Subscribe Us

5 सप्टेंबर (Thank A Teacher)

5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्य Thank A Teacher 
अभियानाांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह
राबविणेबाबत....

🔸शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (महा.)
🔸संकेतांक क्र. - 202108301930460021
🔸G.R. दि. ३१ ऑगस्ट, २०२१


प्रस्तावना :
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्य ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्य सन २०२०-२१ मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते, यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी  करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना यादिवशी विविध उपक्रमाच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सध्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समूह मार्गदर्शन, वर्गआयोजीत करून विविध प्रकारे मार्गदर्शन करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्तगत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमाचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्याांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.


शिक्षक दिनानिमित्य Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षकांच्या कार्य गौरव प्रीत्यर्थ खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

अ) इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी -

(कार्यक्रमाचे नाव👇)
1. वक्तृत्व
2. चित्र रेखाटन
3. काव्य वाचन
4. निबंध 


(विषय👇)
1. माझा आवडता शिक्षक
2. शिक्षक दिन
3. मी शिक्षक झालो तर/मी शिक्षिका झाले तर



ब) इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी -

(कार्यक्रमाचे नाव👇)
1. निबंध लेखन
2. वक्तृत्व
3. स्वरचित कविता लेखन
4. काव्यवाचन

(विषय👇)
१. माझा शिक्षक माझा प्रेरक
२. कोविड कालावधीतील शिक्षकाांची भूमिका
३. माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान
४. उपक्रमशील शिक्षक

क) इयत्ता नववी ते इयत्ता बारावी -

(कार्यक्रमाचे नाव👇)
1. निबंध लेखन
2. वक्तृत्व
3. शिक्षकांची मुलाखत 
4. काव्य लेखन
5. काव्य वाचन


(विषय👇)
1. आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका
2. देशाच्या जडण घडणीमध्ये शिक्षकांचे योगदान
3. शिक्षक : समाज परिवर्तनाचे माध्यम
4. माझ्या शिक्षकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम



उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यमांवर Facebook-@thxteacher, Twitter-@thxteacher, Instagram-@thankuteacher  अशाप्रकारे Tag करुन अपलोड करावेत. यावेळी

#ThankATeacher
#ThankYouTeacher
#MyFavouriteTeacher
#MyTeacherMyHero
#ThankATeacher2021


या हॅशटॅग (#) चा वापर करावा.

यामधील सर्वोत्तम असलेल्या कार्याक्रमापैकी "राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद" महाराष्ट्र (SCERT) ने जिल्हानिहाय व गटनिहाय तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करावी. कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानांतर सदर विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून यथोचित गौरव करण्यात यावा. 

सदर कार्यक्रमाचे आयोजन करत असताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी. 

सदरचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा साांकेताांक 202108301930460021 असा आहे. हे शासन परिपत्रक डीजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे. 

महाराष्ट्राचे  राज्यपाल त्यांच्या आदेशानुसार व नावाने,
( राजेंद्र पवार )
सह सचिव, महाराष्ट्र शासन

📱शासन निर्णय बघा 👇 Download करा..!!

Post a Comment

1 Comments