Subscribe Us

सरल प्रणाली & आधार अपडेट

सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती नोंद करणे आणि यापुर्वी नोंदविण्यात आलेल्या माहितीची पडताळणी करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य

प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका.
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व.
४. शिक्षण निरीक्षक, पश्चिम दक्षिण/उत्तर बृहन्मुंबई.
५. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, (शिक्षण विभाग) महानगरपालिका सर्व

विषय :- 
सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती नोंद करणे आणि यापुर्वी नोंदविण्यात आलेल्या माहितीची पडताळणी करणेबाबत.

             राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या माहितीचा तपशिल सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये शाळा लॉगिन वरुन अद्यावत करणे आवश्यक आहे. याबाबत वेळोवेळी सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. शासनाने संदर्भ क्रमांक १ च्या पत्राद्वारे या पुढील संचमान्यता केवळ आधार क्रमांक नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे करण्यात येईल त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या अधिपत्याखालील शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अद्यावत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अनुक्रमे संदर्भ क्रमांक २ व ३ नुसार सुचना निर्गमित केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती स्टुडंट पोर्टलमध्ये नोंद करणे व त्याची पडताळणी करणे याबाबत मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई. यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॅन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने आपणास खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये शाळा लॉगिनवरुन विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अचूकरित्या नोंदविण्यात यावी. सद्यस्थितीमध्ये राज्यातील ७६ टक्के विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती नोंदविण्यात आलेली आहे. तरी आपल्या अधिनस्त शाळांमधील उर्वरित विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकाची माहिती स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थीनिहाय नोंदविण्यात यावी. एकापेक्षा अधिक विद्यार्थ्याची माहिती एक्सल सिटद्वारे अद्यावत करण्यात येवू नये.

१.१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांकडून प्रलंबित विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकाची माहिती नोंद करण्याबाबत दररोज आढावा घ्यावा. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्याकडून उक्त कामाचा दर बुधवारी आढावा घेवून त्याचा अहवाल प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयास सादर करण्याची दक्षता घ्यावी.

१.२. प्रलंबित विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकाची माहिती स्टुडंट पोर्टलमध्ये दि. २९/०९/२०२१ पर्यंत नोंदविण्यात येईल दक्षता घेण्यात यावी.

२. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती स्टुडंट पोर्टलमध्ये अद्यावत केली आहे. याची पडताळणी केली असता एकच आधार क्रमांक एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या नावासमोर नमुद केल्याचे दिसून येते. तसेच चुकीचा आधार क्रमांक, जन्म तारीख, लिंग, व नाव नमुद केले असल्याचे दिसून येते. उक्त त्रुटी विचारात घेता स्टुडंट पोर्टलमध्ये आद्यावत केलेल्या आधार क्रमांकाची माहिती पडताळणी करण्याबाबत खाली प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

२.१. सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये अद्यावत केलेल्या अधार क्रमांकाची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकाने पुनश्च: पडताळणी करावी.

२.२. शाळेच्या जनरल रजिस्टरद्वारे विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारिख व लिंग आणि स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्याचे नमुद केलेले नाव, जन्म तारीख व लिंग हे आधार कार्डवरील उल्लेखित माहितीशी सुसंगत असल्याची खात्री करावी आणि यामध्ये त्रुटी असल्यास आधार कार्डवरील माहिती दुरुस्त करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी व दुरुस्त केलेल्या माहितीनुसार आधार क्रमांकाचा तपशिल स्टुडंट पोर्टलमध्ये अद्यावत करण्यात यावा.

२.३. एकच आधार क्रमांक एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या समोर नमुद केला नसल्याची खात्री करुन आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी.

२.४. स्टुडंट पोर्टलमध्ये एकाच विद्यार्थ्याचे नाव एका पेक्षा अधिक वेळा नमुद केले नसल्याची खात्री करुन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात.

२.५. वरील प्रमाणे दिलेल्या सुचना नुसार स्टुडंट पोर्टलमध्ये अद्यावत करण्यात आलेल्या आधार क्रमांकाच्या तपशिलाची पडताळणी दिनांक २९/०९/२०२१ पूर्वी पूर्ण करण्या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक यांना निर्देश देवून शाळांनी आधार क्रमांकच्या माहितीच्या तपशिलाची पडताळणी केली असल्याची खात्री करावी.

३. शाळेच्या जनरल रजिस्टरवरील विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व लिंग आणि स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांचे नाव प्रतारीख व लिंग तसेच आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख व लिंग ही माहिती सुसंगत एकच असावी. उक्त अचूक माहितीच्या आधारावरच सन २०२१-२२ ची संचमान्यता करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

४. वरील प्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार विहित कालमर्यादेमध्ये कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास दि. ३०/०९/२०२१ रोजी सादर करण्यात यावा.

(दत्तात्रय जगताप)
शिक्षण संचालक
प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक 
शिक्षण संचालनालय म. रा. पुणे.

📱शासन निर्णय बघा 👇 Download करा..!!

Post a Comment

0 Comments