Subscribe Us

नवोदय प्रवेश परीक्षा सन 2023 (इ. 6 वी) | Online फॉर्म भरण्यास सुरुवात | संपूर्ण माहिती व नमुना कागदपत्रे

नवोदय प्रवेश परीक्षा सन 2023 (इ. 6 वी) | Online फॉर्म भरण्यास सुरुवात | संपूर्ण माहिती व नमुना कागदपत्रे


    शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी JNV मधील इ.6 वी च्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार 29 एप्रिल 2023 रोजी 11.30 वाजता होईल. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 आहे. 

    जवाहर नवोदय विद्यालय ही 100% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती. ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना दिला जातो. येथे भारतातील काही विशेष, गुणी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळते या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्यातून विद्यार्थी एक परीक्षा देतात ज्या परीक्षेत Top 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6वी 12वी मोफत शिक्षण मिळते ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात.


रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंकला टच करा.

फॉर्म मधील नवीन बदल काय ? 
1) फॉर्म भरण्यासाठी पत्याचा पुरावा आवश्यक आहे.
2) शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये इयत्ता पाचवीत शिकत असलेले उमेदवार त्याच जिल्ह्यातील प्रामाणिक रहिवासी असलेले तसेच त्याच जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळा जिथे JNV कार्यरत आहे आणि ज्यामध्ये ते प्रवेश घेऊ इच्छित आहेत तेथील रहिवासी असावेत.

अर्ज करण्यापूर्वी हि कागदपत्रे Download करा. -




नवोदय इयत्ता 6 वी प्रवेश 2023 साठी पात्रता -
1. JNVST 2023 नोंदणीसाठी, विद्यार्थ्याचे वय 9 ते 13 वर्षे दरम्यान असावे.
2. सत्र 2022-23 मध्ये पाचवीच्या वर्गात प्रवेश घेणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.

JNVST प्रवेश 2023 साठी जागा आरक्षणाचे निकष -
1) 75% जागा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून निवडलेल्या अर्जदारांसाठी राखीव आहेत आणि उर्वरित जागा जिल्ह्यातील शहरी भागातील अर्जदारांसाठी राखीव आहेत.
2) SC ST उमेदवारांसाठी त्यांच्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात जागांचे आरक्षण राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी नसावे.
3) 1/3 जागा विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत.
4) 3% जागा अपंग मुलांसाठी देखील राखीव असणार.

उमेदवारांना सूचना :-
1) या वर्षापासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त एक टप्पा असेल.
2) ओबीसी उमेदवारांना दिलेल्या आरक्षणांची यादी केंद्रीय यादीनुसार लागू केली जाईल. केंद्रीय यादीमध्ये समाविष्ट नसलेल्या ओबीसी उमेदवारांनी सामान्य उमेदवार म्हणून अर्ज करावा.
3) अर्ज भरण्यापूर्वी खालील स्कॅन केलेल्या प्रती तयार ठेवाव्यात.
  • उमेदवाराची सही
  • पालकांची सही
  • उमेदवाराचे छायाचित्र
  • पालक आणि उमेदवाराने सही केलेले प्रमाणपत्र
  • Residence certificate
  • OBC certificate (प्रवेश घेते वेळी लागेल)
4) प्रतिमांचा आकार फोटो आणि स्वाक्षरीसाठी 10-100kb आणि प्रमाणपत्रासाठी 50-300kb दरम्यान असावा. 
5) पुढील तपशीलांसाठी कृपया प्रॉस्पेक्टस Prospects वाचा.
6) नवोदय परीक्षेसाठी अर्ज करणारा विद्यार्थ्यांचा पत्ता हा नवोदय विद्यालय ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यातील पत्ता असणारा असावा.
7) नवोदय फॉर्म भरताना आधार कार्ड किंवा पत्यांचा पुरावा द्यावा सबमिट करावा लागणार आहे.
8) नवोदय परीक्षा निकाल जून 2023 मध्ये घोषित केला जाईल.

Post a Comment

0 Comments