प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. (सर्व)
३) शिक्षण निरीक्षक, पश्चिम / दक्षिण / उत्तर बृहन्मुंबई.
विषय : -
विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण (Biometric शिवाय) व संचमान्यता बाबत.
संदर्भ : -
१) संचालनालयाचे समक्रमांक दिनांक ३०/०८/२०२१ चे पत्र.२) मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण यांनी दिनांक ०८/०९/२०२१ रोजीच्या व्हिसीमध्ये दिलेल्या सूचना.
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने राज्यातील इ. १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अद्ययावत करण्याचे काम संबंधित शाळांच्या व्यवस्थापनांनी पूर्ण करणेबाबत संदर्भाधीन पत्रान्वये कळविण्यात आले होते.
मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण यांनी दिनांक ०८/०९/२०२१ रोजीच्या व्हिसीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील इ. १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचे काम दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करावे. यापुढील संचमान्यता केवळ आधार नोंदणी झालेल्या (Biometric असो किंवा नसो) विद्यार्थ्यांच्या पटसंख्ये आधारे करण्यात येईल. त्यामुळे, जर विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करणे अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी उपलब्ध होतील. सदर सूचना तातडीने आपल्या अधिनस्त सर्व शाळा व्यवस्थापक / मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.
(द. गो. जगताप)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
📱शासन परिपत्रक बघा 👇 Download करा..!!
0 Comments