Subscribe Us

पदवीधर व शिक्षक मतदार नाव नोंदणी कशी करावी? पात्रता, कागदपत्रे व लिंक

पदवीधर व शिक्षक मतदार नाव नोंदणी कशी करावी? पात्रता, कागदपत्रे व लिंक


    मतदार नोंदणी अर्ज आणि कागदपत्राच्या साक्षांकीत प्रती, आपल्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी ( ERO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO), किंवा अन्य नामनिर्देशित अधिकारी यांना समक्ष किंवा पोस्टानेही सादर केल्या जाऊ शकतात. तसेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा नोंदणी करता येईल.

(शिक्षक पदवीधर असल्यास शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघात मतदान करू शकतात.)


ऑफलाईन पदवीधर मतदार नाव नोंदणी -
(अर्ज आणि कागदपत्रे सादर करणे)
मतदार नोंदणी अर्ज आणि कागदपत्राच्या साक्षांकीत प्रती, आपल्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO), किंवा अन्य नामनिर्देशित अधिकारी यांना समक्ष किंवा पोस्टानेही सादर केल्या जाऊ शकतात. शक्यतो ही कागदपत्रे समक्ष सादर करून त्यांची पोहोच घ्यावी. तसेच अदययावत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यात स्वतःचे नाव असल्याची खात्री करावी.

शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे -
1. रहिवासाचा पुरावा. (पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्ती, टेलीफोन / विज बिल किंवा इतर मान्यताप्राप्त कागदपत्रांची साक्षांकित प्रत)
2. मार्क लिस्टची साक्षांकित प्रत.
3. पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.
4. ओळखपत्र.
5. शिक्षक असल्यास नोकरी करीत असल्याबाबत (आजी किंवा माजी प्रचार्याचे पत्र)
6. विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्यास त्याबाबतचे राजपत्र, PAN कार्ड, राजपत्र नसल्यास प्रतिज्ञापत्र.

साक्षांकन -
प्रमाणपत्रांचे साक्षांकन संबंधित जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी, किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्य राजपत्रित अधिकाऱ्यांकडून करून घ्यावे.

पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता -
1. तो भारताचा नागरीक असावा.
2. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्या किमान 3 वर्षांपूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्सम विद्यापिठाचा पदवीधर असावा.
3. सर्वसाधारणपणे संबंधित मतदादसंघातील रहिवासी असावा.
4. त्याने विहित कागदपत्रासह फॉर्म क्र.18 भरावा.
5. पदविका (Diploma) जर पदवीतुल्य असेल तरच पदवीधर गृहित धरण्यात येईल.

पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी कशी करावी?
निवडणुकीसाठी मतदान करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नवीन नोंदणी आवश्यक आहे. पदवीधर ( महाराष्ट्र विधान परिषद ) मतदार संघामध्ये नाव समाविष्ट करणे एकदम सोपे झाले आहे. आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरून मतदार यादीत नाव नोंदणी करू शकता. 
महाराष्ट्र विधान परिषद, मतदार संघामध्ये ऑनलाइन नाव समाविष्ट करण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत लिंकवर माहिती भरावी. पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी खालील Click Here बटनाला स्पर्श करा.



ऑनलाईन अर्ज भरतांना खालील मुद्दे लक्षात घ्यावीत -
१) जिल्हा २) नाव
३) जन्म तारीख
४) वय ५) लिंग
६) अर्जदार पती/वडील/आई
७) शैक्षणिक माहिती
८) अपंग माहिती (असल्यास)
९) अर्जदार पत्ता
१०) अर्जदाराच्या विधानसभा क्षेत्राची माहिती (असल्यास)
११) आधार नंबर

अपलोड करावयाची कागदपत्रे -
> पासपोर्ट रंगीत फोटो
> पदवीधर प्रमाणपत्र
> पत्ता पुरावा (आधारकार्ड/इतर दस्तावेज)
> स्वाक्षरी

शिक्षक मतदार नोंदणीकरिता पात्रता -
1. तो भारताचा नागरीक असावा.
2. त्याने मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्या लगतच्या 6 वर्षात किमान 3 वर्षे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून पूर्णवेळ काम केलेले असावे.
3. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा.
4. त्याने विहित कागदपत्रांसह त्यांनी फॉर्म क्र.19 भरावा.


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

Post a Comment

0 Comments