उपक्रम - शिकू आनंदे (Learn with fun)
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
कार्यक्रमाची वेळ - दर शनिवारी सकाळी 9 ते 11
विषय:- कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण.
मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. गोष्टीचा शनिवार, शाळा बंद पण शिक्षण सुरु, स्वाध्याय तसेच शिक्षक सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम / प्रशिक्षण online पद्धतीने घेण्यात येत आहेत. मुले घरीच online माध्यमातून शिक्षण घेत आहेत.
शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुलेही घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात. या बाबीचा विचार करून परिषदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने "शिकू आनंदे" (Learn with Fun) हा उपक्रम दि. ३ जुलै २०२१ पासून सुरु करण्यात आला आहे.
मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे. घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत इयत्ता १ ली ते ५वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला. शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत.
💥SCERT,Maharashtraपुणे या youtube channel च्या माध्यमातून आपण आजपर्यंत प्रत्येक शनिवारी झालेला भाग बघू शकता. त्याकरिता खालील 👇 चित्राला स्पर्श करा..!!
1 Comments
𝑨𝒑𝒖𝒓𝒗𝒂
ReplyDelete