Subscribe Us

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा-2023 प्रवेश पत्र उपलब्ध..!!

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा-2023 प्रवेश पत्र उपलब्ध..!!


इयत्ता आठवी व इयत्ता पाचवी ची परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. सदर परीक्षेसाठी हॉल तिकीट म्हणजेच परीक्षा प्रवेश पत्र विद्यार्थ्यांसाठी शाळा लॉगिन मध्ये परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करावे?

➡️ शाळा लॉगिन मधून विद्यार्थी प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


➡️ विद्यार्थी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी शाळेचा युजर आयडी व पासवर्ड असणे आवश्यक आहे.

➡️ युजर आयडी आपला शाळेचा यु डायस नंबर असतो तर पासवर्ड आपण सेट केलेला असेल तोच आहे.

➡️ जर पासवर्ड आठवत नसेल तर फॉरगेट पासवर्ड ऑप्शन निवडून त्यानंतरच्या टॅब मध्ये आपला युजर आयडी म्हणजेच यु डायस नंबर टाकून आपण नवीन पासवर्ड आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर किंवा ईमेल आयडी वर प्राप्त करू शकता.

➡️ परीक्षा परिषदेच्या पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर आपल्याला आपण अर्ज केलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची यादी दिसेल.

➡️ त्यासमोर प्रवेश पत्र किंवा ॲडमिट कार्ड या कॉलम मध्ये View वर क्लिक करावे.

➡️ क्लिक केल्यानंतर आपण संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र पीडीएफ स्वरूपात मोबाईल मध्ये देखील डाऊनलोड करू शकता व त्यानंतर ते प्रिंट देखील करू शकता.

Post a Comment

0 Comments