Subscribe Us

राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) PARAKH - 2023 | शाळांना सूचना व PARAKH उद्दिष्ट्ये ?

राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) PARAKH - 2023 | शाळांना सूचना व PARAKH उद्दिष्ट्ये ?


राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) PARAKH - 2023
    राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) PARAKH - 2023 राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये मध्ये इयत्ता ३ री, ६ वी व ९ वी मधील विद्यार्थ्यांसाठी दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचे वेळापत्रक NCERT कडून प्राप्त झाले आहे.

📝 (SEAS) PARAKH- 2023 पत्र Download करा..!!


    देशातील विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत राहण्यासाठी, त्यांच्या करिअर च्या दृष्टीने जीवन उज्वल होण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात विविध उपाय योजना तयार करत असतात. विविध शैक्षणिक धोरण तयार करत असतात, विविध मूल्यमापन पद्धती, अभ्यासक्रम तयार करणे, अश्या विविध मार्गांचा अवलंबन करून देशाची भावी पिढी कशी घडली पाहिजे हा या मागचा प्रमुख उद्देश असतो.

    21 व्या शतकात जग खूपच वेगवान होत आहे. जगातील सर्वच राष्ट्र आपापल्या देशाची प्रगती कशी होईल याकडे लक्ष देत आहेत. मग भारत ही या गोष्टीला अपवाद कसा असेल ? म्हणून भारताने ही आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्वीकारले आहे. व त्याची अंमलबजावणी ही सुरु होत आहे. सध्या शासन याच धोरणावर विविध उपक्रम घेऊन येत आहे. जसे की, निपुण भारत, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS), राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण(SEAS), Stars प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मुल्यांकन चाचणी (PAT) विविध शिक्षक प्रशिक्षण, शाळांसाठी विविध उपक्रम, प्राथमिक स्तरापासून विध्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण इत्यादी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाते. जे विध्यार्थी गुणवान आहेत. त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे जे विध्यार्थी मागे पडतात तर ते मागे का पडत आहेत? या गोष्टीची पडताळणी करून त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने कृती कार्यक्रम तयार करून त्यानाही गुणवान विध्यार्थ्यांच्या बरोबरीने घेऊन येणे, त्यांचे करिअर उज्वल करणे, या सर्व बाबींचा विचार करता, महाराष्ट्रात दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) 2023 चे आयोजन केले आहे.

(SEAS) PARAKH- 2023 शाळांना सूचना -
१) ज्या शाळेमध्ये सदर सर्वेक्षण होणार त्या शाळेने सर्वेक्षण कालावधीत इतर कोणत्याही प्रकारचे उपक्रम घेऊ नये.
२) सर्वेक्षण ३ नोव्हेंबर २०२३ रोजी शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये होणार आहे.
३) सर्वेक्षण कालावधीत १०० % विध्यार्थी उपस्थित ठेवावेत.
४) विध्यार्थ्यांचा OMR भरून घेण्याचा सराव करून घ्यावा.
५) शिक्षकांनी NAS सर्वेक्षणातील प्रश्नासारखे प्रश्न तयार करून विध्यार्थ्यांचा सराव घ्यावा.
६) चाचणीपूर्वी किमान १५ दिवस NAS २०१७, ETAS, MTAS सर्वेक्षण मधील प्रश्नांचा सराव घ्यायचा आहे. तसेच SLAS व PAT मधील प्रश्नांचा ही नियमितपणे सराव घ्यायचा आहे.
७) शाळास्तरावर सर्वेक्षण अभ्यासक्रम विषयी प्रश्न तयार करून त्यांचा वेळोवेळी सराव घेणे आवश्यक आहे.
८) सदर सर्वेक्षणातून राज्याची शैक्षणिक स्थिती कळणार आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील शिक्षणाची सध्यस्थिती समजणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण विषयी जी काही तयारी आहे. ती काळजीपूर्वक करावी.

PARAKH काय आहे ?
1) राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक, PARAKH (Performance Assessment, Review, and Analysis of Knowledge For Holistic Development ) यांना अधिसूचित केले आहे, ज्याचे उद्दिष्ट हे आहे की देशातील सर्व बोर्डांसाठी मूल्यांकन मार्गदर्शक तत्त्वे सेट करणे आहे.
2) परख हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-2020 च्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून तयार केले गेले आहे. ज्यामध्ये नवीन मूल्यांकन पद्धती आणि नवीनतम संशोधनाबाबत राज्य अथवा केंद्रीय बोर्डांना सल्ला देण्यासाठी आणि त्यांच्यातील सहकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी PARAKH ची निर्मिती करण्यात आली आहे.
3) PARAKH हे NCERT चे घटक म्हणून काम करणार आहे -
नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (NAS) आणि स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे (SEAS) यांसारख्या नियतकालिक शिक्षण परिणाम चाचण्या घेण्याचे कामही PARAKH करणार आहे.
4) PARAKH प्रमुख मूल्यांकन क्षेत्रांवर विशेषतः कार्य करणार आहे -
१) मोठ्या प्रमाणात मूल्यांकन.
२) शाळा-आधारित मूल्यांकन.
३) परीक्षा सुधारणा.

PARAKH ची उद्दिष्ट :-
1) एकसमान निकष आणि मार्गदर्शक तत्त्वे: भारतातील सर्व मान्यताप्राप्त शाळा मंडळांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि मूल्यमापनासाठी मानदंड, मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे सेट करणे.
2) 21 व्या शतकातील महत्वाचे कौशल्य पूर्ण करण्यासाठी ते शालेय मंडळांना त्यांचे मूल्यांकन नमुने बदलण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मदत होणार आहे.
3) PARAKH राज्य आणि केंद्रीय बोर्डांमध्ये एकसमानता आणणार आहे, जे सध्या मूल्यांकनाच्या विविध मानकांचे पालन करतात, ज्यामुळे गुणांमध्ये व्यापक असमानता निर्माण होते.
4) सीबीएसई शाळांमधील त्यांच्या समवयस्कांच्या तुलनेत काही राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेशादरम्यान गैरसोय होत असते ही गैरसोय पुढे होऊ नये या सर्व येणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यात मदत होणार आहे.
5) PARAKH च्या माध्यमातून शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील चाचण्यांचे डिझाइन, विश्लेषण आणि अहवाल देण्यासाठी तांत्रिक मानके विकसित होणार आहेत.
6) पारख शिक्षणासाठी सर्वसमावेशक, सहभागी आणि सर्वांगीण दृष्टीकोन सुलभ करण्याचे उद्दिष्ट ठेवते, जे क्षेत्रीय अनुभव, अनुभवजन्य संशोधन, भागधारकांचे अभिप्राय, तसेच सर्वोत्तम पद्धतींमधून शिकलेले धडे विचारात घेते.
7) पारख हे शिक्षण अधिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रगतीशील बदल आहे.

🎯 NAS / SEAS 2023 Exam..!!
🗓️ परीक्षा - 03 नोव्हेंबर 2023

🔹 सरावासाठी नमुना प्रश्नपत्रिका -
🔹 वर्गणीहाय प्रश्नपत्रिका उपलब्ध -

👇 प्रश्नत्रिका Download करा..!!

👇 NAS/SEAS चाचणीचे स्वरूप..!!

Post a Comment

0 Comments