Subscribe Us

UDISE+ Portal शिक्षकांसाठी महत्वपूर्ण सूचना (New Update)

UDISE+ Portal शिक्षकांसाठी महत्वपूर्ण सूचना (New Update)



U Dise+ (2023-24) मध्ये प्रत्येक शाळेने खालीलप्रमाणे कामे करावी :-

1) 2022-23 मधील विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम प्रमोशन करून घेणे.
2) प्रमोशनचे काम पुर्ण झालेनंतर प्रत्येक वर्गास फायनालाईझ करणे.
3) यांनतर संपुर्ण वर्गांचे काम फायनालाईझ करणे.
4) यानंतर चालू वर्षाची इ. 1ली चे विद्यार्थी Add Tab Active होईल, वर्ग पहिली विद्यार्थीची नोंदणी करा.

(टीप - यामध्ये आधार नसल्यास सध्या तात्पुरता आधार नं.9 हा अंक 12 वेळेस टाका. पण सर्व विद्यार्थी टाकूनच घेणे.)

5) यानंतर पुन्हा इ.1ली ते पुढील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांची माहीतीचे पाने अपडेट करणे. जवळपास एका विद्यार्थ्यांचे जवळपास तीन पाने आहेत. यात जी माहीती अपूर्ण आहे ती माहीती भरा. आधार माहीती काही विद्यार्थ्यांचे व्हॅलीडेट झाल्यामुळे येथे बदल होत नाही. परंतू काही विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलीडेट झालेले नाही कारण येथे माहीती चुकीची असल्याने अशा विद्यार्थ्यांची आधारबाबतची माहीती नव्याने आधारनुसार भरा. प्रत्येक पानावर माहीती भरत असतांना Save करा व Next म्हणा. शेवटी Complet Data यावर क्लिक करा.

यानंतर दुसरे विद्यार्थ्यांची माहीती भरा. सर्व विद्यार्थ्यांची माहीती भरून झालेनंतर...

6) संपुर्ण शाळेची विद्यार्थी लिस्ट डाव्या बाजुचे टॅबमध्ये दिसेल त्यावर क्लिक करा. संपुर्ण विद्यार्थी यादी दिसेल. यादी सर्व वर्गाची एकत्र दिसेल. विद्यार्थी नावाचे शेवटी आधार व्हॅलीडेट ज्यांचे बाकी आहे. त्यांची माहीती उजव्या बाजुस दिसेल. ज्यांचे आधार व्हॅलीडेट बाकी आहे. त्या विद्यार्थ्यांचे समोर व्हॅलीडेटवर क्लिक करा. अशा पध्दतीने आधार व्हॅलीडेट करा.
7) सध्याची 2 री ते पुढील वर्गात मागील वर्षात आधार नसल्याने सदर विद्यार्थी Add करावयाचे राहीलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी टॅब येणार आहे. टॅब कार्यान्वित झालेनंतर सदर विद्यार्थी Add करता येतील.


U Dise+ 2023-24 मध्ये आपल्या शाळेत इतर शाळेतुन जर विद्यार्थी आलेला असेल तर त्या शाळेला रिकवेस्ट पाठवणे. :-

- सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करावे.
  Udise+ Sign In - CLICK HERE

- त्यानंतर Login page येईल तिथे UDISE ची माहिती भरण्यासाठी वापरलेला ID PASSWORD टाकावा.

- Login झाल्यावर Academic year 2022- 23 व Academic year 2023-24 असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी आपण Academic year 2023 24 ला क्लिक करावे.

- त्यानंतर डाव्या कोपऱ्यात जे पर्याय दिसतात त्यामध्ये शेवटी Progression Activity हा पर्याय आहे त्याला क्लिक करायचे आहे. त्याला क्लिक केल्यानंतर पुन्हा तिथे progression module, import module आणि Dropbox list असे तीन पर्याय दिसतील.

• Drop Box वर क्लिक करा.

- आता विद्यार्थी National Code शोधण्यासाठी जिल्हा, तालुका, शाळा निवडा Search वर क्लिक करून विद्यार्थी National Code कॉपी करा.

• आता Back वर क्लिक करा.
• Import Module वर क्लिक करा.

- आता विद्यार्थी National Code पेस्ट करा व जन्मतारीख टाका व Go वर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी व Import वर क्लिक करा.

- रिकवेस्ट पाठवले नंतर त्या शाळेच्या मु.अ.यांना फोन लावावा व रिकवेस्ट अॅपरूव्ह करून घेणे म्हणजे तो विद्यार्थी आपल्या शाळेच्या U Dise मध्ये जोडला जाईल.

अशा पध्दतीने आपणा सर्वांना हे काम करावयाचे आहे.


Udise plus मध्ये जे विद्यार्थी शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेलेत. :-

-त्याची माहिती अपडेट करताना left school with tc ऐवजी studying in this school अशी नोंद केली असेल व शाळा माहिती finalize केली असेल तर...

- अशा विद्यार्थ्यांचा National code copy करून डाव्या बाजूच्या Transfer certificate module वर क्लिक करून National code टाकून Go वर क्लिक करा.

- नंतर left school already with tc वर क्लिक करा. व Confirm करा.

- समोरची शाळा आता त्या विद्यार्थ्याला Import करू शकेल.

- शाळा सोडल्याचा दिनांक व captcha code व remarks मध्ये parrent request टाकून Submit करा.


Udise Plus 2023 मध्ये रक्तगट भरणे बाबत सूचना :-
(MPSP राज्य प्रकल्प संचालक)

    यु-डायस प्लस स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी अपडेट करण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती मध्ये विद्यार्थ्यांचा रक्तगट, वजन, उंची, शाळा प्रवेश दिनांक, हजेरी क्रमांक व माध्यम या अधिकच्या गोष्टी नवीन आल्या आहेत. यापैकी विद्यार्थी रक्तगट हा तपासणी करणे अडचणीचे किंवा वेळ घेणारे काम असल्यामुळे राज्य प्रकल्प संचालकांनी त्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.

प्रति,
सर्व सन्मा. मुख्याध्यापक
द्वारा
सन्मा. केंद्रप्रमुख (सर्व)

विषय - Udise Plus 2023 मध्ये रक्तगट भरणे बाबतची सूचना बाबत.

आताच Mpsp, कार्यालय मुंबई, यांच्या प्राप्त सूचनानुसार Udise Plus मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा रक्तगट भरताना अडचण येत होती, तरी ज्या विद्यार्थ्याचे रक्तगट मिळवण्यास अडचण येत आहे. त्यांनी सध्या Under Investigation - Result will be updated soon हा ऑप्शन निवडून माहिती पुढे भरावी तसेच रक्तगट माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा रक्तगट निवडून माहिती Update करून घ्यावी.

त्यानंतर Facility Profile मध्ये प्रत्येक विद्यार्थी बाबत उंची व वजन ही माहिती सुध्दा Update करून घ्यावी.

"ज्या मुख्याध्यापक यांनी अगोदरच काम केलेले आहे व विद्यार्थी Green दिसत आहे अश्या शाळांना सुद्धा रक्तगट, वजन व उंची हा पर्याय उपलब्ध असून त्यांनी देखील प्रत्येक विद्यार्थी Update घ्यावा.

सोबत - स्क्रीनशॉट जोडला आहे.


Post a Comment

0 Comments