर्भित केलेले.

🔸 पटनोंदणी 2016-17 ते 2021-22 वर्षेवार दाखल पात्र व दाखल केलेले.

🔸 अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2016-17 ते 2021-22 वर्षेवार लाभ मिळालेले.

🔸 अपंग विद्यार्थी लाभ योजना सर्व वाचन भत्ता, लेखनिक भत्ता, मदतनीस भत्ता, वैद्यकीय - सेवा, अपंग साधने

🔸 शालेय पोषण आहार- सर्व नोंदवह्या, कीर्द, खतावणी, मालाच्या पावत्या, वजनकाटा, वाटप नोंदवह्या, कोविड कालावधीतील प्रमाण व प्रत्यक्ष वाटप नोंदवही.

 

5. गुणवत्ता विषयक :-

🔸 PSM फाईल गोषवारा (2016-17 ते 2021-22)

🔸 अध्ययन स्तर गोषवारा (2016-17 ते 2021-22)

🔸 वार्षीक निकाल (2016-17 ते 2021-22)

🔸 शाळा सिद्धि (2016-17 ते 2021-22)

🔸 सेतू अभ्यास (सन – 2021 करिता)

 

6. शालेय सहभाग :-

🔸 CSR सहभाग वर्षेवार.

🔸 NGO सहभाग वर्षवार.

🔸 लोकसहभाग वर्षवार.

🔸 शिक्षक सहभाग वर्षवार.

 

7. शालेय साहित्य निगा :-

🔸 साहित्याची स्वच्छता व चालू स्थितीत असल्याची खात्री करावी.

(टीव्ही, कम्प्युटर, टॅब, रेडिओ, प्रोजेक्टर, प्रिंटर, स्पीकर, इत्यादी))

🔸 अन्य आवश्यक सर्व साहित्य सुस्थितीत असावेत.

🔸 विद्युत पुरवठा चालू असावा.

 

8. कोविड प्रतिबंधक साहित्य :-

🔸 सॅनिटायझर.

🔸 थर्मल गन.

🔸 पल्स ऑक्सीमीटर.

🔸 मास्क.

🔸 साबण.

🔸 Handwash.

 

9. शाळा दुरुस्ती व निर्लेखन :-

🔸 SSA योजनेतील दुरुस्ती वर्षवार.

🔸 जि.प. योजनेतील दुरुस्ती वर्षवार.

🔸 ग्रामपंचायत निधीतून दुरुस्ती वर्षवार.

🔸 निर्लेखित केलेल्या खोल्या / इमारत माहिती.

 

10. लसीकरण :-

🔸 शिक्षक लसीकरण माहिती नाव व दिनांकासह (प्रथम डोस, द्वितीय डोस)

🔸 लसीकरण केले असल्यास प्रमाणपत्र फाईल ठेवावी.

 

11. विविध अनुदाने :-

🔸 सादिल अनुदान 2016-17 ते 2021-22 प्राप्त / खर्च / शिल्लक.

🔸 समग्र अनुदान 2016-17 ते 2021-22 प्राप्त / खर्च / शिल्लक.

 

12. SSA बांधकामे अनुदान :-

🔸 शाळागृह 2016-17 ते 2021-22 प्राप्त / खर्च / शिल्लक.

🔸 शौचालय 2016-17 ते 2021-22 प्राप्त / खर्च / शिल्लक.

 

13. SMC बैठका :-

🔸 इतिवृत्त 2016-17 ते 2021-22 दरमहा एक बैठक याप्रमाणे वर्षातून किमान दहा बैठकांचे इतिवृत्त

🔸 वर्षभर किती बैठका घेतल्या त्याच्या दिनांक निहाय गोषवारा.

🔸 विविध समित्या सभा माहीती (सन 2016-17 ते 2021-22)

🔸 विविध अधिकारी शाळा भेट माहीती (सन 2016-17 ते 2021-22)

(टिप:- केंद्रप्रमुख भेटीची संख्या यात दर्शवु नये.)

 

14. स्पर्धा परीक्षा :-

🔸 नवोदय 2016-17 ते 2021-22 प्रविष्ट / उत्तीर्ण / गुणवत्ता यादीत आलेले.

🔸 पाचवी शिष्यवृत्ती 2016-17 ते 2021-22 प्रविष्ट/उत्तीर्ण/ गुणवत्ता यादीत आलेले.

🔸 आठवी शिष्यवृत्ती 2016-17 ते 2021-22 प्रविष्ट / उत्तीर्ण / गुणवत्ता यादीत आलेले.

 

15. विद्यार्थी माहिती :-

🔸 2016-17 ते 2021-22 वर्षेवार इयत्तानिहाय पट 30 सप्टेंबर नुसार.

🔸 शाळाबाह्य 2016-17 ते 2021-22 वर्षेवार आढळलेली शाळाबाह्य व दाखल केलेले.

🔸 वयानुरूप दाखल 2016-17 ते 2021-22 वर्षवार आढळलेली व दाखल केलेली.

🔸 आधारकार्ड काढलेले - न काढलेले सरलमध्ये नोंदवलेले.

🔸 गळती झालेल्या विदयार्थ्यी माहीती (सन 2016-17 ते 2021-22)

🔸 BPL विदर्यार्थी  माहीती (सन 2016-17 ते 2021-22)

🔸 शेतकरी पँकेज प्राप्त रक्कम माहीती (सन 2016-17 ते 2021-22)

 

16. मुख्यालय दाखले :-

🔸 2016-17 ते 2021-22 पर्यंतचे मुख्यालयाचे दाखल्यांची सत्यप्रत दप्तरी ठेवावी.

🔸 मुख्यालयी राहण्यासंबंधित शासनाच्या GR प्रती शाळेत ठेवाव्या.

 

17. शाळा माहिती टिप्पणी :-

शाळेच्या संपूर्ण माहितीची टिप्पणी मुख्याध्यापक यांनी तयार करावी. सद्यस्थितीत करत असलेल्या कामकाजाची नोंद त्यात ठेवावी. कार्यालयाकडून प्रपत्र देण्यात येणार आहेत. त्याचीच टिप्पणी करावी.

18. महत्वाची सूचना :-

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीबाबत कार्यालयाने पत्र दिले होते. सदर पत्र रद्द केल्याची यापूर्वीच कळविलेले आहे. तरी सर्वांनी यापूर्वीच्या प्रचलित पद्धतीनुसारच नोंदी कराव्यात त्यात कोणताही बदल करू नये.


📱खालील PDF बघा 👇 Download करा..!!

Post a Comment

1 Comments